चव सोडलेलं इन्स्टाग्राम!
Instagram ची दुनया लै वेगळी आहे. तिथं उच्च प्रतीचा हलकटपणा चालू असतो. Instagram reel star लोक आहेत. त्यांचे त्यांच्यात झंगाट जुळते. मग काही बिनसते. या दोघांचे का बिनसले याच्यावर संशोधन करून व्हिडिओ काढले जातात त्याला व्ह्यू आहेत २.५-३लाख.
आंट्या, बाया, बाप्पय या साऱ्या लोकांनी तर चव सोडली आहे. काय त्यांची लफडी आणि करामती. लाईव्ह करतात आणि त्यातच कार्यक्रम चालू असतो. यात गायपट्टा आघाडीवर आहे.
महाराष्ट्रात एक प्रकार रीलचा चालू आहे, ते म्हणजे मर्डर हाफ मर्डर मधल्या आरोपींना जामीन मंजूर झाल्यानंतर जेल मधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ, शिवाय हे गँगस्टर लोकांचाच मर्डर झाल्यावर त्यांच्या अंत्ययात्रेचे रील्स तर जब्राट गाजतात. त्यावर ज्या कमेंट असतात त्याही डेंजर, भाऊ तुमच्यासाठी मी येरवड्यात येत आहे, कळंब्यात येतोय वगैरे.
बॉडी बिल्डर,
ह्या सेगमेंट मध्ये, निव्वळ चड्डी मध्ये गडी असतात, मग एकेक करून कापडं चढवून रील पुर्ण करतात, त्याखाली असणाऱ्या कमेंट नादखुळा असतात.
काळा बापय आणि गोरी बाई.
लग्नाचा रील असतो, त्याखाली कमेंट असते.
आमची म्हैस माझ्याशिवाय धार देत नाही, नाहीतर मी आत्महत्या करणार होतो हे बघून.
शेतकरी,
ब्रँडेड चड्डी बुट शर्ट घालून ट्रॅक्टर मधनं मोजून दोनच पेंड्या गवताच्या नेणारे रॉयल शेतकरी किंवा ब्रँड शेतकरी बघून दुधावर अनुदान कशाला पाहिजे असं वाटून जातं.
युवा किर्तनकार, युवा मोटिवेशनल स्पीकर, युवा ट्रेडर ह्या सगळ्यांची एकंदरीत थेरं बघितली की मला आपल्या राजकारणी लोकांबद्दल जे वाईट वाटत होतं. ते वाईट वाटणं कमी होतं. परफेक्ट राजकीय लोकं आपल्याला मिळाली आहेत हे मनोमन पटून जातं.
बाया,बाप्पय,पोरी, पोरं, म्हातारे सर्वच वर्गाने चव सोडून दिलेली दिसते. इन्स्टाग्राम नसतं तर हे वाढीव कलागुण दिसले नसते. इन्स्टाग्राम चे मानावे तेवढे आभार थोडे आहेत.
ह्या लिस्ट मध्ये लै प्रकार राहिलेत. त्यापैकी एक आठवलं.
ते मान, पाठ, हात,कोपरा, कंबर,फेऱ्या वगैरे दुखणं असतं ते कटाकट कटाकट मोडून जागेवर पेण कमी करणारे डाक्टर असतात. त्यांना काय म्हणतात? कायतर म्हणू देत पण त्यांच्याकडे असणाऱ्या पेशंट ह्या अवघडलेल्या हॉट बायाच असतात मोस्ट. ते पण आडवंतिडवं वढूवढून बरं करत असतात. एवढं घासघीस वढतात बघणाऱ्याचे स्नायू आकसावं.
तर हे डाक्टर पण फेमस असतात.
टिप्पण्या