'न ठरवता' झालेला दणणीत विजय !

२०१९ च्या लोकसभेला पराभव, २०१९च्या विधानसभा निवडणूकीत पराभव, 2021  मध्ये झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत पराभव, त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणूकीतून माघार.

अशा सलग पराभवांच्या मालिकेने कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गट शांत झाला होता.
 एक निराशा त्यांच्यात दाटली होती. 

सांगली, सोलापूर जिल्ह्यात जरी त्यांच्या गटाचा प्रभाव असला तरी कोल्हापूर हिच या महाडिक गटाची खरी पॉवर. तिथे होणाऱ्या सततच्या पराभवाने गटाला ब्रेक लागला होता. 

 मात्र तिकडे कोकणात मॉन्सूनचं आगमन झालं आणि ईकडे खासदार धनंजय महाडिकांचं आगमन झालं. आणि काही काळ शांततेत असलेल्या या गटाला नवसंजीवनी मिळाली. 

कोल्हापूरात गेले ३ वर्ष सारं काही एकतर्फी होऊ लागलं होतं, त्यातून काहीही खेळ सुरू होते. कुठलेही हिशेब करणे, जुने वाद उकरणे, नव्या नेत्यांना हकनाक त्रास देणे, मुद्दामहून सहकारी संस्थांत निवडणूक लावणे, ठराविक जागा बिनविरोध करून काही जागेवर झुंजी लावणे असा काही उद्योगही चालू होता. 

मात्र यावर ईलाजही नव्हता. कारण महाडिक नव्हते, दूसऱ्या बाजूला महाडिक असतील तर संतुलन साधतं. 

आता अनेक कोल्हापूरातील आणि जिल्ह्यातील नेत्यांना एक आधार मिळाला तो आधार म्हणजे महाडिक. 




महाडिकांच्या घरी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता भाजप असे चारही पक्ष झाले. असा आरोप होतो, ते खरंही आहे. काहीजण म्हणतात कि विचारधारा वगैरे ? खरंतर विचारधारेनं काम करायची किंवा राजकारण करायचं म्हणटलं तर ते कधीच शक्य होत नाही आणि सध्याच्या काळात तर नाहीच नाही. 

महाराष्ट्रात अनेक पक्षांतरं केलेल्या अनेक नेत्यांची नावं सांगता येतील. कित्येकांनी पक्षांतरं केली म्हणून ते निवडणूकीत हरले का ? निवडून येणं हेच खरं मेरीट. 

ज्याला निवडून यायची खातरी असते तो कोणत्या पक्षाला बांधिल नसतो. 

धनंजय महाडिक हे ऐन मोदीलाटेत राष्ट्रवादीकडून खासदार झाले होते. त्या पाच वर्षाच्या कारकीर्दीत त्यांना दोनतीनवेळेला संसदरत्न पूरस्कार मिळाला, भिमा कृषीप्रदर्शन, महाडिक युवाशक्ती, महिला बचत गट माध्यमातून ते वेगवेगळे उपक्रमही राबवत असतात. असा त्यांचा गट आणि स्वतः ते सक्रीय असतात. 




आता त्यांच्या राज्यसभेवर जाण्याने गटासह, जिल्ह्यातील दूसऱ्या बाजूच्या फळीलाही एक समाधान वाटलं आहे. कोल्हापूर महानगरपालिका, जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हापरिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूका तोंडावर आलेल्या आहेत. अशा वेळी महाडिक गट सक्रीय झाल्याने अनेक लोक ताजेतवाने झाले आहेत. काहीजण मनातल्या मनात खूश आहेत. पुढचं पुढं काय व्हायचं ते होईलच.

महाडिकांचा हा 'न ठरवता' झालेला विजय कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात बदल आणणारा असेल. 

विजयाबद्दल खासदार धनंजय महाडिकांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं