शिखरजी जैन समाज आणि भाजप

भाजपची वापरून फेकून देण्याची नीती काही नवीन नाही. जैन आणि विशेषतः जैन समाजातील एक पंथ नेहमी भाजपाचं समर्थन करण्यात आघाडीवर होता आणि अजूनही आहे. 



२०१४ साली एका जैन उद्योजकाने आपले हेलिकॉप्टर तत्कालीन भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना दिलं होतं. शिवाय बड्या व्यापाऱ्यांनी बक्कळ फंडींग केलं होतं. 

आज तीच भाजप जैन धर्माच्या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा देतीय आणि त्याविरोधात जैन समाज रस्त्यावर उतरतोय. 

एका जैन मुनींनी तर नरेंद्र मोदींची वारेमाप स्तुती केली होती‌. एका मुनीने आरएसएसचे संचलन लीड केले होते. 

मग तुम्ही ज्याचे समर्थन करता तेच तुमच्या धर्माच्या विरोधात भूमिका घेत असतील तर तुम्ही त्यांना थेट विरोध करायचं हि ठाम आणि स्पष्ट भूमिका घ्यायला हवी‌.

कोणतीही भूमिका हि राजकीय असते. अल्पसंख्याक जैन धर्माला दुखावलं तर बहुसंख्येने असलेल्या इतर धर्मियांना भाजपा आपल्याकडे वळवून घेण्यात यशस्वी होते. हे भाजपाचे ध्रुवीकरण करून मतं फोडण्याची नीती जैन समाजाने ओळखायला हवी.

आणि यापूर्वी केलीय तशी भाजप ला मदत न करता विरोधी भूमिका घ्यावी तरच ते वठणीवर येतील. मात्र आता ती ही शक्यता कमी आहे, भाजपाकडे पैसा आणि इतर संसाधने गेल्या आठ वर्षांत चिक्कार आली असल्याने त्यांना आता व्यापाऱ्यांच्या पैशांची विशेष गरज नाही. 

ज्यांच्या जीवावर मोठं होतात त्यांनाच स्वतः ताकदवर झाल्यावर संपवतात हा भाजपाचा इतिहास आहे. 

त्यात जैन धर्मिय हे कुठेही एकगठ्ठा प्रभावी ठरतील एवढी लोकसंख्या नाही. त्यामुळे या धर्माला दुखावलं तर फारसा फरक पडणार नाही हे गणितही भाजपाने घातलं असणारच‌. 

त्याशिवाय त्यांची सातत्याने पाठराखण करणाऱ्या समाजाला दुखवायचं धाडस त्यांनी केलं नाही. 

मोर्चे होतील, होत राहतील मात्र याचवेळी फक्त एक चुकून आलेला निर्णय इतपत हे मर्यादित नाही तर अल्पसंख्याक धर्माला दुखवून, ध्रुवीकरण करून बहुसंख्यांक धर्माची मते गाठीला मारण्याचं राजकारण होतंय आणि त्याला उत्तर हि राजकीयच असावं तरच काही फरक पडेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं