पोस्ट्स

India लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

इमेज
भारतातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ट्रकचा कधी ना कधीतरी संबंध आलेला असतोच.  कोणतीतरी एखादी तरी वस्तू ट्रकमधूनच येते. ट्रकडायवर हा पेशा रिस्की असतो. घरातून पंधरा दिवस महिनाभर तो बाहेर असतो. आणि पगार म्हणाल तर त्याच्या मानाने अत्यल्प असतो.  घरापासून अनेक दिवस बाहेर असतो.  बाकीच्या तुमच्या हाफीसातील ड्युटीवर तुम्ही डुलकी मारू शकता, टंगळमंगळ करू शकता पण ड्रायवर हा पेशा असा आहे की तिथं सेकंदाच्या शंभराव्या भागाला सुद्धा अलर्ट राहावं लागतं.  अपघात हे अपघात असतात. जाणूनबुजून कुणालाही कुणी मारायचं धाडस करत नाही. नजरचुकीने अपघात घडतात त्याला पुर्वी दोन वर्षे शिक्षा होती.  आता अमितभाईंनी ती शिक्षा १० वर्षांवर नेली. मूळात अशी काही जरूरत नव्हती. ट्रकडायवर होणे हीच तशी एक मोठी शिक्षा आहे. त्यावर अमितभाईंनी आणलेला कायदा म्हणजे नरकात जन्माला एखादा जाणार असेल तर तो भारतात ट्रकडायवर होईल अशी परिस्थिती करून ठेवली आहे. ट्रकचा अपघात झाला की, पुढे असणारा वाहनधारक शक्यतो वाचत नाही तो मरतोच. मात्र अशावेळी मॉब असा काही खवळतो की ट्रकडायवरचा जीव घेऊनच तो शांत होतो.  त्यामुळे डायवरला तिथ...

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!

इमेज
कोल्हापूर जिल्ह्यातील नवे पारगाव इथल्या ४० आणि ४२ वर्षीय दोन मित्रांनी एकाच दोरीला गळफास लावून आत्महत्या केली.  या दोन्ही मित्रांचे व्यवसाय होते एकाचा ट्रक तर दूसऱ्याचा जनावरांचा गोठा. दोघांनाही कर्ज होतं आणि त्यातून आलेल्या नैराश्यापोटी दोनही मित्रांनी जीवनयात्रा संपवली. त्यातील एकाला फक्त १० दिवसांपुर्वी मुलगी झाली होती. हृदय पिळवटून टाकणारी हि घटना घडली. त्यांनी ज्या झाडाला गळफास लावला ते झाड आत्महत्या करणेसाठी कुप्रसिद्ध झाले आहे.  सहज हि बातमी वाचनात आली. वाईट वाटलं. मात्र ह्या वाईट वाटण्याचे हि अलिकडे काही कौतुक राहिले नाही. एवढी माणसे किड्यामुंग्यासारखी मरत आहेत.  हि मरणारी माणसं कोण आहेत? शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक हे भारतातील सामान्य लोक.  आणि याच इंडियातील निरव मोदी, मेहूल चौकसी, विजय माल्या, ललित मोदी आणि असेच डझनभर लोक भारतात कर्जं करून परदेशात ऐशोआरामात जगत आहेत.  भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणीचे कर्ज असेच माफ होत आहे. अंबानी, अदाणी आणि त्यासारख्या शेकडो उद्योजकांचे कर्ज असेच सरकार माफ करते आणि त्याच भारताचा नागरिक असणाऱ्या कोल्हा...

जुनी पेन्शन आणि भाजपाचे कंगाल धोरण!

इमेज
आज सर्व सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचे कारण म्हणजे सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन साठी आग्रही आहेत.  भाजप सरकार हे सर्वसामान्य जनतेकडे पैसा राहिलाच नाही पाहिजे या मानसिकतेत असते. मग त्यांनी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, छोटे व्यावसायिक अशा सर्वांना गेल्या आठ वर्षांत देशोधडीला लावण्याचे कामच केले. आता त्यांच्या निशाण्यावर सरकारी कर्मचारी आले आहेत. सरकारी कर्मचारी कोण आहेत?  सरकारी कर्मचारी हि लोकंही सर्वसामान्य घरातूनच पुढे गेलेली आपलीच लोकं आहेत. जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत त्यांना महागाई भत्ता, निवृत्ती नंतर अर्धा पगार आणि यदाकदाचित मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना मदत हि आजवर चालत आलेली योजना होती.  समाजात सर्वच वर्ग देशोधडीला लागले असताना त्यातल्या त्यात ज्यांचं बरं चाललंय असा वर्ग म्हणजे सरकारी कर्मचारी वर्ग.  आता भाजप सरकारने त्यांनाही देशोधडीला लावायचं मनावर घेतलं आहे. त्यामुळे हि पेन्शन योजना बंद करायचा घाट घातला जात आहे म्हणून सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत.  एका सरकारी कर्मचाऱ्याच्या मागे त्याचे कुटुंबीय असते त्यालाही लेकरेबाळे असतात, सर्व ज...

कसबा पेठेतील भाजपचा पराभव का आनंददायी आहे?

इमेज
भाजपचा पराभव का आनंददायी आहे? गिरीश बापट या नेत्याने भाजपसाठी खूप काही दिलं.  मात्र त्यांची प्रकृती गंभीर असूनही भाजपने त्यांना प्रचारासाठी ओढत आणलं अॉक्सिजनसह.  लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांनाही अत्यवस्थ असतानाही राज्यसभा निवडणुकीसाठी नेलं होतं  भाजप हा विकृत आणि किळसवाणा सत्तापिसाट पक्ष आहे. त्यांना कोणाच्याही प्रकृतीपेक्षा सत्ता महत्वाची वाटते‌. गोव्यातही मनोहर पर्रीकर यांना अशाच अवस्थेत फिरवलं होतं. हे झालं अत्यवस्थ रुग्णांच्या बाबतीत . हे लोक इतके नीच आहेत कि, मृत्यू झालेल्या वाजपेयींच्या अस्थिंनाही देशभर हिंडवून त्यातून राजकीय वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता‌.  निवडणूकीत जय-पराजय होत असतात. मात्र आज भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करूनही तो पडला म्हणून गिरीश बापट यांना काय वाटत असेल? हा विचार केला तर प्रचंड वाईट वाटतं. पण या नीच कपटी लोकांना त्याची लाज वाटली असेल कि नाही हे त्यांनाच ठाऊक!  भाजपने सर्व नीती मूल्यं पायदळी तुडवून कपटी, खूनशी, सूडबुद्धीचं किळसवाणं राजकारण करायचा पायंडा पाडलाय तो समाजाला विकृतीकडे नेणारा आहे. आज बापट आणि त्यांच्य...

राहूल गांधीने बदलवलेलं वातावरण

इमेज
राहूल गांधींच्या परवाच्या भाषणानंतर देशभरात एक वातावरण बदललं गेलं आहे. ज्या समाजमाध्यमांवर त्याची पप्पू म्हणून निंदानालस्ती झाली तिथेच आज तो झळकत आहे. तरूण तरूणी त्याची भाषणं शेअर करत आहेत.  आजची महागाई, बेरोजगारी, गरीबी आणि मुठभर लोकांचं अतिश्रीमंत होणं ह्या देशापुढील समस्या त्याने मांडल्या. त्याला काऊंटर म्हणून अनेक मोदीभक्त काल पंतप्रधानांच्या भाषणाकडे डोळे लावून बसले होते. मात्र मोदींना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्तर देता आलं नाही. कालचं पंतप्रधानांचं भाषण हे भाषण न होता वायफळ बडबडी पलिकडे काही नव्हतं. ज्या देशांत जाईल तिथे जंगी स्वागत, बँडबाजा, गच्च मिठी यापलिकडे आपल्याला विशेष काही दिसलं नव्हतं मात्र जेव्हा मोदींचा परदेश दौरा झाला तेव्हा अदाणीसाठी काहीतरी हमखास गिफ्ट त्यांनी दिलंय. हेच राहूल गांधी याने सांगितले. अग्निवीर भरती होत आहे ती नोकरी फक्त ४ वर्षांसाठी असेल तिथून हे शस्त्रास्त्र प्रशिक्षित युवा समाजात येथील तेव्हा इथे हिंसा वाढली तर त्याला कोण जबाबदार? या महत्त्वाच्या प्रश्नाकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधलं.  कुणी काही म्हणो मात्र मोदींकडे अनेक प्रश्नांची उत्तरे ...

शिखरजी जैन समाज आणि भाजप

इमेज
भाजपची वापरून फेकून देण्याची नीती काही नवीन नाही. जैन आणि विशेषतः जैन समाजातील एक पंथ नेहमी भाजपाचं समर्थन करण्यात आघाडीवर होता आणि अजूनही आहे.  २०१४ साली एका जैन उद्योजकाने आपले हेलिकॉप्टर तत्कालीन भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना दिलं होतं. शिवाय बड्या व्यापाऱ्यांनी बक्कळ फंडींग केलं होतं.  आज तीच भाजप जैन धर्माच्या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा देतीय आणि त्याविरोधात जैन समाज रस्त्यावर उतरतोय.  एका जैन मुनींनी तर नरेंद्र मोदींची वारेमाप स्तुती केली होती‌. एका मुनीने आरएसएसचे संचलन लीड केले होते.  मग तुम्ही ज्याचे समर्थन करता तेच तुमच्या धर्माच्या विरोधात भूमिका घेत असतील तर तुम्ही त्यांना थेट विरोध करायचं हि ठाम आणि स्पष्ट भूमिका घ्यायला हवी‌. कोणतीही भूमिका हि राजकीय असते. अल्पसंख्याक जैन धर्माला दुखावलं तर बहुसंख्येने असलेल्या इतर धर्मियांना भाजपा आपल्याकडे वळवून घेण्यात यशस्वी होते. हे भाजपाचे ध्रुवीकरण करून मतं फोडण्याची नीती जैन समाजाने ओळखायला हवी. आणि यापूर्वी केलीय तशी भाजप ला मदत न करता विरोधी भूमिका घ्यावी तरच ते वठणीवर येतील. मात्र आ...

पैसा पसरला डाव घसरला....!

इमेज
राज्यातील सत्ता बदलानंतर फुटून शिंदे गटासोबत गेलेल्या शिवसेना आमदार आणि खासदार लोकांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे जाऊन आले तर काही फुटक्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा केल्या होत्या.  तरी सर्व महाराष्ट्रच नव्हे तर देशातील लोकांचे लक्ष हे 'दसरा मेळाव्याकडे' लागले होते. कारण या सभेसाठी शिवसेनेला शिवतीर्थ मिळू नये यासाठी शिंदे गटाने मोठ्ठे प्रयत्न केले होते. पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. न्यायदेवतेने उद्धव ठाकरेंना शिवतीर्थ मैदान दसरा मेळाव्यासाठी दिलं.  दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांना काही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. कारण त्यांनी ज्यादिवशी मुख्यमंत्रीपद सोडले त्याच दिवशी त्यांच्याप्रति सहानुभूती वाढत असल्याचे दिसून आले. त्याचाच परिणाम म्हणजे आजचा दसरा मेळावा.  दूसऱ्या बाजूला शिंदे गटाला विशेष तयारी करावी लागली. गावागावातून माणसं गोळा करून त्यांना यष्टी, बस, वाहनातून बीकेसीमध्ये आणने हे जिकीरीचे काम होते. मात्र पैशाने काही कामे सोप्पी होतात. बहुतेक केसरकरांनीच सांगितले कि जनता गोळा करण्यासाठी १० कोटी रूपये भरून यष्टी बसची सोय केली. १...

मांसाहारी जाहीरातीचा स्वागतार्ह निकाल

इमेज
काही जैन संस्थांनी टीव्हीवर मांसाहार आणि त्याच्याशी संबंधित  जाहिराती टीव्हीवर दाखवायच्या बंद करा अशी मागणी हायकोर्टात केली.  आज हायकोर्टाने ती याचिका कोलवली म्हणजे फेटाळली.  मूळात अशी मागणी करण्यात काहीच अर्थ नाही. त्याहीपेक्षा वाईट हे आहे की या अशा उटपटांग मूर्खपणामूळे आपण किती अडाणचोट आहोत याचे जंगी प्रदर्शनच भरवले जाते आणि त्याचे अनेक सामाजिक परिणाम होऊ शकतात. मूळात अशा लोकांना जैन धर्म काय याची समजच नसते आणि त्यातून अशा हरकती ते करत बसतात. वरून यांनी वैयक्तिकरित्या काहीही करावे मात्र त्यात धर्माचे नाव बदनाम करू नये.  जैन धर्मात मांसाहार करणे वर्ज्य आहे, मात्र ईतर काही धर्मांत जातीत मांसाहार चालतो. मांसाहार म्हणजे हिंसा. मात्र हिंसा हि फक्त प्राण्यांच्या कत्तली पूरती मर्यादित नसून अजूनही अनेक हिंसेचे प्रकार आहेत.  शारिरीक हिंसा, मानसिक हिंसा, सामाजिक हिंसा, आर्थिक शोषण अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात. मात्र काहींना हिंसा अहिंसा ही प्राण्यांच्या कत्तलीपूरती मर्यादित आहे असे वाटते. आपण आपल्यापूरता धर्म पाळावा. टीव्हीवर मांसाहाराची जाहिरात दाखवल्याने तु...

लॉजिक मेल्यानंतर काय होतं ?

इमेज
पूर्वी घरात शिकं असायची, मांजरं, ऊंदरं, काही दहीदूधताकलोणी खाऊ नये म्हणून हंडीत सगळं भरून शिकं वाश्याला, तुळीला अडकवायचे.  आपले किसनदेव म्हणजेच श्रीकृष्ण जेव्हा लहान होते बाळकृष्ण होते तेव्हा ते दहीदूधताक लोणी खायचे, मग आता घरी कुणी नसेल आणि शिक्कं तुळीला वाश्याला अडकवलं असेल तर दह्या दुधाची हंडी कशी काढायची ? तर ते आपल्या बाळ सवंगड्यांना गोळा करायचे आणि मानवी मनोरा करून हंडी काढून दहीदूधताकलोणी खायचे. ती एक कला होती.  आपल्या संस्कृतीत आपण सारे देवाचे भक्त, देव हा सर्व शक्तीमान. आता किसणदेव जास्तीत जास्त दोनतीन थर चढून सहज हंडी काढत असावेत. कारण पूर्वी घरं छोटी असायची.  आता आपले देव सर्व शक्तीमान असतात आणि आपण भक्तगण देवाला शरण गेलेलो आहोत. देवापेक्षा आपण महान नाही. हे आपल्या ईश्वरवादी धर्मांचे लॉजिक आहे.  कालांतराने दहीहंडी हा उत्सव सुरू झाला आणि आपण एक तर लहान पोरे नाही आहोत, एकटाही लहान किंवा बाळ म्हणावा असा नसतो. सगळे बऱ्यापैकी घोडमे लोक असतात.  आपल्या देवाने त्यांच्या बालपणी जर दोनतीन थराचा मनोरा केला असेल तर आपण त्या थरांची लिमीट क्रॉस करतोय म्हणजे साक्षात...

फडणवीस पवारांच्या कुठे लागतात ?

इमेज
गेल्या काही वर्षांत म्हणजे विशेषतः २०१४ नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर भाजपमधल्या लोकांना आनंद झाला. आनंद होणं स्वाभाविक आहे. मात्र काही अपवाद वगळले तर या आनंदाचं, अभिमानाचं रूपांतर कधी माजात झालं हे कळालं नाही. निश्चितच फडणवीस भारी आहेत ,त्याबद्दल आम्हाला शंका नाही. मात्र त्यांच्या भक्तांनी माज सुरू केला. तो एवढा माज होता कि, अतिशय खालच्या पातळीवर येऊन पवारसाहेब असतील किंवा अन्य विरोधी नेते यांच्यावर काहीबाही टीका करायचे. अत्यंत खालची भाषा असायची.  या साऱ्या भक्त लोकांच्या जीवावरही फडणवीस किती लक्ष देत होते माहित नाही मात्र त्यांनाही या वागण्याने बहुतेक प्रोत्साहनच मिळालं असावं, त्याच गुर्मीत थेट पवारांचं राजकारण संपल्याचा निकाल लावला फडणवीसांनी ! पवारांच्या पंक्तीत फडणवीसांना बसवायचा चंगच काही घटकांनी बांधला होता. त्यापुढे जाऊन फडणवीस म्हणजे मोठे नेते पण पवार म्हणजे साडेतीन जिल्ह्याचे नेते अशा फुगड्या खेळत होते भक्त लोक.  परवाच्या नाट्याने या सर्वांना जमिनीवर आणलं असावं. भाजपने सत्तांतर केलं मात्र शिंदेंची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर भक्तांच्या गल्लीबोळात शुकशुकाट पसरलाता...

'न ठरवता' झालेला दणणीत विजय !

इमेज
२०१९ च्या लोकसभेला पराभव, २०१९च्या विधानसभा निवडणूकीत पराभव, 2021  मध्ये झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत पराभव, त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणूकीतून माघार. अशा सलग पराभवांच्या मालिकेने कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गट शांत झाला होता.  एक निराशा त्यांच्यात दाटली होती.  सांगली, सोलापूर जिल्ह्यात जरी त्यांच्या गटाचा प्रभाव असला तरी कोल्हापूर हिच या महाडिक गटाची खरी पॉवर. तिथे होणाऱ्या सततच्या पराभवाने गटाला ब्रेक लागला होता.   मात्र तिकडे कोकणात मॉन्सूनचं आगमन झालं आणि ईकडे खासदार धनंजय महाडिकांचं आगमन झालं. आणि काही काळ शांततेत असलेल्या या गटाला नवसंजीवनी मिळाली.  कोल्हापूरात गेले ३ वर्ष सारं काही एकतर्फी होऊ लागलं होतं, त्यातून काहीही खेळ सुरू होते. कुठलेही हिशेब करणे, जुने वाद उकरणे, नव्या नेत्यांना हकनाक त्रास देणे, मुद्दामहून सहकारी संस्थांत निवडणूक लावणे, ठराविक जागा बिनविरोध करून काही जागेवर झुंजी लावणे असा काही उद्योगही चालू होता.  मात्र यावर ईलाजही नव्हता. कारण महाडिक नव्हते, दूसऱ्या बाजूला महाडिक असतील तर संतुलन साधतं.  आता अनेक कोल्हापूरातील आ...

के के

इमेज
आपण एखादीच्या प्रेमात एकतर्फी पडतो, उगचच मनाला गुदगुल्या वाटत असतात, आपण तिला फॉलो करत असतो, चूकून एखाद्या वेळेस तिची नजरानजर होते, त्यावेळी आपण कितीतर हारकतो.  हि नजरानजर सारखी होऊ लागते, कधीतर आपण धाडसाने पुढे जाऊ बघतो, ते धाडस, बळ येण्याआधीची बैचेनी खाऊ का गिळू करत असते, त्यातूनही आपण धाडस करतो, तिचा होकार मिळाला कि ढगात पोचतो, नवंनवं प्रेम म्हणजे माणूस शुद्ध हरपून बसलेला असतो, भेटलीच पाहिजे, बघितलीच पाहिजे, चोरट्या भेटी, तिथून हे ते, मग नव्यानव्या प्रेमाचा हळूहळू गंध उतरतो, गृहीत धरणं चालू होतं, कधीकधी वैताग येतो, राग येतो, भांडणं होतात, रूसवेफुगवे चालतात, त्या थोड्या काळाच्या भांडणानंतरचं एकत्र येणंही अलग असतं, त्याची मजा तिने दिलेल्या होकारापेक्षा कैकपटीने आनंददायी असते, कितीतर अजबगजब माणसं वागतं राहतात प्रेमात पडल्यावर, कधीतर विलग होतं, कधीतर प्रेम केलेली ती कायमची निघून जाते, गेलेली असली तरी एकमेकांपासून ते कधीच दूर नसतात, हरेक घडी तो ती एकत्रच असतात. ती कूठतरी तो कुठतरी पण आठवणी काय जातात ? रात्र प्रेमातही जागून होते, तशी विरहातही जागूनच होते, किती आणि काय ? हरघडी, हरपल को...

वार्डातला बेश्ट हबी

हा एप्रिल मे महिन्याचा लगीन सिझन असतो,  लगीन झालेल्या ज्यादातर लोकांची एनिव्हर्सरी याच महिन्यात येत असते.  दुनियेचा योग आहे तो.  पूर्वी कुणाचं काय कळायचं नाही,  पण आता  whatsapp status हे सर्वांच्या सोयीचं झालेलं हाय.  लोकांना म्हणजे दुनयेतल्या प्रत्येक नवरा बायकोला वाटतंय कि आपल्याला इंग्लिश चांगली येते.  काही जणांना तिन्हीसांजचं रात्रीचं बसल्यावर कॉन्फिडंस वाढतो ही बाब सर्वसामान्य किंवा सर्वमान्यही हाय.  मात्र हे जे whatsapp status वाले लोक असतात यांच्या कॉन्फिडंसमूळे माझे डोस्के दुखते.  रोजरोज काय वाट्टंल ते असतं राव.  ईंग्लिश येत नसलं तर नका लिवू पण अर्थाचा अनर्थ, स्वातंत्र्याचा स्वैराचार, माणूसकीला काळीमा, निघृर्ण स्टेटस का ठेवता ??? आता तुम्ही म्हणशीला तु एवढा का खवळलायस ?  त्याला कारणही तसंच आहे मित्रमैत्रीणींनो.  आपल्या सर्वांना माहीत हाय कि दुनयेतल्या प्रत्येक नवरीचा नवरा हा अख्ख्या दुनियेतला भारी नवरा असतो,  अर्थात 'वर्ल्डस बेस्ट हबी' हे ठीक हाय यात काही वाईट नाही.   पण मी परवा जे वाईट्ट बघिटलं त्या बिच...

बंटी पाटील -कट्टर राजकारण

इमेज
आजच्या कोल्हापूर उत्तरच्या विजयाने, बंटी पाटील जोरदार चर्चेत आलेत.  बंटी पाटील 'आमचं ठरलंय!' असं म्हणतं कोल्हापूरातील सर्व महत्वाची सत्तास्थाने त्यांनी हस्तगत केली.  बंटी पाटील भारी आहेत, पण त्याहून त्यांचं राजकारण कशासाठी भारी आहे ? एकदा विरोध म्हणटला कि विरोध, जागेवर ठरलं तिथं तडजोड नाही. आता खरतर राज्यभरात लोक इतके हलकट झालेत कि सत्तेसाठी पक्षच काय बापही बदलतील. मात्र बंटी पाटलांनी कधी काँग्रेस सोडली नाही, कि विरोधकाचा रोल ढिल्ला पडू दिला नाही.  एकदा विरोध तर कट्टर विरोध तिथं मग माया ममता, नातीगोती कसली काही भानगडी नाहीत. या कट्टरपणामागेच जनता असते आणि हेच खरं राजकारण आहे. माझी सीट पडली तरी चालेल, माझी सत्ता गेली तरी चालेल पण राजकीय युत्या, आघाड्यांचं भ्रष्ट राजकारण या माणसाने केलं नाही.  आघाडीचा आदेश असतानाही २०१९ लोकसभा निवडणूकीत 'आमचं ठरलंय!' हे ठासून त्यांनी सांगितलं आणि आदेश कोलवून लावला आणि ठरवलं तसंच केलंही.  हे करायला माणूस वाघ लागतो, तसा हा वाघ आहे. नाहीतर एकमेकांबरोबर एडजेस्टमेंट करून सत्ता आणणारी येतातही आणि जातातही पण दखल बंटी पाटील सारख्याच लोकां...

राजू शेट्टींचे अभिनंदन !

इमेज
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टींनी आज महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. आपण आता स्वतंत्र असल्याची घोषणा केली.  ऊसपट्टा सोडला तरीही राजू शेट्टींना माननारा मोठ्ठा वर्ग महाराष्ट्रातंच नाही तर पुर्ण भारतात आहे. १००-२०० देशभरातील शेतकरी संघटनेत त्यांना मानाचे स्थान आहे. एक टर्म आमदारकी दोन टर्म खासदारकी आणि त्यानंतर पराभव.  २०१४ ला त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपासोबत युती केली, नंतरून भाजपची भूमिका पटली नाही म्हणून ते तडकाफडकी बाहेर पडले. पुढे जाऊन २०१४ च्या लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली. या आघाडीत येणे काही त्यांच्या पथ्यावर पडले नाही. जवळपास लाखभर मतांनी त्यांचा पराभव झाला.  या पराभवाला अनेक कारणे जरी असली तरी मुख्य कारण हेच कि , शरद पवारांना विरोध करणारे शेट्टी परत त्यांच्याजवळ गेले हे लोकांना पटले नाही. त्यामूळे निवडणूकीच्या तोंडावर सेनेत आलेल्या धैर्यशील मानेंनी त्यांचा पराभव केला.  स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना राजू शेट्टी स्वतंत्र असावेत हेच नेहमी वाट...

महाविकास आघाडी आणि पाच राज्यांचे निवडणूक निकाल

इमेज
युपीमधील भईया लोकांना आपण नावं ठेवतो. भईया, गोबरपट्टावाले असं. पण महाराष्ट्रातही काही निराळी स्थिती नाही.  भाजपचे १०५ आणि सेनेचे ५६ अशी टोटल १६१/२८८ पैकी निवडून देणारा महाराष्ट्रच आहे. इथं सेनेने शहाणपणा दाखवला म्हणून भाजप सत्तेपासून लांब राहीली.  पण सेना आणि भाजप यांच्यात अंतर पाडायला देवेंद्र फडणवीस कारणीभूत ठरले. मात्र देवेंद्र फडणवीस यांना कारण व्हायला कोण भाग पाडलं तर लक्षात येईल कि राजकारण हे काल-आज, जाऊन-येऊन करायच्या गोष्टी नाहीत.  २०१४ साली भाजप आणि सेनेची निवडणूकीनंतर धुसफूस सूरू झाली पण निवडणूकीचे कल हातात पुर्णपणे यायच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेलांची प्रेस ठेवली आणि बाहेरून पाठींबा दिला. कारण दिलं ते स्थिर सरकाराचं.  ते काहीही असो पण देवेंद्र फडणवीस त्या बाहेरच्या पाठींब्यावर शिवसेनेला हवे तसे नाचवत राहीले. अर्थात सेनेचं खुबाड मोडायचं काम फडणवीसांनी २०१४-१९ या कालावधीत केलं.  २०१९ च्या विधानसभा निवडणूकीतही फडणवीसांनी गेम केला सेनेचा. उदा. कोल्हापूर जिल्ह्यात २०१४ साली दहापैकी सहा जागा निवडून आल्या होत्या. मात्र २०१९ च्या विधानसभा निवड...

शेतीतला जुगार !

इमेज
गेल्या काही वर्षात, कोथिंबीर, मेथी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्या असोत किंवा, फ्लॉवर, कोबी, वांगी, टमाटे, बटाटे या फळभाज्या असोत कि, ज्वारी, बाजरी, गहू, मका, असोत या आणि इतर साऱ्या शेतमालाच्या किमंती वर्षात फारफार १५-२० दिवस वाढतात. ते दिवस वजा केले तर बाकीचे ३५० दिवस बाजार हा नेहमी कोसळलेलाच राहतो.  मग त्या १५-२० दिवसांत कुणीतर एखादा लखपती होतो आणि टीव्ही, सोशल मिडिया, वर्तमानपत्रं आदी ठिकाणी एकरी १०-२० लाखाच्या ष्टोऱ्या छापल्या जातात.  तुम्ही आजही भाजी आणायला बाजारात गेला तर पाच तिथं दहा रूपये पेंडी च भाजी मिळते. ती दहावर्षापुर्वीही तेवढ्यालाच मिळत होती.  शेतकऱ्याला मात्र दहा वर्षात वाढलेला खर्च असा.  मशागतीचा खर्च वाढला. शेतमजूरांचा खर्च वाढला. रासायनिक खतांच्या किमंती वाढल्या.  औषधांच्या किमंती वाढल्या.  शेतमाल वाहतुकीचा खर्च वाढला.  शेतातील पाईपलाईनचा खर्च वाढला. वीजबीलं वाढली.  मल्चिंग पेपर, चार्जिंग पंप, तार, काठ्या या साऱ्यांचा खर्च वाढला.  हे वरचे सर्व खर्च एकदोन टक्केंनी वाढले नाहीत तर पाच ते दहा पटीने वाढलेत. मात्र शेतमालांचे दर ...

रमेशबाबू प्रज्ञानंद आणि राष्ट्रवादी भारतीय

इमेज
    कालच्या एका खेळानंतर रमेशबाबू प्रज्ञानंद चर्चेत आला. क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ असलेल्या देशात एखादा बुद्धिबळपटू चर्चेत येणे म्हणजे सुर्य पश्चिमेला उगवणे, भारतातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा होणे, हवेत उडणाऱ्या बसमधून सर्वांचा प्रवास सुरू होणे असंच वाटण्याजोगं आहे.  बुद्धिबळ हा अतिशय किचकट, एक मोहरा जर हिकडचा तिकडं झाला तर डाव उलटणारा खेळ. या खेळात विश्वनाथन आनंद या भारतीय बुद्धिबळपटूने पाचवेळा विश्वविजेतेपद पटकावलं. बुद्धिबळ हा खेळ अत्यंत धीराचा, संयमाचा, त्याचवेळी आक्रमकतेचा, धाडसाचा कधीकधी नैराश्यात ढकलणाराही हा खेळ आहे आणि म्हणून बुद्धिबळ हा कुणाचाही खेळ नाही म्हणजे ईतर खेळ आणि खेळाडू नालायक आहेत असं नाही. मात्र इतर खेळांच्या तुलनेत भारतीयांनी बुद्धिबळाला मान दिला नाही. एखाद्याला अक्षरशः देव बनवून टाकणाऱ्या भारतीयांनी विश्वनाथन आनंदला काय दिलं हा प्रश्न पडतो ?  एकदा विश्वविजेता ते पण सांघिक खेळातून खेळणाऱ्या खेळाडूला भारतरत्न आणि दूसऱ्या बाजूला स्वतःच्या बळावर पाचवेळा विश्वविजेता ठरणाऱ्या खेळाडूला भारतरत्न नाही हा असा आपला देश आहे. त्याबद्दल कुणी क...

मातृभाषा दिन

महाराष्ट्राची मातृभाषा मराठी मात्र ती दर जिल्हावार बदलत असते. पुणेरी, कोल्हापूरी, कोकणी, मराठवाडी, वऱ्हाडी अशा अनेक बोलीभाषा त्यात समाविष्ट असतात.  ज्या त्या व्यक्तीला आपली मातृभाषा प्रिय असते. तिच्यावर त्याचं प्रेम असतं. जर शाकाहारी धर्मातला माणूस जसा मटण खातो म्हणून इतर धर्मियांना हौस वाटते, तसंच इतर प्रांतातल्या लोकांना तो आपली भाषा बोलतो याचं कौतुक वाटतं.  एकदा कर्नाटकात जात असताना कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी आमची गाडी अडवली. एक पोलिस चुकवला तोवर त्याने पुढच्या पोलिसाला फोनवरून कळवलं तर त्याने गाडी अडवली आणि ओरडू लागला. मला कन्नड येत असल्यानं त्याच्याबरोबर कन्नडमध्ये बोललो. आमची अडचण मऊ भाषेत सांगितली तर त्या पोलिसाने आम्हाला सोडलं.  आता त्या पोलिसाने कशामुळे सोडलं आणि का सोडलं हा विषय जरी वेगळा असला तरी त्याला समोरचा माणूस दूसऱ्या प्रांतातला असूनही आपली भाषा बोलतो याचा त्याला आनंद झाला असणारच. या घटनेत भाषेचा रोलही महत्वाचा होता.  कोणतीही भाषा संपत नाही तर ती इतर भाषेतल्या शब्दांना सामावून घेत पुढे नदीसारखी वाहत असते. त्यामूळं इंग्रजीने अतिक्रमण केलं बॉलिवूडन...

वीरचंद गांधी -भारतमातेचे थोर सुपूत्र

इमेज
काल परवा बुरखा, हिजाबचा वाद झाला, त्याआधी शाहरूख खानच्या दुआ वरून वाद झाला. बऱ्याचदा आपल्याला ईतर धर्मातील जातीतील रीतरिवाज, संस्कृती त्या धर्माचे तत्वज्ञान माहीत नसते. त्यामूळे समज-गैरसमज बळावत जात असतात.  असाच एक जूना समज म्हणजे जैन हि हिंदू धर्माची शाखा आहे. खरतर तसं काहीच नाही. पण हा गैरसमज काही ईतर धर्मीयात आहे असंही नाही. त्यात जैन धर्मीयांचा समावेशही असतो. याला कदाचित जैन धर्माचे प्रतिनिधी प्रबोधन करायला कमी पडले असतील.  ही समस्या काही आजची नाही तर आज शंभर दीडशे वर्षांपासूनची हि समस्या आहे. मात्र त्याही वेळी जैन धर्म हा स्वतंत्र आणि वेगळा आहे हे सांगावं लागत होतं. ते भारतीयांनाच नाही तर जगालाही सांगण्याचं काम बॅरिस्टर वीरचंद गांधींनी केलं.  काही तूरळक लोक सोडले तर वीरचंद गांधी कुणालाही माहीत नाहीत. मात्र शिकागोच्या धर्मसंसदेत जैन धर्म मांडण्यासाठी वीरचंद गांधी गेले होते. त्यांच्या तिथल्या भाषणाने प्रभावित होऊन अमेरिकेत त्यांची ठिकठिकाणी भाषणं ठेवली गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर जैन धर्म पोचला तो या गांधींमूळे.  महात्मा गांधी जेव्हां भारतात परतले तेव्हां वीरचंद ग...