पुणे भयंकर हाय.

पुण्यातले लोक कष्टाळू आहेत अशे स्वारगेटला उतरल्यावर वाटले. 
पहाटे साडेतीनला टेशन टेशन टेशन असं सारखं विचारत्यात तिथली रिक्षावाली. ट्रॅव्हलसच्या मागं मागं पळतात. आणि भाडं मिळवतात. त्यांच्यात्यांच्यात जोरात बोलत्यात काकूला मामाला उचला. मग ते भाडं मिळवत्यात. मला सूरवातीला ते पुण्याचे वाटले. खरं ते सातारा, कराड, सांगलीचे आहेत. 
स्वारगेटच्या स्टँडवर सगळं असताव्यस्त असतंय. झोपाळ डोळ्यानी सगळे बसलेले असतात. भारीभारी इनशर्ट करणारी लोकंपण जागा मिळल तिथं बसतात. कोणच शायनिंग ते मारत नही. सगळी कुठतर जायच्या गडबडीनं सुंदाडलेली लोकं. कोणतर गावाकडंन पुण्याला हाय म्हणून सांगून पुणं दाखवायला आणलेली वैतागून गेलेली पोरगी. नवरा बायकू पेंगत असताना त्यांचं बारकं पोरगं बॅग वडत निवून दूसरीकडं टाकतय. नंतर शाॅट खातोय. 
सकाळी असलेली गाडं दूपारी बदलतात, दूपारची संध्याकाळी. तरी स्वारगेटला कायम गर्दी असते. 
पुण्यात बारिक बारिक देव लै हायीत. गल्लीला चार गणपति. कधीकधी वाटतंय तेतीस कोटी पुणेवाल्यानी लै मनावर घेतलंय. 
ट्राफिक तर कायम तुंबलेलं. रस्ता क्राॅस करून जाणं महामुश्कील. 
सोमवारपेठेत एक राजर्षी शाहू उद्यान म्हणून बाग हाय. तिथं व्यायामाला म्हणून सगळ्या वयोगटातली लोकं येत्यात. ठराविकजण व्यायाम करतात आणि बाकीची झोपत्यात नहीतर बाता बडवत बसत्यात. ऐंशी टक्के लोक पोट सूटलेले असतात. येताना पोरापोरीस्नी घेवून येत्यात. चार फेर्या मारत्यात मग पोराला गूड बाॅय म्हणून अंगठा वर करून दाखवत्यात. पोरगं कंटीन्यू करतंय बाप पोट हालवत प्राणायम करतोय. नंतर पोरगं कटाळलं की यिवून बापाच्या पोटावर यिवून मारतं. पोरी हेडफोन घालून येतात. एकशे साठ मीटरच्या ट्रॅकवर टर्न मारतानाच फक्त बघतात. आजीबाई कॅटॅगिरीतल्या बायका डबा घेवून येत्यात आणि नंतर जाताना खात्यात. बॅडमिंटन खेळणारी लोकं चिक्कार वढाताण करून घेत्यात. आमच्या हिकडंन आलेलं मास्तर वैतागल आणि धा ट्रॅक फोनवर बोलत हाणलं. तोपर्यंत त्यच चप्पलंच कोणतर ताणलं. बाकड्यावर झोप चांगली लागत्या. 
प्रचंड ऊंच ईमारती. धूरळा बसलेल्या. आतलं इंटेरिअर बरं असलं तरी बाहेरून मळकटलेल्या आहेत. 
ट्रक खूप कमी आहेत. ट्रकमधनं दोन पोती पडल्या. शिट्या मारलं तरी त्या बापड्याला ऐकू नही गेलं. पोत्यात सूरवातीला कलंगडं हायीत असं वाटलं. नंतर भोपळं निघाली. मग एका सोसाटीच्या वाॅचमनकडं ते दिलं. वाट म्हणटलं तिथं. तर ते म्हणटल बाटतो. 
पुण्यात आल्याआल्या सर्दी खोकला शिंका चालू झाल्या. पेपर दिलो. टफ हूता पेपर. तिथंपण अलिकडंची एक पोरगी पुण्याची. मला येत असलेली बूद्धिमतेची चार प्रश्नं तिला सांगितलो. बदल्यात तिनं केमेस्ट्रीची चार प्रश्न सांगितली. बाहेर आल्यावर लगेच नेटवरंन त्याच स्पष्टीकरण दिली आणि कसं बरोबर ते दाखवली. मग मी पण सोडवून दाखवलं. ब्रिलीयंट असं ओठ आवळून म्हणटली. लगेच सटकलो तिथंन. नंतर किरकटवाडीला मित्राबरोबर गेलो. परत तब्येत लैच बिघडली. मित्राचं पण काम निघलं. मग गावाकडं यायचं ठरवलो आणि आलो. कुणाकुणाला येतो म्हणटलोतो भेटायला खरं शक्य झालं नही. पुण्यात राहणार्या लोकांच्याबद्दल मला अप्राम आदर वाटतोय. कसं काय जूळता कुणास ठाऊक तिथं. 
पुणे मंबई भयंकर हाय. smile emoticon

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं