राजकीय कार्यकर्त्यांची हुशारी

राजकीय कार्यकर्ते ही हूशार जमात आहे. 
मध्यंतरी कुठलाही राजकीय नेता आला की JCB वरून झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या उधळत असत. 

आता ते चित्र फारसे दिसत नाही. 
कारण झेंडू झालाय महाग. आता ते परवडत नाही. 

मध्यंतरी फुलं उधळायचे तेव्हा दर होता ५-१० रूपये किलो. उकीरड्यावर नेऊन फुलं उधळण्यापेक्षा आपल्या दलिंदर नेत्यांवर उधळावेत असे कार्यकर्त्यांना वाटत असावे. 

कार्यकर्ते नेत्याचा रिस्पेक्ट करतात वगैरे समज असला तर तो गैर आहे हे लक्षात घ्यावे. कार्यकर्ते अफाट हूशार असतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?

विखे -लंके आणि राहूल गांधी