बंटी पाटील -कट्टर राजकारण

आजच्या कोल्हापूर उत्तरच्या विजयाने, बंटी पाटील जोरदार चर्चेत आलेत. 
बंटी पाटील 'आमचं ठरलंय!' असं म्हणतं कोल्हापूरातील सर्व महत्वाची सत्तास्थाने त्यांनी हस्तगत केली. 

बंटी पाटील भारी आहेत, पण त्याहून त्यांचं राजकारण कशासाठी भारी आहे ?



एकदा विरोध म्हणटला कि विरोध, जागेवर ठरलं तिथं तडजोड नाही. आता खरतर राज्यभरात लोक इतके हलकट झालेत कि सत्तेसाठी पक्षच काय बापही बदलतील. मात्र बंटी पाटलांनी कधी काँग्रेस सोडली नाही, कि विरोधकाचा रोल ढिल्ला पडू दिला नाही. 

एकदा विरोध तर कट्टर विरोध तिथं मग माया ममता, नातीगोती कसली काही भानगडी नाहीत. या कट्टरपणामागेच जनता असते आणि हेच खरं राजकारण आहे. माझी सीट पडली तरी चालेल, माझी सत्ता गेली तरी चालेल पण राजकीय युत्या, आघाड्यांचं भ्रष्ट राजकारण या माणसाने केलं नाही. 

आघाडीचा आदेश असतानाही २०१९ लोकसभा निवडणूकीत 'आमचं ठरलंय!' हे ठासून त्यांनी सांगितलं आणि आदेश कोलवून लावला आणि ठरवलं तसंच केलंही. 

हे करायला माणूस वाघ लागतो, तसा हा वाघ आहे. नाहीतर एकमेकांबरोबर एडजेस्टमेंट करून सत्ता आणणारी येतातही आणि जातातही पण दखल बंटी पाटील सारख्याच लोकांची घेतली जाते. कारण ते कट्टर असतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं