राहूल गांधीने बदलवलेलं वातावरण

राहूल गांधींच्या परवाच्या भाषणानंतर देशभरात एक वातावरण बदललं गेलं आहे. ज्या समाजमाध्यमांवर त्याची पप्पू म्हणून निंदानालस्ती झाली तिथेच आज तो झळकत आहे. तरूण तरूणी त्याची भाषणं शेअर करत आहेत. 
आजची महागाई, बेरोजगारी, गरीबी आणि मुठभर लोकांचं अतिश्रीमंत होणं ह्या देशापुढील समस्या त्याने मांडल्या.


त्याला काऊंटर म्हणून अनेक मोदीभक्त काल पंतप्रधानांच्या भाषणाकडे डोळे लावून बसले होते. मात्र मोदींना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्तर देता आलं नाही. कालचं पंतप्रधानांचं भाषण हे भाषण न होता वायफळ बडबडी पलिकडे काही नव्हतं.

ज्या देशांत जाईल तिथे जंगी स्वागत, बँडबाजा, गच्च मिठी यापलिकडे आपल्याला विशेष काही दिसलं नव्हतं मात्र जेव्हा मोदींचा परदेश दौरा झाला तेव्हा अदाणीसाठी काहीतरी हमखास गिफ्ट त्यांनी दिलंय. हेच राहूल गांधी याने सांगितले.

अग्निवीर भरती होत आहे ती नोकरी फक्त ४ वर्षांसाठी असेल तिथून हे शस्त्रास्त्र प्रशिक्षित युवा समाजात येथील तेव्हा इथे हिंसा वाढली तर त्याला कोण जबाबदार? या महत्त्वाच्या प्रश्नाकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधलं. 

कुणी काही म्हणो मात्र मोदींकडे अनेक प्रश्नांची उत्तरे नाहीत. अदाणींसाठी कायद्यात बदल केले गेले. त्यांना फायदा पोहचावा यासाठी हेतुपूर्वक प्रयत्न स्वतः मोदींनी केले मात्र राहूलने त्यांना देशासमोर उघडं पाडलंय. 

देशांतर्गत तपास यंत्रणा ह्या फक्त विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापरल्या जात आहेत. त्याच यंत्रणांनी आदेशावरून अदाणींच्या कारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यामुळे हिंडेनबर्ग सारख्या परकीय लोकांनी अदाणींना उघडं पाडून आंतरराष्ट्रीय स्तरावर अदाणींची आणि त्यासोबतच भारत देशातील तपास यंत्रणांची अब्रू वेशीवर टांगली. 

मोदी -अदाणी युतीवर राहूल बोलताना चारदोन भाजप खासदार सोडून बाकीचे निवांत होते, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही विशेष अडचण केली नाही त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते काहीही बोलू शकतात अशी पुस्ती जोडून वाट रिकामी करून दिली हे बघता भाजपातील ईतर लोकही मोदींवर नाराज आहेत हे दिसून येतं. 

लोकसभेत काँग्रेस हि भाजपच्या चार आणे आहे मनात आणलं असतं तर भाजपच्या बारा आणे खासदारांनी गोंधळ घालून संसद बंद पाडायला हवी होती पण तसं झालं नाही त्यांनीही एका अर्थाने राहूललाच मोदींविरुद्ध प्रतिनिधित्व दिलंय असं दिसतं लोकसभेला एक वर्ष बाकी आहे त्याआधीच चांगली वातावरण निर्मिती होत आहे हे वातावरण टिकलं तर काँग्रेस सत्तेत यायला वेळ लागणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं