मांसाहारी जाहीरातीचा स्वागतार्ह निकाल

काही जैन संस्थांनी टीव्हीवर मांसाहार आणि त्याच्याशी संबंधित  जाहिराती टीव्हीवर दाखवायच्या बंद करा अशी मागणी हायकोर्टात केली.

 आज हायकोर्टाने ती याचिका कोलवली म्हणजे फेटाळली. 

मूळात अशी मागणी करण्यात काहीच अर्थ नाही. त्याहीपेक्षा वाईट हे आहे की या अशा उटपटांग मूर्खपणामूळे आपण किती अडाणचोट आहोत याचे जंगी प्रदर्शनच भरवले जाते आणि त्याचे अनेक सामाजिक परिणाम होऊ शकतात.


मूळात अशा लोकांना जैन धर्म काय याची समजच नसते आणि त्यातून अशा हरकती ते करत बसतात. वरून यांनी वैयक्तिकरित्या काहीही करावे मात्र त्यात धर्माचे नाव बदनाम करू नये. 

जैन धर्मात मांसाहार करणे वर्ज्य आहे, मात्र ईतर काही धर्मांत जातीत मांसाहार चालतो. मांसाहार म्हणजे हिंसा. मात्र हिंसा हि फक्त प्राण्यांच्या कत्तली पूरती मर्यादित नसून अजूनही अनेक हिंसेचे प्रकार आहेत. 



शारिरीक हिंसा, मानसिक हिंसा, सामाजिक हिंसा, आर्थिक शोषण अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात. मात्र काहींना हिंसा अहिंसा ही प्राण्यांच्या कत्तलीपूरती मर्यादित आहे असे वाटते.

आपण आपल्यापूरता धर्म पाळावा. टीव्हीवर मांसाहाराची जाहिरात दाखवल्याने तुमचे नेमके काय दुखते ? हेच कळायला मार्ग नाही. 

रस्त्यावर अनेकदा आपल्याला भटकी जनावरं दिसतात. ती शेण घालतात, ते शेण आपल्याला दिसतं. म्हणून आपण शेण खातो का ? आपण खाणारच नाही शेण. 
पण आपण शेण खात नाही म्हणून जनावरांनी हागण्याचे बंद करावे का ? त्या बिचाऱ्या जनावरांनी शेण घालूच नये का ?
(मांसाहाराची शेणाशी तुलना करण्याचा कोणताही उद्देश नाही.)

टीव्हीवर जर जाहिरात बघून जर आपल्या भावना दुखवत असतील , चाळवत असतील, आपल्याला घेण येत असेल तर टीव्ही बघूच नका. (आज न्यायालयानेही हेच सुनावले आहे.) 

ह्या बावळट लोकांच्या भावना दुखावण्या एवढ्या भावना कमजोर कशा हाच प्रश्न पडतो. मूळात जैन तत्वज्ञान ज्या कुणाला नीट माहित आहे ते असा हलकटपणा कदापि करणार नाहीत. मात्र उथळ लोकांना काहीही करून शहाणपणा गाजवण्याचा ठेका आपणच घेतल्याचा समज झाले असतो आणि त्यातून हे सगळं घडत असतं. 

आता ह्या याचिकाकर्त्या लोकांच्या आडनावावरून कल्पना यावी ते कुठले असतील. मात्र महाराष्ट्र विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जैन समाज हा गावगाड्याशी एकरूप होऊन आपले जीवन जगत आहे. एकमेकांचे रोजच्या जीवनात सर्व व्यवहार निभावून आपला धर्मही हे सर्व पाळत आहेत. त्यात कुणी कुणाला दोष न लावता गुण्यागोविंदाने सर्वजण नांदत असतात. ती वीण उसवायची, सामाजिक एकोपा भंग करायचा काम हे अशा उद्योगाने नकळत होऊ शकतं. 

मात्र असे काही महाभाग असतात, त्यांच्याकडे पैसापाणी भरून असतो. टाईमपाससाठी अशी काहीतरी मजा करत असतात. ज्याला पोटाची भ्रांत आहे त्याला असे रिकामटेकडे उद्योग सुचतच नाहीत. 

बाकी काही असो, न्यायालयाने याचिका फेटाळून अशांना जम्यात धरलं नाही हे एक बरं केलं. न्यायालयाने खरंतर टाईमपास केला म्हणून जबरी दंडही ठोठावायला हवा होता. तरी किमान आलेला निकालही स्वागतार्ह आहे. 

स्वागतार्ह अशासाठी कारण आता देशभरात सामाजिक ध्रुवीकरण जोरदार चालू आहे, अशा दोनचार उडाणटप्पू लोकांना पुढे करून काहीतरी वेगळा कार्यक्रमही राबविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं