गाव सगळं मामा आणि एक नही कामा.

ह्याला पैशाची नड पडलीती. घरातलीबी देईना झालेली. मग हा दूसर्या दिवशी यरवाळी गेला आणि वगळीच्या म्होरं ऊभा राह्यला. तिकडंनं म्हादूआण्णा टमरेल घेवून आला. काय आण्णा म्हणून पंधरा मिनटं बात्या खपलला. म्हादूआण्णाच तोंड हळूहळू बारिक होत चाललेलं बघून हा म्हणटला पंधरा दिवसात माघार देतो दोन हजार दे की. 
म्हादूआण्णा जात जात म्हणटला देतो की रं. 
शप्पथ देणार काय आण्णा ? हा विचारला.
रामपारी खोटं बोलीन काय ? 
मग आण्णा आटपून आला आणि दोन हजार दिला. 
असा हा आहे.
........................................................
लांब जावून जोरात वरडलो 'शाना झालास काय ?'
दूसर्या सेकंदाला मला परत तेच ऐकू आलं. प्रतिध्वनी. बराच वेळ बसून झालं.
........................................................
संकरात्रीला पूजायच्या कुळ्या असतात. पूजून झालं की रिकाम्याच असतात. त्यात द्राक्षे आणि इतर गोष्टी चवीप्रमाणे घालून, पॅक करून, पूरून टाकायचं. नंतर दोन अडीच महिन्यानं पंधरा दिवसाला एकेक काढायचं. मस्त पैकी खोकल्याच अवशेध तयार हूतंय. एंजाय करा. smile emoticon
(सणांचा वापर करून घ्या tongue emoticon )
......................................................
एॅकच्युली असा शब्द वापरून बोलाय सुरवात करणारे मला आवडत नाहीत. मला तो शब्दच आवडत नाही. तोंड लै इद्र करावं लागतंय.
........................................................
ठाणे जिल्ह्याच विभाजन करून 'पालघर' तयार केल्यात. परवा 'वाघबीळ' ला गेलतो त्यावेळी हे आठवलं.
.....................................................
सकाळी कर्नाटकात गेलतो. मित्र म्हणटला महाराष्ट्रातले लोक सेल्फीश आहेत आणि कर्नाटकातले लोक हेल्पीश आहेत.
......................................................
गाव सगळं मामा आणि एक नही कामा.
........................................................
सोशल मिडीयावरंन लग्न जुळलं असं कधीतर वाचलो की, माझं मला वाटतंय 'झुकेरबर्गाचं मी काय फपईच झाड तोडलो असेन का ?' 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं