राहूल गांधीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कुणी काही थोडं उलट सुलट बोललं तर माणसाला अपमान वाटतो. माणूस तळमळतो. राग येतो, चीडचीड होते, मनात खुन्नस तयार होते, या अपमानाचा कधीतरी बदला घेऊ अशी खूणगाठ मनाशी माणूस बांधतो. कालांतराने हिकडे तिकडे मन रमते पण कधीतरी अचानकपणे परत ती व्यक्ती नजरेसमोर आली तर परत मनात राग, संताप, चीडचीड, दातओठ खाणे हे येतंच. परत माणसात आग पेटत राहते. त्यात तो स्वतः ही जळत असतो. 

विषय राहुल गांधीचा आहे. राहूल गांधींच्या पणजोबा पंडित नेहरू पासून ते आई सोनिया गांधी यांच्यावर घाणेरड्या भाषेत रात्रंदिवस इथले भक्त ट्रोल करत असतात. घाणेरडे फोटोशॉप करून विकृत आनंद लुटत असतात. ते आजही सुरूच आहे प्रमाण थोडं कमी आलंय. राहूल गांधीचे पुर्ण कुटुंब देशासाठी खपले आहे. 

साध्या बुथवर काम करत असताना कामं करूनही अपेक्षित मतं मिळाली नाहीत तर माणूस चिडतो. वाईट वाटतं. तिथं देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या कुटूंबियांना घाणेरड्या भाषेत शिव्याशाप दिले जातात.
त्यापेक्षा सत्तर वर्षांत काय केले?  म्हणून विचारणा होत होती.

याचे राहुल गांधी ला किती वाईट वाटले असेल? 

राहूल गांधींच्या जागी आपण असतो असं स्वतः ला ठेवून बघायलाही धीर होत नाही. 

हे सहन केलं त्याने. तो जर खरंच नालायक असता तर आजवर जगजाहीर झालं असतं‌ पेगासस सारखी यंत्रणा ही नजर ठेवायला होती. त्याचे ना कोणते लफडे बाहेर आले, ना कोणता घोटाळा. 

धाडसाने चालत राहीला. कडाक्याच्या थंडीत, उन्हातान्हात, कश्मिर मधल्या बर्फात ही. लोकांशी बोलला. म्हणण्यापेक्षा लोकांचं ऐकलं. शेतकरी, कामगार, नोकरदार, व्यावसायिक सगळ्या घटकांपर्यंत प्रामाणिक प्रयत्न करून पोचला. 

गोरगरिबांना छातीशी कवटाळून आधार दिला. युवकांना धीर दिला इथल्या मुक्त होण्याच्या मार्गावर नेलेल्या काँग्रेसला धष्टपुष्ट केलं आणि जे काही हातात होतं त्या निशी लढला. 



पक्ष फोडले, बळजबरी माघारी घेऊन दोन लोक अविरोध खासदार केले. बँक खातं गोठवून टाकलं. निवडणूक आयोग तर तिकडं पाणी भरायलाच होता. 

राहूल गांधी च्या हातात काय होतं?
गोरगरिबांच्या प्रति तळमळ, हातात संविधान, प्रामाणिक राहूल गांधी साठी राबणारे कार्यकर्ते आणि त्याचं मोठं मन. 

ह्या लढाईत कुठेही देवाच्या नावावर मताची भिक मागितली नाही. जातीच्या नावावर मागितली नाहीत आणि धर्माच्या नावावर तर नाहीच नाही. हातात काहीच नसताना राहुल गांधी ने जे मिळवलं आहे ते अभूतपूर्व आहे. हा देश हुकूमशाही कडे जाताजाता राहीला आहे. त्याचं सर्वात मोठं श्रेय या वाघाचं आहे. 

माणसाचं मन ताब्यात असणं ही महाकठीण गोष्ट असते. नैराश्याच्या तिन्हीसांजा, निराशेच्या रात्री घालवणे हि गोष्ट काही एवढी तेवढी सोपी नाही. त्यासाठी अफाट संयमी मन लागतं. ते राहूल कडे आहे. त्यामुळे तो स्वतः ही घाबरला नाही आणि दूसऱ्यालाही घाबरवलं नाही. त्यानं सर्वांना सांगितलं 'डरो मत!' 

हि लढाई ज्या धाडसाने राहूलने लढली आहे. त्या तुलनेची लढाई आजघडीला जगात कुणीही लढत नसेल. 

म्हणावंच लागेल 'हाय आमचा नेता लै पावरफुल्ल!'

 आमच्या नेत्याला राहूल गांधीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?