पैसा पसरला डाव घसरला....!
राज्यातील सत्ता बदलानंतर फुटून शिंदे गटासोबत गेलेल्या शिवसेना आमदार आणि खासदार लोकांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे जाऊन आले तर काही फुटक्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा केल्या होत्या. तरी सर्व महाराष्ट्रच नव्हे तर देशातील लोकांचे लक्ष हे 'दसरा मेळाव्याकडे' लागले होते. कारण या सभेसाठी शिवसेनेला शिवतीर्थ मिळू नये यासाठी शिंदे गटाने मोठ्ठे प्रयत्न केले होते. पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. न्यायदेवतेने उद्धव ठाकरेंना शिवतीर्थ मैदान दसरा मेळाव्यासाठी दिलं. दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांना काही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. कारण त्यांनी ज्यादिवशी मुख्यमंत्रीपद सोडले त्याच दिवशी त्यांच्याप्रति सहानुभूती वाढत असल्याचे दिसून आले. त्याचाच परिणाम म्हणजे आजचा दसरा मेळावा. दूसऱ्या बाजूला शिंदे गटाला विशेष तयारी करावी लागली. गावागावातून माणसं गोळा करून त्यांना यष्टी, बस, वाहनातून बीकेसीमध्ये आणने हे जिकीरीचे काम होते. मात्र पैशाने काही कामे सोप्पी होतात. बहुतेक केसरकरांनीच सांगितले कि जनता गोळा करण्यासाठी १० कोटी रूपये भरून यष्टी बसची सोय केली. १...