पोस्ट्स

महाराष्ट्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बैलगाडा शर्यत

इमेज
बैलगाडा शर्यतीला नियम अटींसह परवानगी मिळाली ही गोष्ट राऊंड करणाऱ्यांसाठी आनंददायी ठरली, तर काही लोकांना प्राणीमात्रांचे हाल होतील असाही प्रश्न पडला. शेतकऱ्याचे म्हणने आहे कि आम्ही पोटच्या लेकराहून बैलाला जादा जपतो आणि ते खरंही आहे.  बैलगाडा शर्यतीदरम्यान हिंसा हि होते का ? तर होते. पण मग प्रश्न असा पडतो कि लोक कोंबडी, बोकड, खेकडा, मासा जीवानीशी मारून, शिजवून खातात तर ती हिंसा नाही का ? यापलिकडे जाऊन कत्तलखान्याचे काही व्हिडिओ पाहिले असतील तर शर्यतीतली हिंसा किरकोळ स्वरूपाची वाटावी अशीच आहे. मग समर्थन तर कशाकशाचं करायचं आणि कशाचं नाही हा प्रश्न येतो.  स्पर्धा असली कि हिंसा ही होतेच, स्वतःचा मूलगा मूलगी अभ्यास करत नाहीत म्हणून हाणणारी आपली मनुष्यजात आहे. मागं एकदा पाचवीचं पोरं अभ्यास करत नाही म्हणून आईने मारलं होतं आणि त्यात ते मूल जीवानिशी गेलं होतं. यावर जास्तीचं तत्वज्ञान न पाजळता मला एक असं वाटतंय कि, माणूस हा नालायक प्राणी म्हणूनच जन्माला या पृथ्वीतलावर आला. त्याने नेहमी आपला स्वार्थ पाहीला. शिकार केली, झाडे जंगले तोडली, आज जी शेतजमीन ज्यातील आपण अन्न खातो हे सारं वृक्षतोड ...