पैसा पसरला डाव घसरला....!



राज्यातील सत्ता बदलानंतर फुटून शिंदे गटासोबत गेलेल्या शिवसेना आमदार आणि खासदार लोकांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे जाऊन आले तर काही फुटक्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा केल्या होत्या. 



तरी सर्व महाराष्ट्रच नव्हे तर देशातील लोकांचे लक्ष हे 'दसरा मेळाव्याकडे' लागले होते. कारण या सभेसाठी शिवसेनेला शिवतीर्थ मिळू नये यासाठी शिंदे गटाने मोठ्ठे प्रयत्न केले होते. पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. न्यायदेवतेने उद्धव ठाकरेंना शिवतीर्थ मैदान दसरा मेळाव्यासाठी दिलं. 

दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांना काही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. कारण त्यांनी ज्यादिवशी मुख्यमंत्रीपद सोडले त्याच दिवशी त्यांच्याप्रति सहानुभूती वाढत असल्याचे दिसून आले. त्याचाच परिणाम म्हणजे आजचा दसरा मेळावा. 

दूसऱ्या बाजूला शिंदे गटाला विशेष तयारी करावी लागली. गावागावातून माणसं गोळा करून त्यांना यष्टी, बस, वाहनातून बीकेसीमध्ये आणने हे जिकीरीचे काम होते. मात्र पैशाने काही कामे सोप्पी होतात. बहुतेक केसरकरांनीच सांगितले कि जनता गोळा करण्यासाठी १० कोटी रूपये भरून यष्टी बसची सोय केली. १० कोट जर यष्टी महामंडळावर खर्च केला आहे तर इतर खर्च किती झाला असेल ? (विशेष म्हणजे या रक्कमेची ईडी आणि तत्सम यंत्रणां कडून चौकशी होत नाही.)

आता हे जे लोक आणले गेले, ह्यातील सर्वांना काही शिंदे बद्दल निष्ठा नाही. माध्यमातून फिरणाऱ्या क्लिपमधून दिसून येतं कि, मेळाव्याला आणणाऱ्या लोकांना कुणाचा मेळावा आहे हे देखील माहीत नव्हतं. अशा लोकांची गर्दी जमवून नेमकं काय साधलं शिंदे गटाने ?

शिवसैनिक जो काही आहे त्याला काही पैसा पद नाही तर आजवर प्रभावी भाषणांनी तो सेनेत राहिला. शिंदे यांचे भाषण म्हणजे काही तरी लिहून आणलेले वाचून दाखवणे आणि ते वाचून दाखवताना आक्रमकतेचा आव आणने. (खरंतर तेही नीट जमलं नाही) 

उद्धव ठाकरे यांचे भाषण प्रभावी, गोळीबंद आणि आपल्या लढाईची दिशा स्पष्ट करणारे आणि खऱ्या अर्थाने विचाराचे सोने करणारे असेच होते. 

मूसलमान आमचा शत्रू नाही. शिवसेनेचा हिंदूत्ववाद म्हणजे काय ? हेही त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यांचा रोख स्पष्ट होता. 

मोदी पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आले याचा विशेष उल्लेख करून कोण लोकांना फसवत आहे. हे उघडं पाडलं.

शिंदे गट आणि शिवसेना याची तुलना केली तर लक्षात येतं. 

-शिंदे गटाने कोट्यावधी रूपये मोजून गर्दी जमवली. 

-ठाकरेंकडे लोक स्वतःच्या खर्चाने गेले. 

-शिंदे खाली मान घालून वाचून मग वर मान करून भाषण करतात. 
-उद्धव ठाकरे विना कागद भाषण करतात. 

कोणाही राजकिय भाषणं ऐकणाऱ्या व्यक्तीला उद्धव ठाकरे यांचे भाषण हे शिंदेंच्या भाषणाच्या दसपटीने भारी वाटेल. 

शिंदे गटाने पैसा खर्च केला, गर्दी केली तरीही, शिंदे यांच्या दीर्घ वाचून भाषण करण्याने  तो मेळावा प्रभावी होऊ शकला नाही. उलट तो येत्या काही तासांत सोशल मिडियावर चेष्टेचा विषय होईल. 

पैसा खर्च करूनही हवं तसं झालं नाही तर म्हणतात,  पैसा पसरला आणि डाव घसरला ! 

शिंदे गटाची नेमकी अवस्था डाव घसरल्याचीच आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं