कसबा पेठेतील भाजपचा पराभव का आनंददायी आहे?

भाजपचा पराभव का आनंददायी आहे?

गिरीश बापट या नेत्याने भाजपसाठी खूप काही दिलं.
 मात्र त्यांची प्रकृती गंभीर असूनही भाजपने त्यांना प्रचारासाठी ओढत आणलं अॉक्सिजनसह. 
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोघांनाही अत्यवस्थ असतानाही राज्यसभा निवडणुकीसाठी नेलं होतं 




भाजप हा विकृत आणि किळसवाणा सत्तापिसाट पक्ष आहे. त्यांना कोणाच्याही प्रकृतीपेक्षा सत्ता महत्वाची वाटते‌. गोव्यातही मनोहर पर्रीकर यांना अशाच अवस्थेत फिरवलं होतं. हे झालं अत्यवस्थ रुग्णांच्या बाबतीत .

हे लोक इतके नीच आहेत कि, मृत्यू झालेल्या वाजपेयींच्या अस्थिंनाही देशभर हिंडवून त्यातून राजकीय वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता‌. 

निवडणूकीत जय-पराजय होत असतात. मात्र आज भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करूनही तो पडला म्हणून गिरीश बापट यांना काय वाटत असेल? हा विचार केला तर प्रचंड वाईट वाटतं. पण या नीच कपटी लोकांना त्याची लाज वाटली असेल कि नाही हे त्यांनाच ठाऊक! 

भाजपने सर्व नीती मूल्यं पायदळी तुडवून कपटी, खूनशी, सूडबुद्धीचं किळसवाणं राजकारण करायचा पायंडा पाडलाय तो समाजाला विकृतीकडे नेणारा आहे. आज बापट आणि त्यांच्या कुटुंबीयांना फडणवीस आणि रासणे यांच्यापेक्षा वाईट वाटत असेल 

बापटांना निवडणूकीत उतरवून ही निवडणूक भावनिक करायचा प्रयत्न केला, एका मूस्लिम व्यक्तीच्या बोलण्याचा विपर्यास करून धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न करूनही भाजपला पराभव पत्करावा लागला‌. हे नीच पातळीचं राजकारण करणाऱ्या भाजपला जनतेनं दिलेली चपराक आहे 

म्हणूनच कसबा पेठेतील निवडणूकीत भाजपाचा पराभव नैतिकता समाजात टिकून असल्याची ग्वाही देणारा निकाल आहे.

 धंगेकरांसाठी राबणाऱ्या सर्व हातांना सलाम !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं