पोस्ट्स

eknath shinde लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रिक्षावाल्याने कमाल केली!

इमेज
निवडणुकीच्या काळात जो ग्राउंडवर काम करतो त्यालाच त्याची परिस्थिती माहीत असते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक ग्राऊंडवरच्या माणसानं वादळात दिवा लावला. त्याचं नाव एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.  एकनाथ शिंदे यांचे विचार पटत नाहीत. पण त्यांचे राजकारण खरंच जमिनीवरचे आहे. त्यांना मिळालेले यश हे हलकं नाही. मान्य आहे कि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा काँग्रेस पेक्षा स्ट्राईक रेट कमी आहे.‌ मात्र भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट हा उत्तम आहे.  मुख्यमंत्री यांच्यासाठी हि निवडणूक अग्निपरीक्षा ठरणारी होती आणि ते त्यात यशस्वीही झाले. त्यांचे महायुती मधील दोस्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याहून सरस कामगिरी शिंदेनी केली.  भाजपपेक्षा फक्त २ जागा कमी. मूळात भाजपपेक्षा कमी जागा लढवल्या होत्या.  एकनाथ शिंदे हे अगदी तळातून आलेलं नेतृत्व आहे. एक भला मोठा पक्ष फोडण्याचे धाडस जो करू शकतो तो नक्कीच महत्वकांक्षा असणारा माणूस आहे.  जे लोक ग्राऊंडवर काम करतात त्यांना तिथल्या अडचणी माहित असतात. ग्राऊंडवर राबणारे ...

पैसा पसरला डाव घसरला....!

इमेज
राज्यातील सत्ता बदलानंतर फुटून शिंदे गटासोबत गेलेल्या शिवसेना आमदार आणि खासदार लोकांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे जाऊन आले तर काही फुटक्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा केल्या होत्या.  तरी सर्व महाराष्ट्रच नव्हे तर देशातील लोकांचे लक्ष हे 'दसरा मेळाव्याकडे' लागले होते. कारण या सभेसाठी शिवसेनेला शिवतीर्थ मिळू नये यासाठी शिंदे गटाने मोठ्ठे प्रयत्न केले होते. पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. न्यायदेवतेने उद्धव ठाकरेंना शिवतीर्थ मैदान दसरा मेळाव्यासाठी दिलं.  दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांना काही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. कारण त्यांनी ज्यादिवशी मुख्यमंत्रीपद सोडले त्याच दिवशी त्यांच्याप्रति सहानुभूती वाढत असल्याचे दिसून आले. त्याचाच परिणाम म्हणजे आजचा दसरा मेळावा.  दूसऱ्या बाजूला शिंदे गटाला विशेष तयारी करावी लागली. गावागावातून माणसं गोळा करून त्यांना यष्टी, बस, वाहनातून बीकेसीमध्ये आणने हे जिकीरीचे काम होते. मात्र पैशाने काही कामे सोप्पी होतात. बहुतेक केसरकरांनीच सांगितले कि जनता गोळा करण्यासाठी १० कोटी रूपये भरून यष्टी बसची सोय केली. १...