पावसाचं आवाज कसा येतं

पाऊस पडालाय. पावसाचं आवाज कसा येतंय. च्किठच्कप्च असं मेणकागदावर पडल्यावर येतंय. मातीत पडलं की सूरवातीला आवाज येत नही, नंतर येतो. माती ही पोरांच्या डोक्यासारखी असते, पोरांचे डोके जास्त भिजते पोरींचं डोकं कमी. कमी डोकं म्हणजे कमी भिजतंय. कारण पोरींचे डोस्के नाही, केस लांबडे असतात, ऊतार असल्याने पाणी घसरून जातंय. पावूस डोक्यात जात नाही. आता वेणीतल्या एखाद्या केसाचे मूळ शोधणे हे कठीण काम. नवीन- ऋषीचे कूळ आणि वेणीतल्या केसाचे मूळ शोधू नये. 
ऊसाच्या पाल्यासारखे मोकळे केस सोडणार्या पोरी भारी दिसतात. व्हरायटी फक्त 86032सारखी पाहीजे.
पोरींचा विचार करायला नको. पावसाचा आवाज. पावसाच्या ठेंबाचा आवाज. पिच्चरात दाखवतात तसं नसतं. पावसाची आई म्हणजे समूद्र, पावसाचा बाप म्हणजे सूर्य. पावसाची बहीण नदी, पावसाचा भाऊ वढा. असं यांच कुटूंब. ढग म्हणजे गर्भाशय. पाऊस नोकरीला शेतात जातो, बादगड संगतीने गटारीत जातो, संस्कार चांगले असतील तर गाय पावसाचे पाणी पिते. हे म्हणजे पुण्याई, गोमूत्र म्हणजे सुवर्णस्वर्ग. पावसाची आई बा काढायला नको.
पावसाचा आवाज. पाऊस पाण्यात पडला की टुब्बुक अस आवाज येतंय. मग भाकर्या ऊठत जातात. शेकडो भाकर्या नंतर हजारो, जेवढं पाण्याचा साठा मोठ्ठा तेवढ्या जास्त भाकर्या. थेंबे थेंबे.
थेंबे थेंबे बालाजी तांबे. आँ ?
पावसाचे गर्भसंस्कार. नको.
थेंबेथेंबे तळे साचे. म्हणजे ठेंब ठेंब पडलं की तळं वर येतंय. मग भाकर्या वाढतात. वाढत नहीत तळल्यागत वाटतंय. तळ तळणे. तळमळणे. तळमळणे कधी ? तळ्यातले पाणी आटल्यावर तळ तळ मासं करतात. आणि मरतात. ह्या तळ्यात तळ तळ करणारी मासं बघून तळतळ जीव तूटून तळमळ झाली कुणाला तळतळाट लागायचा ?
शब्द लै गावले. कविता करू ?
नको.
ए कविता कविता म्हण की......
कविता की कवीता ? पहिली विलांटि रोम्यांटिक वाटते. दूसरी वीलांटी पसरट वाटते. म्हणजे....
ऊडी बघा. डी बादगड वाटते, इंग्रजीचा विचार केला तर दूसरी विलांटी देताना दोनवेळा ई ई, लोक ई ई कधी करतात ? त्यामुळं दूसरी वेलांटी वाटत नही. डबी पण. दूसरी विलांटी असलेले लोक शोधले तर ?
विलांटी भांग पाडल्यासारखं वाटतंय.
भाषेत गंमत हाय. स्वर हे नैसर्गीक. व्यंजन हे कृत्रीम. त्याचा शोध माणसाने माणसाकडे बघून लावला असेल. म्हणजे क हे अक्षर रामदेव बाबाच्या आवघड आसनासारखे वाटते. ख नवराबायकू सारखे वाटते. 'वाळू' त एक तिरकं रेष ओढलं की बाळू. 'वाळू'तंन एक रेष काढलं की वळू. रेष. लेस नव्हं. लेस सोडलं तर ?
तरीपण लहान असताना बाळ ऊं करत असते. ऊ स्वरात आहे. ऊं नाही. अ आहे आणि अं पण आहे. पण ऊ आहे आणि ऊं नाही. त्यावेळी पण ऊ विरोधक म्हणजे ऊस विरोधक आत्ताचे असावेत काय ?
लहान असताना बाळ ऊं करून वरडत असते, वरडायला येते, पण शोध लावता येत नही. त्यामूळे ऊं हा शब्द नसून स्वर आहे. लहान असताना शोध लावता येत नाही, मोठे होवून लहानपण जगता येत नाही. आणि ऊम्म चे ऊं करता येत नही.
असा विचार करताना बरं वाटतंय. रोज एका अक्षरावर विचार करू काय ?
नको.
पाऊस पैशे पोरगी पोरं
'प'महत्वाचा आहे. पाऊस मध्ये पण ऊस आहे. ऊस पण महत्वाचा.

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Krishna devshatwar
अनामित म्हणाले…
Krishna devshatwar

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?