अवगुणांचे हाती । आहे अवघीच फजिती ।।१।।
नाही पात्रासवे चाड । प्रमाण ते फिके गोड ।।२।।
विष तांब्या वाटी । भरली लाउ नये होठी ।।३।।
तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ।।४।।
poem
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
एकदा ये अशी फूल्ल व्होल्टेजनं, आणि ऊडव माझ्या डीपीच्या फिजा !!! निघू दे धूर, हू दे अंधार !!! smile emoticon
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत आहे. (१) धैर्यशील माने - (शिंदे शिवसेना) (२) राजू शेट्टी- (स्वाभिमानी) (३) सत्यजित आबा सरूडकर (शिवसेना उद्धव ठाकरे) (४) डी.सी.पाटील (वंचित) हे प्रमुख उमेदवार म्हणून निवडणूकीला सामोरे गेले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा जुना ईचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. इथल्या मागील चार निवडणूकांचा अभ्यास केल्यावर काही निरीक्षणं समोर येतात. २००९-२०१४-२०१९ या तीन निवडणूकांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट (काँग्रेस, राष्ट्रवादी,कारखानदार, साखरसम्राट, सहकारसम्राट ई.) यांच्या विरोधी मतं पडलेली आहेत. २००९ राजू शेट्टी २०१४ राजू शेट्टी यावेळी राजू शेट्टी हे शरद पवार गट यांचेविरोधात लढत होते. २००९ मध्ये ९५,००० इतकं लीड निवेदिता माने यांचे विरूद्ध शेट्टींना मिळालं होतं. (* यावेळी काही काँग्रेसजनांचा छुपा पाठिंबा होता.) तर २०१४ मध्ये राजू शेट्टी हे परत शरद पवार गट विरोधात भाजप -शिवसेनेच्या पाठिंब्यावर लढले. त्यावेळी त्यांचे मताधिक्य कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे विरूद्ध १,७७,००० इतकं अफाट होतं. २०१९ च्या निवडणूकी पुर्वीच शेट्टींनी मोदींची, महायुती च...
मोदी आणि चंद्रचूड हे कधीही भेटले तरी मिठ्ठी मारली तरीही कसलाही आक्षेप नाही. हे दोनही लोकं संविधानिक पदावर आहेत. मोदी पंतप्रधान आहे. चंद्रचूड सरन्यायाधीश. त्या संविधानिक पदावर बसल्यावर काही संकेत पाळायचे असतात. तेच काल मोडून टाकले गेले. ज्यांना थोडंफार कळतं त्यांची अवस्था झाली कि 'हागणाऱ्याने लाजावे कि बघणाऱ्याने लाजावे?' सरन्यायाधीशाचं काम असतं नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संवर्धन करणे आणि सरकार नीटपणे चाललंय की नागरिकांना त्रास देतंय हे पाहणं. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन लोक एक रोजी उठतात आणि पक्षातील अनेक आमदार खासदारांना घेऊन पक्ष पळवतात. यात पन्नास खोके दिल्याचा आरोप आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर याने दिलेला निकाल आणि निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे आणि अजित पवारांना देऊन टाकणे हे नेमकं कुठल्या नितीमत्तेत बसतं? कुठल्याही सर्वसामान्य माणूस सांगू शकेल की दबावामुळे हे निर्णय आलेत. आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असणारा एकनाथ शिंदे हा खरोखरच माझा मुख्यमंत्री आहे का? कि तो घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे? हे जाणण्याचा आम्हाला अधिकार आहे. जर समजा शिंदे घटना...
हातकणंगले लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत घासून जाणारी ही निवडणुक सर्वच महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाली होती. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना आपली जागा राखण्यात यश आलं. या यशानंतर मानेंना सहकार्य करणाऱ्या अनेकांनी किंग मेकर ची जाहिरात सुरू केली. आणि ती साहजिकच आहे. अटीतटीच्या लढतीत एक एक मतदान महत्वाचे असते आणि प्रत्येक जण किंग मेकर असतोच असतो. पण खरा किंग मेकर कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहतो, त्याचाच मागोवा आपण या मध्ये घेऊ. या निवडणुकीत चार प्रमुख उमेदवार होते. त्यापैकी रेसमध्ये तीन उमेदवार होते. (१) धैर्यशील माने - शिवसेना (शिंदे गट) (२) सत्यजित सरूडकर पाटील -शिवसेना (ठाकरे गट ) (३) राजू शेट्टी (स्वाभिमानी) उमेदवारी पुर्वीचे चित्र :- हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यावर स्वकियांनी आरोप केले होते की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क नाही. तर एका ठिकाणी त्यांचे विरोधात मोर्चाही निघाला होता. धैर्यशील माने यांचे विरोधात नाराजी दिसत होती. दूसऱ्या बाजूला राजू शेट्टी यांनी ऊसदरासाठी आं...
टिप्पण्या