राहूल गांधी आणि सततचा पराभव!
अनेकांना वाटत असते की, राहूल गांधींनी निवडणूका जिंकाव्या. काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटणे साहजिक आहे. पण असेही लोकं जे काँग्रेसशी संबंधित नाहीत पण राहूल गांधींचं भलं व्हावं वाटतं त्यांचीही इच्छा असते. दरवेळी निवडणूक येते. वातावरण तयार होतं आणि निकालादिवशी वेगळं चित्र निर्माण होतं. निकालादिवशी गोदी मिडीयातले पत्रकार लोकं विश्लेषण करताना अमुक तमुक जातीची मतं कशी भाजपनं बांधली, मोदींनी अमुकतमुक देवाचा, संप्रदायाचा कसा उल्लेख केला आणि त्याचा कसा निवडणुकीत फायदा झाला. तसेच अमित शहांची चाणक्य निती, अमित शहांनी कशी बंडखोरांची समज काढली. अमित शहांनी कसे एखाद्या अपराध्याला पाठीशी घातले, अमित शहांनी डेरा टाकून कशा बैठका घेऊन नियोजन केलं. हे सगळं ऐकून इतक्या सवयीचं झालं आहे की, निवडणूक फक्त मोदी शहांनी लढवावी आणि राहूलनी फक्त पराभव होत रहावं आणि दोन कवडीची किमंत नाही अशा गोदी मिडीयातील लोकांकडून आत्मचिंतन करण्याचे सल्ले ऐकून घ्यावेत हे सवयीचे झाले आहे. आता तुम्हाला मला कुणालाही कळतं ते राहूल गांधी आणि त्यांच्या सल्लागारांना नसेल का कळत? अमुकतमुक भोंदू बाबाच्या संप्रदायाची इतकी मतं...