मी करतोय तूझाच इंतजार

तू ये एकदा अशी आजच्या पावसासारखी
वाट बघत असतात या पावसाची सगळे
मीपण बघतोय तुझी वाट बघतोय
मिरजेकडेला वीजा चमकल्या की सगळे सुखावतात
येणार पाऊस म्हणतात
मलाही कुठेतर चमकल्यासारखं वाटतंय
तु येशील असं ऊशिरभर वाटतंय
हा पाऊस काय वाहून जाणारा नाही
झिरपून जाणारा नाही
तो रूजतोय फक्त
ह्या मातीचा वास हवासा वाटतो
हिरवीगारं स्वप्नं आपसूक पडतात
आज पाऊस पडलाय
अंदाज बरोबर बसलाय
तू पण ये एकदा बरस
कोसळलीस तर कोसळ
तूटू देत तारा
हू दे अंधार !!!
मी करतोय तूझाच इंतजार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं