वीरचंद गांधी -भारतमातेचे थोर सुपूत्र
काल परवा बुरखा, हिजाबचा वाद झाला, त्याआधी शाहरूख खानच्या दुआ वरून वाद झाला. बऱ्याचदा आपल्याला ईतर धर्मातील जातीतील रीतरिवाज, संस्कृती त्या धर्माचे तत्वज्ञान माहीत नसते. त्यामूळे समज-गैरसमज बळावत जात असतात. असाच एक जूना समज म्हणजे जैन हि हिंदू धर्माची शाखा आहे. खरतर तसं काहीच नाही. पण हा गैरसमज काही ईतर धर्मीयात आहे असंही नाही. त्यात जैन धर्मीयांचा समावेशही असतो. याला कदाचित जैन धर्माचे प्रतिनिधी प्रबोधन करायला कमी पडले असतील. ही समस्या काही आजची नाही तर आज शंभर दीडशे वर्षांपासूनची हि समस्या आहे. मात्र त्याही वेळी जैन धर्म हा स्वतंत्र आणि वेगळा आहे हे सांगावं लागत होतं. ते भारतीयांनाच नाही तर जगालाही सांगण्याचं काम बॅरिस्टर वीरचंद गांधींनी केलं. काही तूरळक लोक सोडले तर वीरचंद गांधी कुणालाही माहीत नाहीत. मात्र शिकागोच्या धर्मसंसदेत जैन धर्म मांडण्यासाठी वीरचंद गांधी गेले होते. त्यांच्या तिथल्या भाषणाने प्रभावित होऊन अमेरिकेत त्यांची ठिकठिकाणी भाषणं ठेवली गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर जैन धर्म पोचला तो या गांधींमूळे. महात्मा गांधी जेव्हां भारतात परतले तेव्हां वीरचंद ग...