के के

आपण एखादीच्या प्रेमात एकतर्फी पडतो, उगचच मनाला गुदगुल्या वाटत असतात, आपण तिला फॉलो करत असतो, चूकून एखाद्या वेळेस तिची नजरानजर होते, त्यावेळी आपण कितीतर हारकतो. 
हि नजरानजर सारखी होऊ लागते, कधीतर आपण धाडसाने पुढे जाऊ बघतो, ते धाडस, बळ येण्याआधीची बैचेनी खाऊ का गिळू करत असते, त्यातूनही आपण धाडस करतो, तिचा होकार मिळाला कि ढगात पोचतो, नवंनवं प्रेम म्हणजे माणूस शुद्ध हरपून बसलेला असतो, भेटलीच पाहिजे, बघितलीच पाहिजे, चोरट्या भेटी, तिथून हे ते, मग नव्यानव्या प्रेमाचा हळूहळू गंध उतरतो, गृहीत धरणं चालू होतं, कधीकधी वैताग येतो, राग येतो, भांडणं होतात, रूसवेफुगवे चालतात, त्या थोड्या काळाच्या भांडणानंतरचं एकत्र येणंही अलग असतं, त्याची मजा तिने दिलेल्या होकारापेक्षा कैकपटीने आनंददायी असते, कितीतर अजबगजब माणसं वागतं राहतात प्रेमात पडल्यावर, कधीतर विलग होतं, कधीतर प्रेम केलेली ती कायमची निघून जाते, गेलेली असली तरी एकमेकांपासून ते कधीच दूर नसतात, हरेक घडी तो ती एकत्रच असतात. ती कूठतरी तो कुठतरी पण आठवणी काय जातात ? रात्र प्रेमातही जागून होते, तशी विरहातही जागूनच होते, किती आणि काय ? हरघडी, हरपल कोणतर कुणाचीतर या दूनयेत आठवण काढतंच राहत असतो, डोळ्यापुढं ती व्यक्ती, तिचं चित्र तिचं जवळच असणं, खुणावणं सगळं असतं आणि या साऱ्या क्षणाला एक म्युझिक असतं, गाणं असतं, ताल असतो, सूर असतो आणि ते कुठंतरी आपल्या मेंदूत हरघडीला वाजत राहत असतं. गायक जातो पण तो त्याचा आवाज ठेवून !




 यांची वेगळ्याने काय स्मारकं बांधायची ? स्वतःची स्मारकं कितीतरी हृदयात कोरलेली असतात या गायक, संगीतकार, कलाकार या लोकांची. 

हम, रहें या ना रहें कल
कल, याद आयेंगे ये पल

KK ला आणखी काय आदरांजली वाहायची ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं