शाकाहार -मांसाहार आणि पर्युषण पर्व

शाकाहार मांसाहार हा वाद सालाबादप्रमाणे यावर्षीही पर्युषण पर्वाच्या तोंडावर चालूच राहीलाय. 

हा हलकटपणा आहे. तुमचा धर्म तुम्हाला शाकाहारी राहायला सांगतो तर तुम्ही शाकाहारी स्वतः रहा. त्याचं जे पाप किंवा पुण्य असेल त्याचा हिशोब तुमच्यासाठी होईल. 

कोणत्याही दूसऱ्या माणसाला शाकाहारी व्हा म्हणून सांगायची नेमकी गरज काय आहे? दूसरा जे काही खाईल ते खाऊ दे. दूसऱ्या व्यक्तीला त्याचं वेगळं मत असू शकतं हे मान्य करावं. हे जैन धर्मातील अनेकांत वाद सांगतो. 

दूसऱ्याला त्याचं मत आहे. त्या मताचा सन्मान करावा हे जैन धर्म सांगून बसलाय. असेही सर्वांचेच पुर्वज मांसभक्षण करत होते. त्यांचेच आपण सगळे विश्वातले लोक वंशज आहोत. 

त्यामुळे दूसऱ्याला मांसाहार करण्यापासून रोखणं. मांस विक्री बंद करा म्हणने हेच मूळात जैन धर्माच्या विरोधात जाण्यासारखे आहे. 

दूसरा व्यक्ती मांसाहार केल्यानं आपलं काय बिघडणार आहे? त्याचं जे पाप पुण्य असेल ते त्याला लागेल. 

उद्या आपण मांजर,कुत्रा,वाघ, सिंह यांना पण शाकाहारी करायचा शहाणपणा करणार काय? 
नसत्या उठाठेवी करून ह्या लोकांना वाटतं की आपण जैन धर्म कट्टरतेने पाळतोय. पण या ठराविक लोकांचे वागणेच धर्म विरोधी आहे. 

हे धर्म वगैरे पाळणे हा दिखावा आहे. मूळात या वागण्याच्या तळाशी जाऊन शोध घेतला तर पैसा आणि सत्तेतून आलेली गुर्मी आहे. हे सगळे लोक जैन धर्म न समजलेले लोक आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?

विखे -लंके आणि राहूल गांधी