जुनी पेन्शन आणि भाजपाचे कंगाल धोरण!

आज सर्व सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचे कारण म्हणजे सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन साठी आग्रही आहेत. 

भाजप सरकार हे सर्वसामान्य जनतेकडे पैसा राहिलाच नाही पाहिजे या मानसिकतेत असते. मग त्यांनी शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, छोटे व्यावसायिक अशा सर्वांना गेल्या आठ वर्षांत देशोधडीला लावण्याचे कामच केले.


आता त्यांच्या निशाण्यावर सरकारी कर्मचारी आले आहेत. सरकारी कर्मचारी कोण आहेत? 
सरकारी कर्मचारी हि लोकंही सर्वसामान्य घरातूनच पुढे गेलेली आपलीच लोकं आहेत. जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत त्यांना महागाई भत्ता, निवृत्ती नंतर अर्धा पगार आणि यदाकदाचित मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना मदत हि आजवर चालत आलेली योजना होती. 

समाजात सर्वच वर्ग देशोधडीला लागले असताना त्यातल्या त्यात ज्यांचं बरं चाललंय असा वर्ग म्हणजे सरकारी कर्मचारी वर्ग. 

आता भाजप सरकारने त्यांनाही देशोधडीला लावायचं मनावर घेतलं आहे. त्यामुळे हि पेन्शन योजना बंद करायचा घाट घातला जात आहे म्हणून सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. 

एका सरकारी कर्मचाऱ्याच्या मागे त्याचे कुटुंबीय असते त्यालाही लेकरेबाळे असतात, सर्व जबाबदारी पार पाडावी लागते. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना जेवढा पगार मिळतो तेवढा चतुर्थ श्रेणी कर्मचारी लोकांना मिळतो असा नाही. या लोकांचे निवृत्ती नंतर जगणे पेन्शन मुळे सुसह्य होते मात्र जर जुनी पेन्शन योजना बंद झाली तर ह्या लोकांचे हाल कुत्रा खाणार नाही.

सरकारी कर्मचारी म्हणजे हलकट, पैसेखाऊ, उर्मट अशी प्रतिमा असली तरीही जनतेसाठी अहोरात्र एक रुपयाचा मोबदला न घेता काम करणारे कर्मचारी ही आहेत. मात्र समाज बोटावर मोजण्याइतपत नालायक अधिकाऱ्यांमुळे इतरांनाही त्याच नजरेने बघतो. 

सर्व सरकारी कर्मचारी हे कोण आहेत? हे देखील सामान्य घरातूनच अभ्यास करून कष्ट घेऊन मोठे झालेले आहैत. कोरोनासारख्या महामारीत जीवाची पर्वा न करता लोकसेवेला वाहून घेतलं होतं. कित्येक लोक त्यात जीवानीशी गेलेत. ही सर्व जमेची बाजू एका बाजूला आहे.

आणि दूसऱ्या बाजूला भाजपने माध्यमांच्या मदतीतून त्यांची केलेली बदनामी. अशा कात्रीत ते सापडले आहेत. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आज सरकारी कर्मचारी लोकांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे. 

नाहीतर उद्या अदाणी अंबानी सोडून सगळा देश कंगाल होणारच आहे, त्यात सरकारी अधिकारी कर्मचारी लोकांची तेवढी भर पडेल. आणि भाजप सरकारबद्दल प्रेम असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपली पेन्शन योजना सोडून द्यावी. जसं लोक गॅस सबसिडी सोडून देत होते तसं. बाकीच्या लोकांनी लढाई चालू ठेवावी. 

लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है ?

सर्वांच्या घराला भाजप आग लावणार आहे, त्यामुळे सरकारी अधिकारी कर्मचारी, पोलिस लोकांनाही विनंती आहे जेव्हा शेतकरी, सर्वसामान्य लोकं आंदोलन करत असतात त्यावर त्यांच्यावर लाठी काठी उचलताना, कायदेशीर अडकविता त्यावेळी हजारदा सहानुभूती ने विचार करा. सरकारं कधीही तुमच्यासाठी येणार नाहीत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं