हातकणंगलेचा किंग मेकर कोण?
हातकणंगले लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत घासून जाणारी ही निवडणुक सर्वच महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाली होती.
विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना आपली जागा राखण्यात यश आलं. या यशानंतर मानेंना सहकार्य करणाऱ्या अनेकांनी किंग मेकर ची जाहिरात सुरू केली.
आणि ती साहजिकच आहे. अटीतटीच्या लढतीत एक एक मतदान महत्वाचे असते आणि प्रत्येक जण किंग मेकर असतोच असतो. पण खरा किंग मेकर कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहतो, त्याचाच मागोवा आपण या मध्ये घेऊ.
या निवडणुकीत चार प्रमुख उमेदवार होते. त्यापैकी रेसमध्ये तीन उमेदवार होते.
(१) धैर्यशील माने - शिवसेना (शिंदे गट)
(२) सत्यजित सरूडकर पाटील -शिवसेना (ठाकरे गट )
(३) राजू शेट्टी (स्वाभिमानी)
उमेदवारी पुर्वीचे चित्र :-
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यावर स्वकियांनी आरोप केले होते की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क नाही. तर एका ठिकाणी त्यांचे विरोधात मोर्चाही निघाला होता. धैर्यशील माने यांचे विरोधात नाराजी दिसत होती.
दूसऱ्या बाजूला राजू शेट्टी यांनी ऊसदरासाठी आंदोलन केले होते. ते महाविकास आघाडीत येतील अशी शक्यता होती. मात्र त्यांच्या निर्णय प्रक्रियेत ठामपणा नव्हता. त्यामुळे त्यांनी शेवटी एकला चलो रे हि भूमिका स्विकारली.
महाविकास आघाडीने इथे शाहुवाडी पन्हाळा चे माजी आमदार सत्यजित सरूडकर-पाटील यांना उमेदवारी दिली आणि मतदारसंघात चित्रच पालटले.
महाविकास आघाडीत जोश संचारला आणि जागोजागी शिवसेनेसोबत एकजीव होऊन राष्ट्रवादी व काँग्रेस प्रचारात उतरली. सत्यजित आबांची हवा अतिशय जोरदार झाली आणि ती उत्तरोत्तर वाढतच गेली.
प्रचारादरम्यान:-
धैर्यशील माने : धैर्यशील माने यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ईचलकरंजीचे विद्यमान खासदार प्रकाश आवाडे यांनी स्वतः ची उमेदवारी घोषित केली मात्र ते बंड दूसऱ्याच दिवशी शमलं. त्या बंडाचा परिणाम धैर्यशील माने यांच्यासाठी वाईट होणार असे वाटले होते मात्र ते बंडच कदाचित ईचलकरंजी मधील मताधिक्याला कारणीभूत ठरलं.
धैर्यशील माने यांनी एका टप्प्यावर प्रचारात चांगलाच कमबॅक केला.
त्यांनी स्वतः केलेल्या विकासकामांची पुस्तिका काढली होती. प्रचाराच्या गाड्याही जोरात फिरत होत्या.
तरी त्यांची प्रचारात म्हणावी अशी आघाडी नव्हतीच.
राजू शेट्टी:- राजू शेट्टी हे निवडणूक लढणारच होते. आक्रोश पदयात्रेनिमित्ताने त्यांचा चांगला संपर्कही घडून आला होता.
प्रचारात चांगलीच आघाडी त्यांनी घेतली होती. फॉर्म भरायला मोठं शक्तीप्रदर्शन घडलं होतं. अगदी सांगता सभेलाही मोठी गर्दी शेतकऱ्यांनी केली होती.
सत्यजित सरूडकर पाटील:- आबांची उमेदवारी डिक्लेर झाल्यावर पुर्ण मतदारसंघात जोश होता. लोकांनी स्वतः निवडणूक हातात घेतली होती. जोरदार प्रचार लोकांकडून चालू होता.
सोशल मीडिया ही चांगलाच व्यापला होता.
मात्र प्रचाराच्या गाड्या चार ते पाच दिवस उशिरा आल्या.त्यांची संख्याही कमी होती. असं जरी असलं तरीही आबांना लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता.
महत्वाच्या सभा:-
धैर्यशील माने:-
नरेंद्र मोदी:- नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचारसभा झाली.
या सभेचा धैर्यशील माने यांना फार काही फायदा झाला नसला तरीही हिंदुत्ववादी मतदार टिकून ठेवण्यात यश आले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील धैर्यशील माने यांचा गड असणाऱ्या इचलकरंजी या विधानसभा क्षेत्रात इचलकरंजी शहरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हिंदुत्वाचा चेहरा योगी आदित्यनाथ यांची मोठी सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या तुलनेत गर्दी कमी असली तरी ती हिंदुत्ववादी गर्दी होती.
काठावरच्या हिंदुत्ववादी मतांना ठाकरे यांच्याकडे जाण्यापासून रोखण्यात या सभेमुळे यश मिळाले.
नितीन गडकरी:- विकास पुरुष अशी प्रतिमा असणाऱ्या नितीन गडकरी यांची सभा हुपरी या रूढ अर्थाने भाजपचा किल्लाच असणाऱ्या ठिकाणी झाली.
या सभेमुळे थोडाफार प्रमाणात विकासाचा दृष्टिकोन असल्याची प्रतिमा मिळण्यास माने यांना नितीन गडकरींच्या सभेचा फायदा झाला.
एकनाथ शिंदे:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी जिल्हा परिषद गटात सुद्धा सभा घेण्याचा धडाका लावला स्वतः मुख्यमंत्री असण्याचा अविर्भाव न आणता. अगदी ग्राउंड लेव्हल ला जाऊन सभा घेतल्या याचा मोठा फायदा धैर्यशील माने यांना झाला कारण मूख्यमंत्र्यासारखा एक माणूस आपल्या गावी येऊन सभा करतो याचा चांगला परिणाम त्या त्या भागातील लोकांवरती झाला. स्थानिक नेते चार्ज झाले.
सत्यजित सरूडकर पाटील:-
उद्धव ठाकरे : उद्धव ठाकरे यांच्या स्वतःच्या पक्षाचा उमेदवार इथे लढत असूनही फक्त एकमेव इचलकरंजी येथे एकच सभा घेतली.
त्या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्या सभेचा एक चांगला परिणाम दिसून आला. त्याच दिवशी पलीकडे त्याच शहरात योगी आदित्यनाथ यांची सभा होती. मात्र त्या गर्दी पेक्षा अधिकची गर्दी उद्धव ठाकरे यांच्या सभेला होती या सभेत उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद होता. तिथले उद्धव ठाकरे यांचे भाषण प्रभावी झाले.
शरद पवार:- सत्यजित पाटील सरूडकर हे शरद पवार यांच्या मित्र पक्षाचे उमेदवार तरीही शरद पवार यांनी या मतदारसंघात दोन सभा घेतल्या.
त्यापैकी एक सभा भर दुपारी शिराळा येथे घेतली.
तर दुसरी सभा इचलकरंजी येथे उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतली.
शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस चा कार्यकर्ता चार्ज झाला आणि त्याचा फायदा आबांना झाला.
आदित्य ठाकरे:- शिवसेनेचे ठाकरे गटाचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी मोजून एकच सभा घेतली.
तीही संध्याकाळी हातकणंगले येथे घेतली.
या सभेत कोल्हापूरचे सतेज पाटील यांचे भाषण तुफान गाजले.
या सभेत ही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि या सभेने एक वातावरण निर्मितीचा चांगला प्रयत्न केला.
राजू शेट्टी:-
राजू शेट्टी यांनी पहिल्या दिवसापासून शेतकरी हेच माझे स्टार प्रचारक अशी भूमिका घेतली होती आणि ती तितकी खरी होती. शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकरी स्वतः शिराळा शाहुवाडी मध्ये जाऊन प्रचार करत होते.
बच्चू कडू:- प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी दोन सभा शेट्टी यांच्यासाठी घेतल्या होत्या. त्याचा फायदा थोड्याफार प्रमाणात झाला. साधी माणसं अशा प्रतिमा निर्मितीसाठी उपयोगी पडली.
जोडणा आणि जुळण्या
धैर्यशील माने: धैर्यशील माने यांच्यासाठी लागलेल्या जोडण्या पाहू.
अमित शहा:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक प्रमुखांना कोल्हापुरात भेटून त्यांना काही प्रमाणात आश्वस्त केलं. काहींना फोनवरून योग्य तो संदेश दिला गेला.
एकनाथ शिंदे:- एकनाथ शिंदे यांनी इथे तळ ठोकला होता. रात्री २ वाजता त्यांनी भेटीगाठी घेतल्या. कोण छोटा कोण मोठा हे न पाहता सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या. सर्वांशी त्याच आपुलकीने त्यांनी संवाद साधला. आवाडेंचं बंड शमवलं. एकनाथ शिंदे यांनी धैर्यशील माने यांना एकटं पडू दिलं नाही.
निवेदिता माने वहिनी:- निवेदिता माने या मतदारसंघात दोनवेळा खासदार होत्या. त्यावेळी त्यांनी अनेकांना मोठं करण्याचं काम केलं होतं. जनसंपर्क होता. ते कनेक्शनस कामाला आले.
सत्यजित पाटील सरूडकर :-
जयंत पाटील:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी अनेक जोडण्या लावल्या. वाळवा शिराळा मध्ये पण त्याला फारसं यश आलं नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यभर कारभार सांभाळत असताना फॉलोअप कदाचित झाले नसावे. त्यामुळे जोडण्यांना थोडं अपयश आलं.
सतेज पाटील:- कोल्हापूर जिल्ह्यातील दमदार नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शिरोळ हातकणंगले आणि ईचलकरंजी इथे अनेक जोडण्या लावल्या. त्यालाही फारसं यश आलेलं दिसत नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बंटी पाटील विरूद्ध बाकीचे सर्व असा सामना होता. त्यामुळे त्यांची एनर्जी तिथे फार खर्ची पडली. इथे मात्र ज्या प्रमाणात यश मिळायला हवे होते ते मिळाले नाही.
राजू शेट्टी:-
राजू शेट्टी यांच्याकडे जोडणी लावणारा संघटनेचा कार्यकर्ता सोडून दूसरा कुणीही नव्हता. इस्लामपूर चे निशिकांत पाटील वगळता त्यांना इतर कुणाची मदत मिळाली नाही.
विधानसभा मतदारसंघात काय झालं?
इस्लामपूर वाळवा:-
जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना घासून पुसून काम करण्याची सूचना केली होती. तशी ती झाली ही असावी. चांगले मताधिक्य आले असले तरी ते अपेक्षेप्रमाणे नाही.
याउलट धैर्यशील माने यांना इथून चांगली मतं मिळाली. लोकांत चर्चा होती की धैर्यशील माने तीन नंबरला राहतील पण इथे एकनाथ शिंदे यांच्या जोडण्या यशस्वी ठरल्या आणि चांगली मतं मिळाली.
राजू शेट्टी यांचा हा तसा गड होता. मागील खेपेस राजू शेट्टी यांना इथून २० हजारांचं मताधिक्य होतं. यावेळी मात्र मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.
शिराळा:- शिराळ्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाचे दोन मजबूत नेते होते. मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक. तसेच सत्यजित आबा यांचे वडील इथे एका कारखान्याचे अनेक वर्षे व्हाईस चेरमन आहेत. मात्र इथं सत्यजित आबा यांना जे मताधिक्य मिळाले ते 'ना -के-बराबर' होतं.
धैर्यशील माने यांनी मात्र मोठी मुसंडी मारली. या भागात वारणा कारखान्याचे डायरेक्टर आहेत. त्यांनी धैर्यशील माने यांचे चांगले काम केले. त्यामुळे धैर्यशील माने यांनी मोठी मजल मारली.
राजू शेट्टी यांना इथे फारच कमी मते पडली.
शाहूवाडी -पन्हाळा :-
सुरवातीला सर्वत्र चर्चा अशी होती की इथून विनय कोरे हे धैर्यशील माने यांना फार मदत करणार नाहीत. आबाचा आमदारकीचा काटा दूर जाऊदे अशी भूमिका घेतील.
मात्र इथं विनय कोरे यांनी एकनाथ शिंदे यांना देवीच्या साक्षीने शब्द दिला आणि तो खरा जरी केला नसला तरी आबांना रोखण्यात त्यांना यश आलं.
आबांची टीम थोडीफार हवेत राहिली म्हणटलं तरी वावगं ठरणार नाही.
राजू शेट्टींना इथे मतं फारच कमी पडली.
हातकणंगले विधानसभा:-
धैर्यशील माने यांचा होमपीच मतदारसंघ. त्यांना इथे मताधिक्य गृहीत धरले होते. मात्र मविआ कडे इथे एक विद्यमान आमदार आणि दोन माजी आमदार होते. ते मताधिक्य थोपवून धरतील असे वाटले होते मात्र तितकं यश आलं नाही.
ईचलकरंजी विधानसभा:-
हा धैर्यशील माने यांचा बालेकिल्ला आहे. मागच्यावेळी इथून ७०,००० मताधिक्य असणारे माने यावेळी ४०००० च्या आसपास पोहचू शकले. तरीही हे लीड फार मोठेच म्हणावे लागेल. या मतदारसंघात एक वेगळे स्पिरीट आहे. ज्या स्पिरीट ने दोन वेळा प्रकाश आवाडेंचाही पराभव केला होता.
प्रकाश आवाडे यांच्या बंडामूळे मानेंना फटका बसेल असे चित्र होते ते उलट खोटे ठरले आणि इथला स्पिरीट परत जागृत झाला त्याचा फायदा मानेंना झाला.
आबांनी निश्चितच या भागात अनोळखी असतानाही पक्ष संघटना आणि इथल्या लोकल इंडिया कार्यकर्त्यांमूळे नुस्ती फाईट दिली नाही तर 'काबील-ए-तारीफ' फाईट दिली.
शेट्टींना इथे अगदीच कमी मतं मिळाली. कमी मिळणार हे माहीत होतं पण जे मिळालं ते फारच कमी मिळालं.
शिरोळ:-
शिरोळ हा राजू शेट्टी यांचा बालेकिल्ला, मागच्या वेळेला धैर्यशील माने यांनी या किल्ल्याच्या दिंडी दरवाजावर धडक मारली होती मात्र यावेळी त्यांना किल्ला भेदण्यात यश आलं.
शिरोळ मध्ये एक नंबरला 'धैर्यशील माने ' येणार? हे शक्य नव्हतं.
मात्र इथेही शिंदेंची जोडणा आणि यड्रावकरांची यंत्रणा अशक्य तेही शक्य करून गेली. धैर्यशील माने यांना ३ हजारांच्या मागेपुढे मताधिक्य आहे पण तेच मोठं यश आहे.
इथला मोठा उलटफेर म्हणजे राजू शेट्टी क्रमांक ३ वर गेले.
मात्र आबांसाठी राबणाऱ्या गणपतराव दादा, उल्हास पाटील यांनी कमी साधनसामग्री असताना 'आबाला इथे कोण वळकतंय तर काय?' या निंदानालस्ती ला पुरेपूर उत्तर दिले.
राजू शेट्टी यांची पारंपरिक मतंही विखुरली गेली.
आबांचे गणित ईव्हीएम मशीनवर कुठे फसले असावे?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पारंपरिक शिवसेनेची मतं आहेतच. धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या गाड्या भरपूर फिरल्या. त्या मानानं आबांच्या गाड्या कमीच फिरल्या. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह मात्र ते आयोगाने शिंदेना दिले. प्रचार कानावर आदळला तो धनुष्यबाणाचा.
ईव्हीएम मशीनवर क्रमांक २ ला माने यांचं धनुष्यबाण
तर
क्रमांक ३ वर मशाल चिन्ह.
ही चिन्हं लगोलग असल्याने अनेक मतं मानेंना ट्रान्स्फर झाली असावी. इथे निवडणूक आयोग किंग मेकर ठरतो म्हणटलं तर वावगं ठरणार नाही.
दूसरे एक डमी सत्यजित आबा पाटील उभे केले ते दूसऱ्या ईव्हीएम वर होते. मात्र त्यांनाही चांगली मते पडली ती ही आबांची मते गेली.
मुस्लिम उमेदवार:- या ईव्हीएम मशीनवर अनेक मुस्लिम उमेदवार उभे होते. त्यांनाही पडलेली मतं तोंडात बोट घालायला लावणारी आहेत.
एकूणात काय ईव्हीएम मॅनेजमेंट काय असते ते असे असते. तुम्हाला साताऱ्याचे तुतारी - पिपाणी घोटाळेही माहीत असतीलच.
वंचित फॅक्टर:-
वंचितने जैन समाजाचे डी.सी.पाटील यांना उमेदवारी दिली तेव्हाच माहीत होते की वंचित फार मतं घेणार नाही. मात्र ३६,००० मतं त्यांनी घेतली. हे उमेदवार नसते तर ती मतं काही प्रमाणात सत्यजित आबांना मिळाली असती.
र स द, साधनसामग्री :-
रसद, साधनसामग्री होती त्याची मॅनेजमेंट फक्त एकाच उमेदवाराकडे होती. ती पुरवणे आणि योग्य ठिकाणी पुरवणे हे सोप्पं काम नसतं. पण ती रसद पोचली गेली आणि अपेक्षित परिणाम साधला. लोकसभेला रसद पुरवठा ऐन लाटेत करणे हे काही खायचे काम नाही पण ते साधले गेले.
वैयक्तिक मला या धैर्यशील माने यांच्या विजयाचे किंग मेकर हे वर विश्लेषण केलेले सगळे घटक वाटतात. शेवटी जो जिता वो सिकंदर!
या न्यायाने
धैर्यशीलदादा माने यांचे अभिनंदन!
सत्यजित आबा सरूडकर पाटील हे नवखे होते, अपुरी साधनसामग्री, रसद असतानाही , चार मतदारसंघात फार परिचय नसतानाही अफाट मोठी झुंज दिली. कडवी झुंज. आबांचा विजय अपेक्षित होता तो मात्र झाला नाही.
आबांचेही अभिनंदन! बडा खेल खेला आपने!
राजू शेट्टी:-
राजू शेट्टी यांच्या मागे फार कमी लोक आले. एकला चलो रे हे रिस्की होतं. तरीही ती रिस्क घेतली. आणि चांगले लढले. एकट्याची लढाई होती. यानंतर अनेकजण वल्गना करत आहेत की शेट्टी संपतील, संघटना संपली वगैरे. असे काहीही होत नसते. राजकारणात कधीही कुणीही संपत नसतो. कठीण वेळही निघून जात असते. राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांच्या जीवावर पडलेली मतं ही काही कमी नाहीत.
राजू शेट्टी यांचेही अभिनंदन!
डी.सी.पाटील :-
प्रकाश आंबेडकरांना माननारा एक वर्ग तयार झाला आहे. तो या मतदारसंघातही आहे. तीच मतं डी.सी.पाटील यांना पडली.
वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
बाकीच्या अपक्षांचेही अभिनंदन!
-श्रेणिक नरदे.
(ब्लॉग वाचून झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया कळवा. काही फॅक्टर दुर्लक्षित राहिले असले तर ते ही सांगा.)
टिप्पण्या
इथे शेवटच्या दिवशी पोहोचलेली प्रत्येकी 400 ची रसद आबांना रोखण्यासाठी मोलाची ठरली.
पन्हाळा शाहूवाडी ने जेवढं द्यायला पाहिजे होत तेवढं नाही मिळालं.
इस्लामपूर कडून पण एवढं कमी अपेक्षित नव्हत.
जयसिंगपूर अनपेक्षित.
इचलकरंजीत मविआ चांगल रोखून धरल होत. पण आबा शेवटी जरा ढिले पडले.
शिराळा, वाळवा,शाहूवाडी कमी पडले
आणि विनय कोरेना अंबाबाई न नाहीतर
धैर्यशील मानेना फक्त आणि फक्त लक्ष्मीच
पावली
किंबहुना ते काही शिकतील किंवा त्यांच्या सरंजामशाही कारभारात बदल होईल असे वाटत नाही.
तळागाळातील कट्टर शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करायचे आणि काँग्रेस,राष्ट्रवादीचा फायदा करून द्यायचा असे चित्र फार काळ टिकणार नाही. पक्ष संघटना मजबूत करणे , शाखा उभारणे , कार्यकर्ते जोडणे , शिवसैनिकांना बळ देणे , सत्तास्थानी निष्ठावंत बसवणे ही कामे आता बाळासाहेबांनी करायची का ? स्वतः च्या उमेदवारासाठी सभा न घेता,मतदारसंघ पिंजून न काढता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मेहनत करण्याचा निर्णय निव्वळ अनाकलनीय आहे .
आदित्य ठकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेला भविष्य नाही .
उच्चशिक्षण घेऊन अमेरिकेला जायची स्वप्न पाहणारे पांढरपेशे नेतृत्व रस्त्यावर संघर्ष करून उभ्या राहिलेल्या संघटनेला उपयोगी नाही. आदित्यची मातोश्री च्या उंबरठयाबाहेर पडायची तयारी नाही , कार्यकर्त्यांशी संवाद नाही , कोंडळ्याशिवय कुणाचेही ऐकत नाहीत, पक्ष वाढवण्याची जबाबदारी कोणाची ? जागोजागी जर स्थानिक नेतृत्वाच्या भरोश्यावर राजकारण कराल तर गणेश नाईक ,राणे ,शिंदे ,वडेट्टीवार , बच्छु कडू यांच्यासारखे डोईजड संस्थानिक तयार होतच राहणार.
उद्धवसेनेचा सोशल मीडिया सेल तर केवळ नावालाच अस्तित्वात आहे .जे आहेत ते सगळे निव्वळ पाट्या टाकायचे काम करतात. समन्वयाचा अभाव , ध्येयधोरणांचा दुष्काळ, संभ्रमित नेतृत्व आणि बजबजपुरी ही तर सेनेची जुनी खोड .
मराठवाड्यात जरांगे फॅक्टर आणि मुंबईतील मुस्लिम मतदानाने उधवसेनेला तारले. अन्यथा जनता कुणाच्या मागे आहे हे संभाजीनगर , मावळ,ठाणे , कल्याण , सिंधुदुर्ग निकालावरून कळलेच आहे.
आधी भाजपवाले सेनेच्या सीट पाडायचे आता काँग्रेसवाले गेम करत आहेत . तेव्हाही उद्धवराजे गप्पच होते अन् आताही मूग गिळून बसणार.
आदित्यची अटक टाळण्यासठी काही छुपा समझोता आहे की काय अशी शंका घ्यायला जागा आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राची होणारी राक्षसी पाशवी ओरबडणुक पाहवत नाही . एवढे तर काँग्रेसनेही नाही लुटल जेवढं भाजपने दरोडे घातले.
मुंबापुरीची पिळवणूक होऊन गुजराती होणार अशी स्पष्ट चिन्हे आहेत आणि उद्धवराजे व युवराज भाषणे ठोकत देवदर्शन करण्यात मग्न आहेत. युवराजना क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिग ,बॉलिवूड तारेतारका , पार्ट्या इत्यादी विषयांवर इंग्लिशमधून बोलायचे आहे पण मराठी लोकांची हक्काची संघटना जीचा दिल्लीतही धाक होता ,तो आपल्या वाडवडीलांचा पक्ष , आपली मुळ ओळख वाचवण्यात आणि वाढवण्यात रस नाही.भावी नेतृत्वाला जर कष्ट करायला नको असतील तर फुटलेल्या लोकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
काय करावे ??
महाराष्ट्र परिवर्तनशील आहे हे लक्षात घ्यावे.
मोदी ,संघोटे, गडबडकरी आणि नागपूरचा कलंक ह्यांची भ्रष्टाचार व काळी कृत्ये ज्यांना माहीत नाहीत तेच ह्या लोकांचे समर्थन करतात. समाजापर्यंत संघोटे आणि भाजप ह्यांची खरी बाजू पोहचवण्यात सोशल मीडियावर विपक्ष सपशेल अपयशी ठरला आहे.
मोदीने मुस्लिम मजूर आणून केलेला काशी आणि अयोध्येतील मंदिरांचा विध्वंस , मुर्त्यांची तोडफोड , भाजपशासित राज्यात हजारोंनी पाडलेली मंदिरे ,संघोट्याकडून होणारा देवदेवतांचा अपमान ,परंपरेची थट्टा ,शंकराचार्यांचा अपमान , उत्तर प्रदेशात रोज पडणारे ब्राह्मणांचे मुडदे आणि अत्याचार , भाजपची राक्षसी सत्तालोलुप्ता ,संघोट्यांचे व भाजपाचे छुपे इस्लामिक आणि न्यू वर्ल्ड ऑर्डर अजेंडे , वॅक्सिन वापरून केले जाणारे जनुकीय बदल इत्यादी बाबी ज्यांना माहीत नाही तेच कमळाला मत देतात.
पण मोदीची राक्षसी माया सर्वात जास्त ब्राह्मण समाजाला भुलवित आहे हेही खरेच.
शंकराचार्यांचा अपमान , मंदिर मुर्त्यांचा विध्वंस आदी मोदी भाजप संघोटे ह्यांनी केल्यावर ब्राह्मण समाज शेपूट घालून गप्प राहिला पण तीच मंडळी मासमटण खाणाऱ्या फडणवीसवर टीका झाल्यावर निषेधमोर्चे आणि निवेदने द्यायला पुढे आली, हे ब्राह्मण समाज भ्रष्ट झाल्याचेच लक्षण आहे आणि अशांचा जर कुणी द्वेष करत असेल तर तोही देवाशी न्यायसंगत व्यवहार आहे हाही विचार मनात येतोच.
असो ,
आपल्या ब्लॉगवरून मूळ विषयाला अनुसरून नसलेले मत मांडायची संधी दिल्याबद्दल आभार .
"काँग्रेसमुक्त भारत" असे नारे देतदेत "काँग्रेसयुक्त भाजप" कधी झाली हेही कळले नाही का हो तुम्हाला?
असा प्रश्न विचारल्यावर भाजपीय पीतपत्रकार , स्वयंघोषित बिडीचाणक्य श्री भाऊ तोरसेकर ह्यांनी आम्हाला ब्लॉक केले होते.
धन्यवाद.
शिवसेनेचे उमेदवार का पडले ?
ह्या दोन्ही प्रश्नांचे एकच उत्तर आहे .
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शिवसेनेला कमी किंवा न झालेले मतदान .
शिरोळ इस्लामपूर , चिंचवड ,सिंदखेडराजा चिखली ,सांगली ,ठाणे ,कल्याण , मुबईतील बहुतेक मतदारसंघ , सिंधुदुर्ग ,40 गाव भुसावळ ,वाळूज गंगापूर ,घनसावंगी दोन्ही गोदावरी काठ ,डहाणू विरार पट्टा..
मतदानाच्या आदल्या रात्री काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या व्हॉट्सअँप गृपवर भाजपवले कुठे कुठे आणि किती ॲक्टिव्ह होते व काय काय सेटिंग्ज झाल्या ह्याचीही माहिती घ्या..
नेटवर फिरू नका , जी ग्राउंड लेव्हल कार्यकर्ते मंडळी मोबाईलवर ऑनलाईन असतात , त्यांचा फीडबॅक घ्या , कळेल.
बलवंत वानखेडे शिवसेना मतांमुळे आले , तिकीट नको असे म्हणणाऱ्या वर्षा गायकवाड शिवसैनिकांनी निवडून आणल्या , रामटेक सीटवर तर शिवसेनेनेच निवडणूक लढवली असे म्हणणे योग्य आहे. अहमदनगर ला शिवसेनाची मते लंकेंना 100% गेली ,लातूर नांदेड जालना बीड किती उदाहरणे हवीत ??
मोदी शहा आणि भाजपची इडी यंत्रणा यांच्याविरुद्ध निडणुकांपूर्वी ब्र काढायची सुद्धा शरद पवार, राहुल गांधी आणि कंपनीला हिम्मत नव्हती , विजयाची खात्री नव्हती. काँग्रेसचे विदर्भातील आणि साखरपट्ट्यातले राष्ट्रवादीचे नेते मिळमिळीत भाषेत केविलवाणी आर्जवे करीत होती.
मोदी शहा आणि भाजप 400 पार कसे होतात तेच पाहतो असे ठणकावून म्हणणारी आणि भाजपला तडीपार करीन अशी जाहीर घोषणा करणारी एकच व्यक्ती होती , ती म्हणजे उद्धव ठाकरे !!!
त्यांच्या घोषणेनी आणि राऊतांच्या गोळीबाराच्या फैरीनी निवडणुकीत जान आणली . त्यांच्या सभांनी वातावरण निर्मिती झाली , आठवा जरा परभणीची सभा आणि कोल्हापूरच्या सभेत त्यांनी केलेलं मोबाईल फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन !!
खरे लढले उद्धवच.
फायदा मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने करून घेतला !!
इडी च्या भीतीने म्याऊ म्याऊ करणारी काँग्रेसची मंडळी आताशा मोठ्या भावाच्या गप्पा हाणीत आहेत. जर मविआ जिंकली नसती तर आज उद्धववर भुंकणारी निम्मी काँग्रेसी पत्रावळ भाजपात दिसली असती.
वडेट्टीवार ह्यांना विचारा, ते भाजप प्रवेशासाठी मुंडावळ्या बांधून बसले होते , पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात संधीची वाट पाहत होते. जयंत पाटलांची गोची झाली होती ...
भांडण्याचा दम आणि शिंगावर घेणे फक्त शिवसेनेने करावे , ते साखरपट्टा आणि दारूपट्ट्या वाल्यांचे काम नाही.
धाक फक्त उद्धवचा !!!
म्हणूनच त्यांना आणि पर्यायाने शिवसेनेला संपविण्यासाठी सुपारीसम्राट असो किंवा गुजरातचे गुलाम भाजपाई आकाशपाताळ एक करताहेत.
त्यांना काँग्रेसजन आणि राष्ट्रवादीतील नतद्रष्ट ह्यांची साथ होती आणि आहेच.
हिम्मत असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांनी उद्धवशिवाय निवडणूक जिंकून दाखवावी,जाहीर आव्हान ..
नाही जिंकत तुम्ही , दम नाही तुमच्यात ..लावा ताकद , पाहू काय होते ते.. ..
पहणायचीही गरज नाही , निकाल लागल्यात जमा आहे ..
उद्धवच्या सर्वसमावेशक ,आश्वासक , सुसंस्कृत ,सभ्य , कुटुंबवत्सल ,वचन पाळणाऱ्या आणि वेळप्रसंगी आक्रमक असणाऱ्या चेहऱ्याशिवाय महाराष्ट्र होणे नाही ...
ह्यांना शिवसेनेची मते हवी आहेत पण शिवसेनेचा विजय नको आहे ,शिवसेना वाढायला नको आहे , शिवसैनिकांची कोण आला रे कोण आला अशी गर्जना ऐकली की ह्यांना जुलाब सुरू होतात , आदित्य ने बीबीसी ला इंग्रजीत मुलाखत दिली की दिल्लीच्या दरबारातील फरशी पुसणाऱ्यांची थोबाडे आंबट होतात , रश्मीताई ठाकरेंनी एकवीरा आईचा कड्क व्रतउपवास केला की साखर कारखान्याच्या मळी पासून भिंगरी तयार करणाऱ्यांची मळमळ सुरू होते,.
बरोबरच आहे म्हणा ,
नाहीतर तुम्हाला पद्मविभूषण सन्मान कोण देईल ? तुमचा हात धरून राजकारणात आलो असे सर्टिफिकेट कोणाकडून मिळेल ? कारखान्याची कर्जे कोण माफ करील ? आर्थिक घोटाळे वॉशिंग मशीनमध्ये कोण धुवेल ? ह्या पिढीजात वतनदार सावकारांच्या मुलाबाळांचे राजकीय भविष्य कोण सिक्युअर करेल ? धदो गुज्जुंची गुलामी कोण करेल ??
आज मोठा भाऊ , समसमान जागावाटप ,आदर ,मुख्यमंत्रीपद आदींसाठी बोंब ठोकणार्यांच्या गळ्यात ईडीचा पट्टा पडला तर कसे बुडाला आग लागल्यासारखे विव्हळतील ह्याची कल्पना करा जरा ...
चालले सरकार बनवायला .. जा जाऊन भाजपच्या उष्ट्या पत्रावळीवरच्या उरलेल्या खरकट्यांची कंदुरी पार्टी करा!!!
शिवसेना पुन्हा उभी करू , महाराष्ट्र पुन्हा उभा करू ...
आवाज आमचाच !!
होता , आहे आणि राहणार ...
शिवसेनेने कोल्हापूर अमरावती रामटेक ह्या तीन हककाच्या जागा काँग्रेससाठी सोडल्या , तिन्ही ठिकाणी काँग्रेसला फायदा होऊन विजयी झाले.ह्याउलट स्वतःची जागा सोडायचा प्रसंग येताच कृतघ्न काँग्रेस मूळ पदावर गेली आणि सेनेचा उमेदवार पाडला.
अगदी भूषण पाटील ऐवजी विनोद घोसाळकर उभे राहिले असते तर टफ फाईट होऊ शकली असती. पण हट्टाने नाना पटोले आणि काँग्रेस नेत्यांनी जागा लढवली तीही पुन्हा शिवसेनेच्या मतांच्या भरोशावरच !! व्वा!!
पाडापाडी आणि कटकारस्थाने हाडामासात रुजलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघड उघड घात केला आणि विशाल पाटलांच्या मिरवणुकीत वाघ नाचवून सेनेला खिजवले.
विशाल पाटील ह्यांना दिल्लीला पाठवून विश्वजित कदमनी स्वतःच्या मंत्रिपदाची सोय केली, एक दावेदार कमी केला.
शिवसेनेने विश्वजित कदम ह्यांच्या विरोधात भाजपाला मदत देऊन , उमेदवार देऊन किँवा काहीही करून कदमांना पाडावे ,
म्हणजे ते भाजपवासी व्हायला मोकळे होतील.
पण उद्धवराजे त्याची दखल घेतील काय ?
तर नाही ..
उद्धव ठाकरेंची राजकीय अपरिपक्वता , अपरिहार्यता आणि धरसोड वृत्ती झाकली जाणार नसून उघडीच पडणार आहे .
आघाडीत पडणाऱ्या सीट उद्धवच्या माथी मारण्यात येतील.
कुठल्या मतदारसघांपैकी कुठले गणित , नेते आणि मतांच्या बेरजेचे समीकरण जुळेल ह्याचा होमवर्क तरी ठाकरेंनी केला असेल असे तुम्हाला वाटते काय ?
केवळ भावनेचे भरीत , टोमणेभजी, भाषणभाजी जोडीला वारसहक्काची चटणी आणि आक्रमकपणाची बोलाची कढी हीच विजयाची रेसिपी असे जर मातोश्रीवरच्या किचनची धारणा असेल पंगतीतील उपाशी मंडळी सत्ता आणि पैशाच्या अन्नछत्राच्या वळचणीला जाऊन पोटभर मंत्रिपदाचा आमटीभात बुंदी ओरपतील...
आघाडीपैकी कुठल्याही दोन पक्षांची बेरीज ही बहुमताच्या पार जायलाच हवी अन्यथा फोडाफोडी अटळ आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही शिवसेनेच्या सीट्स पाडणार म्हणजे पाडणार , उद्धवना काहीही करता येणार नाही ,त्यांचे उपद्रवमूल्य कोर्टात केसेस टाकण्यापुरतेच मर्यादित आहे .
आक्रमक भाषा थोडी तेजस ठाकरेंनादेखील बोलू द्या.
वडील , वारसा , पक्ष संकटात आहे , सर्वस्व पणाला लागलेले आहे आणि हे धाकटे राजपुत्र महाशय पाली,सरडे, झुरळ, फुलपाखरे,कोळी ,घुबड ,वटवाघूळ ह्यांच्या प्रजातींचा दीड कोटीच्या लँडक्रुझर मधून शोध घेत फिरत आहेत .
धन्य आहे ..
प्रसाद लाड सारख्या फडणदोनशून्यच्या चांडाळचौकडीतील भ्रष्ट भडभुंज्याला आज खरी मिरची लागली !!
संभाजीनगरमधील जुनी शिवसैनिक पिढी आणि काही नवीन नेते हे रस्त्यावर मार खात आणि मार देत मोठे झालेले आहेत. संघर्ष काही कट्टर शिवसैनिकांना नवा नाही. ते धमक्यांना भिक घालणारे नाहीत.
प्रदीप जैस्वाल,खैरे,पोलकर आदी जुनी शिवसैनिक मंडळीनी 80-90 च्या दशकात शहरातील मुस्लिम वर्चस्वाला आव्हान दिले(बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच)आणि जावेद हसनखान ,अमानुल्ला मोतीवाला आदींचे काँग्रेसच्या आशीर्वादाने चालणारे धर्मांध मुस्लिम राजकारण संपवले.
त्यानंतरच औरंगाबादेत शांतता प्रस्थापित झाली.
मुस्लिमांच्या दंगली आणि त्रासाला कंटाळून जुन्या शहरातील हिंदू वस्त्यातून हजारो हिंदूलोक घरदार विकून सोडून निघून गेले आणि सिडको हडको वगैरे सारख्या नव्या वसाहती उभ्या झाल्या.
कालांतराने भाजप बळकट झाल्यावर ,म्हणजे ब्राह्मण आणि सुशिक्षित हिंदूंची मतपेढी तयार झाल्यावर भाजपवल्यांनी एमआयएम ही बी टीम उभी केली आणि सेनेचे उमेदवार पाडले.रामनवमीला झालेली पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ हे त्याचेच फलित होते.
अंबादास दानवे,राजेंद्र जंजाळ आणि लच्छु पहिलवान हे निधड्या छातीची शिवसैनिक आहेत.
कोरेगावभीमा प्रकरण झाल्यावर शहरातील दंगलसदृश्य परिस्थिती दानवेनी कुशलतेने हाताळली.
वेगळ्या विदर्भाचे तुणतुणे वाजवणारे फडणदोनशून्यचे चमचे ऍडव्होकेट आणे ह्यांना दानवेनीच प्रसाद दिला.
बावणकुळेंना दम त्यांनीच दिला.
आणि आता मातोश्री पाडून टाकू असे भुंकणाऱ्या बाटग्या लाडोबाचा नंबर लागला.
दानवे मोर्चे,धरणे,आंदोलने ह्यात जास्त रमतात. त्यांना जर लोकसभेत उमेदवारी दिली असती तर हमखास निवडून आले असते.मात्र शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे बेदिली झाली आणि त्याचे परिणाम जुन्या शहरातील मतदार भोगतो आहे.
त्यात वैयक्तिक उद्वेग आणि हतबलता असावी असे वाटते.
मिलिंद नार्वेकर विधान परिषदेत येत आहेत.
मग दानवे काय करणार ?
विधानसभेला जाणार.
कुठून?
गंगापुरातून
निवडून येतील काय ?
नाही.
मग दानवेंचे भविष्य काय ?
राष्ट्रवादी काँग्रेस...
शरद पवार राजकारणाच्या पटलावरून बाजूला झाले की राष्ट्रवादी एकहाती अजित पवारांकडे जाईल.
सुप्रिया पक्ष सांभाळू शकत नाहीत , आजचे शिलेदार उद्याचे अजितदादा समर्थक आहेत.
उद्धव आजच स्वतःचे नव्याने निवडून आलेले खासदार सांभाळू शकत नाहीत , मग पुढे निवडून आलेले आमदार
पुन्हा पळून गेले तर कुणाच्या नावाने खडे फोडणार ?
उद्धवठाकरें ना वैयक्तिक शिवीगाळ करणारी आणि बाळासाहेबांचा गलिच्छ भाषेत वारंवार अपमान करणारी सुनयना होले सारखी
अनेक अकाउंट्स आजही गरळ ओकताहेत, तेव्हा सैनिकाची आक्रमकता कुठे लोप पावली ?
93 च्या दंगलीत हातात तलवार घेऊन धावणारे मधुकर सरपोतदार आज शिवसेनेला आठवतील काय ?
मिरज दंगलीतील आरोपी बंधूंचा प्रचार करताना उद्या शवसैनिक दिसतील जसा सिल्लोडचा साप पदरात पाडून पवित्र केला.
फुटक्या बुडाचे गळके शेणके शामळू नेतृत्व आणि त्याचा दिशाहीन वेडावाकडा प्रवास सेनेच्या अंतांची नांदी आहेत.
फ्रांसीस झेवियरला संत म्हणणाऱ्या , ख्रिस्तसेवकांच्या विचारांनी, प्रेरणेने आणि आर्थिक स्त्रोताने उगम पावलेली , राजाश्रय देऊन ,
बहुजनवादाचा बुरखा पांघरून सुरू झालेल्या आणि असलेल्या ब्राह्मणविरोधाच्या
प्रबोधन मिरवणुकीचा सांगतासमारोह शेवटी ख्रिस्तमंदिरात जाऊन बाप्तीस्म्याच्या फेस्तनेच होणार आहे .
पक्ष, नेते, सत्ताधारी, विरोधक, संघटना, चळवळ, वादी, विवादी , प्रतिवादी काहीही आणि कुणीही असो,
सबका मलिक एक !
हलेल्लुया...