बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यतीला नियम अटींसह परवानगी मिळाली ही गोष्ट राऊंड करणाऱ्यांसाठी आनंददायी ठरली, तर काही लोकांना प्राणीमात्रांचे हाल होतील असाही प्रश्न पडला. शेतकऱ्याचे म्हणने आहे कि आम्ही पोटच्या लेकराहून बैलाला जादा जपतो आणि ते खरंही आहे. 

बैलगाडा शर्यतीदरम्यान हिंसा हि होते का ? तर होते. पण मग प्रश्न असा पडतो कि लोक कोंबडी, बोकड, खेकडा, मासा जीवानीशी मारून, शिजवून खातात तर ती हिंसा नाही का ? यापलिकडे जाऊन कत्तलखान्याचे काही व्हिडिओ पाहिले असतील तर शर्यतीतली हिंसा किरकोळ स्वरूपाची वाटावी अशीच आहे. मग समर्थन तर कशाकशाचं करायचं आणि कशाचं नाही हा प्रश्न येतो. 



स्पर्धा असली कि हिंसा ही होतेच, स्वतःचा मूलगा मूलगी अभ्यास करत नाहीत म्हणून हाणणारी आपली मनुष्यजात आहे. मागं एकदा पाचवीचं पोरं अभ्यास करत नाही म्हणून आईने मारलं होतं आणि त्यात ते मूल जीवानिशी गेलं होतं.

यावर जास्तीचं तत्वज्ञान न पाजळता मला एक असं वाटतंय कि, माणूस हा नालायक प्राणी म्हणूनच जन्माला या पृथ्वीतलावर आला. त्याने नेहमी आपला स्वार्थ पाहीला. शिकार केली, झाडे जंगले तोडली, आज जी शेतजमीन ज्यातील आपण अन्न खातो हे सारं वृक्षतोड होऊनच झालंय. मग आता परत शेती करणे बंद करा, आपापलं जंगल तयार होऊदे परत आपण टोळीने फिरून कंदमूळं फळं वगैरे खाऊ असं म्हणटलं तर लोक पायतान घेतील. 

सांगायचं काय तर आपण आपला फायदा बघिटलाय. त्यासाठी आपण हिंसा केलीय. आपल्याला खायला पाहिजे तर आपण प्राणी मारलेत आणि खाल्लोय. शेत पाहिजे तर वृक्षतोड केलोय, घरं बांधलेत ही सारी पृथ्वि माणसाच्याच कंट्रोलमूळे घडली किंवा बिघडलीय. मग पूर, महापूर , भूकंपही आलेत. त्यावेळी माणसंच चूकीच वागल्याचं दिसलं आहे. 

ज्या समाजात आजही स्त्री जात तिच्या न्याय हक्कासाठी लढतीय. गावोगावी शहरोशहरी अॉनर किलींग, बलात्कार, घरगुती हिंसा यातून माणसातील बाई जातीची सुटका झाली नाही तिथं बैलांसाठी कळवळ येणे ही खरीच संवेदनशील बाब आहे. 

बैलगाडा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील अर्थचक्राला गति मिळाली. गावोगावी बैलगाडा शर्यत सुरू होतील, यात्रा, ऊरूस वाढदिवस अशा मुहुर्तावर हे आयोजित होत असतात. 

अलिकडे लहान ट्रॅक्टर आल्याने शेतीतील मशागत, पेरणी, वाहतुक ही बैलांची जी कामे होती ती राहीली नाहीत. त्यामूळे गावागावातील गोठ्यातून बैलांना बाजार दाखवला जायचा मात्र काही लोकांनी वर्षानूवर्षे दावणीला बैल ठेवले, खुराक चारला, पळवून तालीम दिली ते हा दिवस पाहण्यासाठीच. शेतकरी , सुतारकाम, दोऱ्या वळणारे, वेटरनरी डॉक्टर, लागूनच मेडिकल, शर्यतीचे आयोजक , हेडी (व्यापारी), पशुखाद्यवाले, हलगी पथक या घटकांचं अर्थचक्र परत गतिमान होईल. ही एक चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊन एक ट्रॅक / मैदान केलं आणि त्यावर घोड्यांवर जसे पैसे लावतात तसे बैलगाड्यांवरही लावता आले तर मोठ्ठी आर्थिक उलाढाल होऊन चांगला पैसा खेळेल, पैसा आला कि अनेक प्रश्न सुटत असतात. ही त्यातली चांगली गोष्ट आहे. 

माणूस प्राणी आपापल्यात काय वागतो ? तेव्हा बैलांबद्दल फार दुःख वाटून घेण्याचं कारण नाही असं वाटतं.
(Photo - Sanjay Zinjad )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?