वीरचंद गांधी -भारतमातेचे थोर सुपूत्र

काल परवा बुरखा, हिजाबचा वाद झाला, त्याआधी शाहरूख खानच्या दुआ वरून वाद झाला. बऱ्याचदा आपल्याला ईतर धर्मातील जातीतील रीतरिवाज, संस्कृती त्या धर्माचे तत्वज्ञान माहीत नसते. त्यामूळे समज-गैरसमज बळावत जात असतात. 

असाच एक जूना समज म्हणजे जैन हि हिंदू धर्माची शाखा आहे. खरतर तसं काहीच नाही. पण हा गैरसमज काही ईतर धर्मीयात आहे असंही नाही. त्यात जैन धर्मीयांचा समावेशही असतो. याला कदाचित जैन धर्माचे प्रतिनिधी प्रबोधन करायला कमी पडले असतील. 

ही समस्या काही आजची नाही तर आज शंभर दीडशे वर्षांपासूनची हि समस्या आहे. मात्र त्याही वेळी जैन धर्म हा स्वतंत्र आणि वेगळा आहे हे सांगावं लागत होतं. ते भारतीयांनाच नाही तर जगालाही सांगण्याचं काम बॅरिस्टर वीरचंद गांधींनी केलं. 

काही तूरळक लोक सोडले तर वीरचंद गांधी कुणालाही माहीत नाहीत. मात्र शिकागोच्या धर्मसंसदेत जैन धर्म मांडण्यासाठी वीरचंद गांधी गेले होते. त्यांच्या तिथल्या भाषणाने प्रभावित होऊन अमेरिकेत त्यांची ठिकठिकाणी भाषणं ठेवली गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावर जैन धर्म पोचला तो या गांधींमूळे. 

महात्मा गांधी जेव्हां भारतात परतले तेव्हां वीरचंद गांधी यांच्यासोबत त्यांची मैत्री झाली. वकीलीबद्दल महात्मा गांधी टेंशनमध्ये होते तेव्हां त्यांना प्रोत्साहित करणारे वीरचंद गांधी होते. दोघांनी मिळून आहारशास्त्रासंबंधितही काही प्रयोग केले. 

वीरचंद गांधींबद्दलचं हे पुस्तक वाचताना कुठेही ते अगदी कट्टर होते किंवा परधर्माबद्दल टोकाचा द्वेष तिरस्कार केलाय असं कुठेही दिसत नाही. उलट भारतीय धर्मांची त्यांनी पाठराखण केली. एखाद्या धर्माचं नेतृत्व कसं असावं याचा ते आदर्श होते. आजकाल कट्टर, परधर्माबद्दल गरळ ओकणाऱी लोकं बघितली तर तो काळ किती शांततेचा आणि सहृदयतेचा होता. हे पुस्तक वाचताना जाणवते. 

संजय सोनवनी Sanjay Sonawani  सरांनी अतिशय सोप्या भाषेत, कुठेही तत्वज्ञानी किचकटपणा न आणता हे पुस्तक लिहलंय. चित्ररूपात आणि प्रकरणे असल्याने वाचायलाही छान वाटतं. 

 मराठीत वीरचंद गांधींबद्दल फार काही वाचायला नाही. हे एक पुस्तक म्हणून महत्वाचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?