भारत आणि ऑलिम्पिक पदकं

आपल्याला आजवर 4 मेडल मिळाले त्यात एकही गोल्ड नाही आणि सिल्व्हर नाही. बाकी देशाकडे पाच पटीने गोल्ड मेडल आहेत. हि गोष्ट खरी असली. 
तरी येणारा काळ आपला असेल. 
आपला अविनाश साबळे हा सहभागी झाल्यावर किंवा मेडल मिळाल्यावर स्टीपलचेस नावाचा खेळ असतो हे कळालं. बीड जिल्ह्यातील खेडेगावातील मुलगा त्यात पदक मिळवतो ज्या खेळाचे नाव 90% भारतीयांना माहीतही नसेल. 

पण डेडिकेशनने खेळणारे मनू भाकर, स्वप्नील कुसाळे यांनी पदक मिळवले. आपला अविनाश साबळे पात्रता फेरीत टिकला. नंतरून पदक नाही मिळाले. सुरवातीला खेळ चांगला होतो आणि नंतरून आपले बहुतांश खेळाडू ढेपाळतात ही सत्य परिस्थिती आहे. त्यासाठी युरोपियन देशात विशेष ट्रेनिंग असतं. ते ज्या पद्धतीने खेळाडूंवर विश्वास दाखवतात तेवढी चांगली व्यवस्था आज तरी नाही आपल्याकडे. 

आपला देश स्वतंत्र होऊन 75 उलटून गेले तरीही फारसं आपण सर्वच क्षेत्रात नवीन काही करत नाही. किंवा तशा नवनिर्माण करण्याला पोषक वातावरण नाही. पोटार्थी शिक्षण आहे. इथल्या बड्या कंपन्यांना नोकरदार, कामगार, मजूर पुरवण्याचे काम आपली शिक्षणव्यवस्था करते. 

माझे अनेक मित्र खेळाडू होते. पट्टीचे खोखो खेळणारे होते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्यांच्या मॅचेस असायच्या तिथं शाळा बुडवून जायचो. खूप अपेक्षा असायच्या. आणि तेही खूप कष्ट घ्यायचे. मात्र शेवटी त्यांचा खेळ हा मरून पडला. खेळ हा त्यांना कुठेच जीवनात पोटासाठी उपयोगी ठरला नाही. 

त्यामुळे पुढच्या पिढ्या कचखाऊ झाल्या. 

पण आज देशात लोक खास मुलांना खेळासाठी तयार करत आहेत. पाहिजे त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहेत आणि हे हळूहळू वाढत जाणारं आहे. 

आज आपल्या ज्या खेळाडूंना 4-5-6-7-8-9-10 नंबरवर समाधान मानावे लागले हे ते पुढे जाऊन 1-2-3 नंबर वर येणार आहेत. 

माझ्या शाळेच्या सर्टिफिकेट वर खाली एक वाक्य लिहलेलं होतं. 'स्पर्धात्मक चढाओढीतून जी बीजे रोवली जातात ती कालांतराने सुफलीत होतात ' आपल्या देशासाठी या स्पर्धा बीज रोवणाऱ्या आहेत. त्याची झाडं फुलं आणि मग फळं कालांतराने मिळणार आहेत. ती सोन्याचांदीची फळं काही वर्षांनी येतीलही पण त्यांची बीजं हे खेळाडू आज रोवत आहेत हेही लक्षात घ्यावं. त्यांना यश मिळालं नसलं तरी नाउमेद तरी देशाने करू नये. त्यांचे प्रश्न प्राधान्याने सरकारने सोडवायला हवेत. 
8Augast

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?

विखे -लंके आणि राहूल गांधी