विखे -लंके आणि राहूल गांधी


घराण्यात असलेली अमर्यादित सत्ता, अफाट पैसा,मोठी यंत्रणा याच्या जीवावर काहीही करता येते अशी मग्रुरी अनेकांना असते.

गावातले चावडीतले सदस्य, सरपंच, चारदोन टाळकी जमवून गुंडगिरी करून झालेले नगरसेवक अशा छपरी लोकप्रतिनिधींचा सुळसुळाट झाला आहे. अनेक जण माजूरडेपणा मिरवण्यासाठीच निवडणूक लढवतात. 

अशीच मग्रुरी सुजय विखे या खासदाराला होती. ती मग्रुरी होती शिक्षणाची. 
विखे डॉक्टर आहेत म्हणे. त्यांना फाडफाड इंग्रजी बोलता येते. इंग्रजी बोलता येणे हे चांगलंच आहे. मात्र ते काही दूसऱ्याला हिणवण्यासाठीचं साधन नाही. 

यांनी मागच्या वेळी संग्राम जगताप यांनाही हे चॅलेंज दिलं होतं पण यावेळी त्यांची गाठ पडली ती निलेश लंकेशी. 



लंकेंना त्यांनी शिक्षणावरून हिणवलं. लंकेनी विखेंना पाडूनच दाखवलं. मस्ती, मग्रुरी, पैसा फार काळ राजकारणात चालत नसतो हे लंकेंनी दाखवून दिलं. 

आज तर निलेश लंकेंनी अनेकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. थेट इंग्लिश मधूनच शपथ हाणून, विखेंच्या जखमेवर मीठ चोळले. 

लंकेंची इंग्रजी इकडेतिकडे आहे. पण त्यांनी हे करणे हे मस्तवालांच्या विरोधातलं एक ठळक कृती आहे. जनता जनार्दन माज खपवून घेत नाही हे सामान्य माणसांनी दाखवून दिले आहे.

विखेंच्या सात पिढ्या आठवतील असं ठळक काम लंकेंनी केलं आहे.

आता हातात अमर्यादित सत्ता असणारा दूसरा माणूस राहूल गांधी. 

राहूल गांधी च्या घरात अनेक वर्षे सत्ता आहे. माज म्हणाल तर झिरो आहे. 



आज राहूल ने शपथ घेतली. स्पीकर महोदयाच्या हातात हात दिले. परत आपल्या जागेकडे राहूल येत होता, परत डोक्यात काही आलं, मागे वळला आणि स्पीकर च्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीसोबत हात मिळवला. 

हि गोष्ट तशी छोटी आहे पण त्याचं महत्त्व मोठं आहे. श्रीमंती, पद, प्रतिष्ठा असली तरी चांगलं वागायला फार काही लागत नाही. राहूल सारख्या माणसाने तर विखेच्या तुलनेत फुल्ल माजोरडे असायला हवे होते पण तो तसा नाही. कारण तो गांधी आहे. 
राजकारणात पाय जमिनीवर असणे गरजेचे असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?