पर्यावरण कायमचच हेपललं जाईल.
देश असा चुत्या लोकांनी भरून गेलाय काही सांगायची सोय नाही. आता साधी गोष्ट अशी आहे कि झाडांपासून येणारा अॉक्सिजन वेगळा आणि सिलींडरात जो आता रूग्णालयात उपचारांदरम्यान वापरला जातोय तो वेगळा. म्हणजे अॉक्सिजन एकच वायू. मान्य.
पण आता बाजार मुर्खपणाचा जो भरलाय तो वृक्षारोपण वाल्यांचा. अॉक्सिजन पार्क, अॉक्सिजन रोड , अॉक्सिजन टेंपल काय आणि किती खूळ्याचा बाजार हाय राव. कुणाकुणापुढं डोश्कि फोडून घ्यावी ?
हा जो काही मूर्खपणा चालू आहे. त्याचे भविष्यात चांगले काही परिणाम होणार नाहीत. आणि ज्यांना खाज आहे त्यांनी खूशाल आपल्या रानात लावावी झाडं. कशाला डोंगर टेकड्या, रस्त्यांचा जीव घेताय ?
तुमची समाजसेवेची, सेल्फींची खाज भागेल मात्र पर्यावरण कायमचच हेपललं जाईल.
टिप्पण्या