संकल्प बोलके हम तो निकल पडे...
काल रात्री मला एक स्वप्न पडलेते,
पाकिस्तानबरोबर आपलं युद्ध चालू झालतं, पाकिस्तानच्या बरोबर चीन उतरला आणि ट्रम्पचा राग मनात धरून बायडेननंही पाकिस्तानला सपोर्ट केलता.
जग एका बाजूला आणि भारत एका बाजूला असं युद्ध सुरू झालं.शेवटी मोदी स्वतः रणगाड्यावर बसून जाणार अशी घोषणा झाली. मोदींना असिष्टंट म्हणून मला पाचारण करण्यात आलं, मी पण दशम्या , पोकळ झुणका, शंकरपाळ्या, आंबा भडंग घेटला, जाताना आईचा आशिर्वादही घेटला. आणि जाताना 'संकल्प बोलके हम तो निकल पडे...' हे गाणं लावून मी युद्भूमीवर गेलो.
मोदी माझी वाटच बघालते, मला म्हणटले आंबा भडंग आणला आणि कांदा का नाही आणला ?
मी पण त्यांना प्रोत्साहीत करायला म्हणटलं आता कांदा पाकिस्तानचाच खायचा. बस मागच्या शीटवर म्हणटले. मग मी आणि मोदी रणगाडा घेऊन सैन्याबरोबर निघालो. पण अमेरिका चायना रशया पुढे आमचा काही निभाव लागत नव्हता. मी स्पॉट देत होतो , मोदी शुटींग करालते, लै म्हणजे लै घातपात झाला पण कोणच मागं हटायला तयार नव्हतं.
तेवढ्यात मी आयड्या लढवली आणि मोदीजींच्या हातात भोपू दिला मोदीजींनी भाषण सुरू केलं, ते ऐकूण शत्रु लोक परत फिरले आणि जाताना , ताट वाट्या वाजवत गेले. पुढे मग मला अजित डोबाल च्या जागी नियुक्ती मिळणार होती तेवढ्यात आमच्या मातोश्रीनं आवाज दिला आणि सांगिटलं, चहा पायजे असला तर डेरीस्नं दुध आणाय लागतंय. आणि आमच्या नियुक्तीस स्थगिती लागली. 😢
टिप्पण्या