भक्तांना भारत समजला नाही.



पहलगाम हल्ला हा भारतावर झाला होता. तिथे अतिरेक्यांनी धर्म विचारला. धर्म विचारून हत्या केली. 
यात मध्ये पडणाऱ्या काश्मिरी मूसलमान व्यक्तीलाही मारलं. 

भाजपच्या अधिकृत ट्विट हँडलवरून घिबली फोटो करून धर्म पुछा जाती नाही करून जाहिरात करण्यात आली. 

तिथे ज्यांच्या कुटूंबीयातील लोक मृत्युमुखी पडले होते. त्या कुटुंबातील लोकं सांगत होते काश्मिरी मूसलमान लोकांनी आमची मदत केली. 

पण भक्तांना आपला अजेंडा राबवायचा होता. त्यांनी मूसलमान समाजाविरुद्ध गरळ ओकायला सुरवात केली. 

मूसलमानावर आर्थिक बहिष्कार टाका अशा स्वरुपाची जाहीरात केली. अनेक मिसरूड न फुटलेली पोरं ही इंस्टाग्रामवर अशा प्रकारचे रील्स पसरवत होते. 

ह्या दहशतवादी कृत्याला तडाखेबाज उत्तर आमच्या शूर जवानांनी दिलं. सिंदूर ऑपरेशन करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. 

त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यासाठी आल्या व्योमिका सिंह आणि सोफिया कुरेशी! 

सोफिया कुरेशी मूस्लिम. इकडे राजकीय बाजूला असदुद्दीन ओवेसी हे कमान सांभाळत होते. त्यांनी पाकिस्तानला लायकी दाखवून दिली. 
ओवेसींना अख्ख्या देशाने डोक्यावर घेतल्यानंतर द्वेषभक्त थंडावले. 

भक्तांना भारत देश समजला नाही. 




साधं आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घ्या. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश. 

कितीतरी भौगोलिक विविधता आहे. कोकणातला आंबा, पश्चिम महाराष्ट्रातील ऊस, मराठवाड्यातील ज्वारी बाजरी, विदर्भातील कापूस संत्रे. कितीतरी विविधता आहे. 

तशीच ती विविधता जातींची आणि धर्मांचीही आहे. 
वेगवेगळ्या जाती धर्मात वेगवेगळ्या पद्धतीचे अन्न शिजवले जाते. त्यांच्या शिजवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. उदा अनेक जातीतील मटणाची चव जातीनुसार बदलते. मराठ्यांच्या घरचं वेगळं, धनगरांच्या घरचं वेगळं, मूसलमानांच्या वेगळं आणखीन व्हेज मटण खाणारे तर लैच निराळे. 

कोकणातले समुद्रात मिळणारे मासे वेगळं, नदीत सापडणारे वेगळे. 

खाण्याच्या पलिकडे पेहरावातील विविधता. टोप्यांची विविधता, कुणी गांधी टोपी घालतो, कुणी फेटा बांधतो, कुणी जाळीची टोपी घालतो. 

अशा अनेक विविधता आहेत. 
सगळ्यांची भाषा मराठी पण टोन किती वेगवेगळे. सगळ्या भागातील शिव्या देखील किती वेगवेगळ्या. 

अशी विविधता ही फक्त महाराष्ट्रातील आहे. देशभरात तर चिक्कार विविधता आहे. 
वाळवंटही आहे आणि समुद्रही आहे. 

पण भक्तांना एकच हवं आहे सगळं. त्यासाठी त्यांची रड असते. 

तुमचे सगळ्या जाती धर्मांत मित्र असतील तर ते तुमच्यासाठी फायद्याचं असतं. त्यांचे विचार नेमकं काय? त्यांची अडचण नेमकी काय? हे लक्षात यायला मदत होते. 

तुमचे सर्वधर्मीय मित्र असतील तर त्यांच्या जातीधर्मात काय चालतं. घरात काय शिजते, हे सगळं बघायला मिळतं. व्यवहार वाढतो बंधुता वाढते स्वतः ही माणूस अनुभवाने समृद्ध होतो आणि देशही समृद्ध होत असतो. 
राहूल गांधी हेच म्हणतो नफरत छोडो भारत जोडो! 

महात्मा गांधी यांची पत्रं मध्यंतरी वाचत होतो. त्यावेळी एक गोष्ट जाणवली बापूचे सगळ्या जाती धर्मात दोस्त होते. सगळ्यांशी बापूचा डायलॉग होता. 
बापू स्वतः शाकाहारी पण जेव्हा सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान बापू कडे आले तेव्हा त्यांना मांसाहाराची व्यवस्था बापूने केली होती. 

बापू, चाचा नेहरू, पटेल त्याकाळातील लीडरशीपला देश समजलेला होता. 
त्यांच्या विचारांनीच देश इथपर्यंत आलाय याची जाणीव प्रत्येकाला हवी.

एककल्ली विचार करणाऱ्यांची संख्या वाढत असताना ह्या देशाची विविधता टिकवणे हीच खरी देशभक्ती आहे. त्यासाठी सगळ्यांनी म्हणजे ज्याला देशावर प्रेम आहे त्याने प्रयत्न करायलाच हवेत. 

आता समजा जैनांनी जैन धर्मातच व्यापार उदीम करायचं ठरवलं तर अदाणी कधीतरी भारताचा एक नंबरचा उद्योगपती होऊ शकला असता का? 

बहिष्कारासारखा संकुचित विचार करणे हा खरा देशद्रोह आहे. त्याने कुणाचेही भले होत नाही. देशाचेच वाटोळे होते. 

भक्तांनी थोडंफार Whatsapp विद्यापीठाच्या बाहेर पण एक जग आहे. तिथं फिरावं. तिथे खरा भारत देश आहे. 

देशातील लोकांच्या विरोधात द्वेष उगाळणे बंद करावे. 

नफरत छोडो 
भारत जोडो! ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं