वार्डातला बेश्ट हबी

हा एप्रिल मे महिन्याचा लगीन सिझन असतो, 
लगीन झालेल्या ज्यादातर लोकांची एनिव्हर्सरी याच महिन्यात येत असते. 
दुनियेचा योग आहे तो.
 पूर्वी कुणाचं काय कळायचं नाही,
 पण आता  whatsapp status हे सर्वांच्या सोयीचं झालेलं हाय.
 लोकांना म्हणजे दुनयेतल्या प्रत्येक नवरा बायकोला वाटतंय कि आपल्याला इंग्लिश चांगली येते. 

काही जणांना तिन्हीसांजचं रात्रीचं बसल्यावर कॉन्फिडंस वाढतो ही बाब सर्वसामान्य किंवा सर्वमान्यही हाय. 

मात्र हे जे whatsapp status वाले लोक असतात यांच्या कॉन्फिडंसमूळे माझे डोस्के दुखते. 

रोजरोज काय वाट्टंल ते असतं राव.

 ईंग्लिश येत नसलं तर नका लिवू पण अर्थाचा अनर्थ, स्वातंत्र्याचा स्वैराचार, माणूसकीला काळीमा, निघृर्ण स्टेटस का ठेवता ???

आता तुम्ही म्हणशीला तु एवढा का खवळलायस ? 

त्याला कारणही तसंच आहे मित्रमैत्रीणींनो. 

आपल्या सर्वांना माहीत हाय कि दुनयेतल्या प्रत्येक नवरीचा नवरा हा अख्ख्या दुनियेतला भारी नवरा असतो,

 अर्थात 'वर्ल्डस बेस्ट हबी' हे ठीक हाय यात काही वाईट नाही.  

पण मी परवा जे वाईट्ट बघिटलं त्या बिचारीने Ward's best hubby ! असं लिवलतं. 

माझे डोस्के दुखलेते मित्रहो. वार्डातला बेश्ट नवरा, तरी नशीब जिल्हा परिषद मतदारसंघातला बेश्ट नवरा, पंचायत समीती गणातील बेश्ट हबी असं काय लिवली नाही. 

पुढं जाऊन आणखी एका प्रकारामूळं डोस्के पेटले. काही हलकट लोक असतात, ते वेगळ्याने शुभेच्छा लावत नाहीत.

 स्क्रिनशॉट मारतात आणि तेच  whatsapp status ला चिटकवतात. 

तर ह्या वॉर्डातल्या बेश्ट हब्याला दूसऱ्या पण एकीने क्रॉप न करता त्याच्या बायकूच्याच शुभेच्छा लावल्या. 

मला एक माहिती होतं सोडा ह्यो हब्या नेमका कुणाचा हाय ?

पण ज्याला माहिती नाही त्याची पंचाईत व्हायची. 

लै डोस्के दुखते मित्रहो ! 

हब्याला त्याचे काही वाटते- नाही वाटते देवास ठौक, किंवा वाईफीपुढे त्याचे काय चालत नसावे. 

पण कधीतर अंगात चंद्रकांत दादा यावा आणि जा बाई जा इंग्लिश स्पिकिंगचा तास लाव जा नाहीतर ज्या मास्तरड्याने इंग्लिश शिकवले त्याचं नरडं तरी आवळ जा असे म्हणावे वाटते. 

देवा सर्वांना इंग्लिश नीट लिवायची सुबुद्धी दे ! 🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं