लॉजिक मेल्यानंतर काय होतं ?



पूर्वी घरात शिकं असायची, मांजरं, ऊंदरं, काही दहीदूधताकलोणी खाऊ नये म्हणून हंडीत सगळं भरून शिकं वाश्याला, तुळीला अडकवायचे. 

आपले किसनदेव म्हणजेच श्रीकृष्ण जेव्हा लहान होते बाळकृष्ण होते तेव्हा ते दहीदूधताक लोणी खायचे, मग आता घरी कुणी नसेल आणि शिक्कं तुळीला वाश्याला अडकवलं असेल तर दह्या दुधाची हंडी कशी काढायची ?

तर ते आपल्या बाळ सवंगड्यांना गोळा करायचे आणि मानवी मनोरा करून हंडी काढून दहीदूधताकलोणी खायचे. ती एक कला होती. 

आपल्या संस्कृतीत आपण सारे देवाचे भक्त, देव हा सर्व शक्तीमान. आता किसणदेव जास्तीत जास्त दोनतीन थर चढून सहज हंडी काढत असावेत. कारण पूर्वी घरं छोटी असायची. 

आता आपले देव सर्व शक्तीमान असतात आणि आपण भक्तगण देवाला शरण गेलेलो आहोत. देवापेक्षा आपण महान नाही. हे आपल्या ईश्वरवादी धर्मांचे लॉजिक आहे. 

कालांतराने दहीहंडी हा उत्सव सुरू झाला आणि आपण एक तर लहान पोरे नाही आहोत, एकटाही लहान किंवा बाळ म्हणावा असा नसतो. सगळे बऱ्यापैकी घोडमे लोक असतात. 



आपल्या देवाने त्यांच्या बालपणी जर दोनतीन थराचा मनोरा केला असेल तर आपण त्या थरांची लिमीट क्रॉस करतोय म्हणजे साक्षात देवाला मागे टाकतोय असं एकाला पण वाटलं नाही का ?

देव क्रोधीत होऊन प्रकोप होतो आणि काहीतर वाईट घडतंय म्हणजे काय तर लिमीट क्रॉस करू नका म्हणून घातलेला पायबंद. 

मात्र आम्ही अनेक थर चढवून देवापेक्षा महान होऊ बघतोय. आणि इथंच आपलं चूकतंय.

सर्वपक्षीय राजकारणी लोकं बक्षीस लावतील, स्पर्धा, ईव्हेंट, नाचगाणं करतील, त्यातून जनसंपर्क साधतील. पण ते जे काही करतात ते लॉजिकला मारून करतात. माणूस इलॉजिकल असणे म्हणजेच राजकारणी असणे अशी आपल्याकडे प्रथा आहे. 

राजकारणी लोकं बक्षीसं लावतील आणि नागवं नाचा म्हणतील, तर आपण नाचू नये कारण आपण भारतीय माध्यमं नाही आहोत. 

हे जे हंडी अडकवण्यासाठी शिकं असतं, ते काही धर्मात अंत्ययात्रा काढताना मृताचा संबंधीत पुढे विस्तु मडक्यात घालून शिक्कं हातात धरत असतो.

 त्यावरून मराठीत एक म्हण पण आहे, 'शिक्कं तुटलं आणि मड्याला फावलं' 

त्याचपद्धतीने लॉजिकचं शिक्कं तुटलंय आणि राजकारणी मड्यांना फावलं आहे. 

लॉजिक मेल्यानंतर आपणही मरत असतो. दहीहंडीत मरणारा मूलगा हा जीवानिशी मेलाय पण आपला समाज त्याहून आधी मरण पावलाय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं