राजू शेट्टींचे अभिनंदन !



स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टींनी आज महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. आपण आता स्वतंत्र असल्याची घोषणा केली. 

ऊसपट्टा सोडला तरीही राजू शेट्टींना माननारा मोठ्ठा वर्ग महाराष्ट्रातंच नाही तर पुर्ण भारतात आहे. १००-२०० देशभरातील शेतकरी संघटनेत त्यांना मानाचे स्थान आहे. एक टर्म आमदारकी दोन टर्म खासदारकी आणि त्यानंतर पराभव. 

२०१४ ला त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपासोबत युती केली, नंतरून भाजपची भूमिका पटली नाही म्हणून ते तडकाफडकी बाहेर पडले. पुढे जाऊन २०१४ च्या लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली. या आघाडीत येणे काही त्यांच्या पथ्यावर पडले नाही. जवळपास लाखभर मतांनी त्यांचा पराभव झाला. 

या पराभवाला अनेक कारणे जरी असली तरी मुख्य कारण हेच कि , शरद पवारांना विरोध करणारे शेट्टी परत त्यांच्याजवळ गेले हे लोकांना पटले नाही. त्यामूळे निवडणूकीच्या तोंडावर सेनेत आलेल्या धैर्यशील मानेंनी त्यांचा पराभव केला. 

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना राजू शेट्टी स्वतंत्र असावेत हेच नेहमी वाटायचं. खरतर राजू शेट्टींनी कुणाशीही जवळीक करू नये हि त्यांची भूमिका असते. 

आज वाढलेली महागाई , रासायनिक खतांचे वाढते दर, शेतीसाठी वाढलेला सर्व खर्च यामूळे भारतीय जनता पक्षावर शेतकऱ्यांचा राग आहे. तसेच महागाईने शहरी जनताही त्रस्त आहे त्यांचाही भाजपवर रोष आहे. 

तसेच वीजतोडणी वगैरे कारणांवरून महाविकास आघाडीवरही शेतकऱ्यांचा राग आहे. त्यात परत दोन टप्प्यांत ऊसाचे बील असे मुद्दे आहेत.  


राजू शेट्टींनी महाविकास आघाडी देत असलेल्या आमदारकीला लाथ हाणली आहे. अशी हिमंत सहसा कुणी दाखवत नाहीत. देशभरातील शेकडो शेतकरी संघटनेंच्या गटाचे प्रतिनिधीत्व करणारे शेट्टीसाहेब भाजपा सोबत परत जाणारही नाहीतंच. कारण देशभर भाजपाविरोधी प्रमुख नेत्यांत त्यांना मानाचे स्थान आहे. त्यामूळे भाजपला त्यांनी आधीच डावातून डीस केलंय. तसेच महागाईने त्रस्त असणाऱ्या शेतकरी वर्गातल्या भाजपविरोधी रोषाची त्यांना कल्पना असल्याने कुणी जर म्हणत असेल कि ते भाजपात जाणार किंवा भाजप त्यांना राज्यसभा देणार हे काही तेवढे खरे वाटत नाही. शेतकऱ्यांसाठी ते राज्यसभाच काय केंद्रीय मंत्रीपद दिलं तरी त्याला लाथ घालतील असे शेट्टीसाहेब आहेत. त्यामूळे राज्यसभा वगैरे अफवा गोष्टी आहेत. मुद्दामहून विरोधक अशा गोष्टी पेरत असावेत. 

राजू शेट्टींचा स्वाभिमान हिच त्यांची ताकद आहे. राजू शेट्टींनी आज सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वतंत्र आहोत. असे जर ते स्वतंत्र राहिले तर लोक पुन्हा डोक्यावर घेऊन नाचतील !

 जी चळवळ टिकवायची म्हणून आवाहन करावं लागतं होतं ती चळवळ टिकेल , वाढेल आणि सत्ताधाऱ्यांना घाम फोडेल ! 

राजू शेट्टीसाहेब यांच्या नव्या कारकीर्दीस मनःपूर्वक शुभेच्छा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं