पोलिसहो खऱ्याने वागण्याचे बळ तुम्हा येवो!
पोलिस हे अपवाद वगळता बदमाश आहेत. अपवाद म्हणजे तरी किती? ०.०१% .
यावर पोलिस पैशाला हपापलेले, मानमरातबासाठी खच्ची असलेले, मग्रुरी नसानसात भिनलेली असते पोलिसांच्या.
तुम्ही श्रीमंतांच्या घरातून असाल. चांगला राजकीय बॅकग्राऊंड असेल तर हे पोलिस पिझ्झा बर्गर च काय बुटही साफ करून देतील तुमचे.
न्यायालय काय घंटा करणार? जामीन मंजूर होण्यासारखी कलमं लावली तर जामीन होणारच की.
सगळ्याची मूळ समस्या पोलिस आहेत हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. किंवा प्लांचेट करायची गरज नाही.
क्रांतिसिंह नाना पाटील हे एका सभेत म्हणाले होते, खादी आणि खाकी या दोन गोष्टी बदमाश आहेत.
नानांचे ते शब्द तेव्हा ही खरे होते आजही खरे आहेत.
एवढ्या दिवस महाराष्ट्र पोलिसांचे एफ.आय . आर अॉनलाईन दिसायचे.
कालपासून तेही पोर्टल बंद दिसत आहे. काही काम चालू आहे की असंच बंद ठेवले आहे कल्पना नाही.
मात्र ढिगाने पैसा असला तर पोलिस खरेदी करता येतात.
तुम्ही कधीतर चूकून ट्राफिक पोलिसाच्या तावडीत सापडा. तो काय वागणूक देतो ते पहा आणि तेच अगरवाल ला काय ट्रीटमेंट दिली ते पहा. किंवा मागे ड्रग माफिया ची हेच लोक फाईव्ह स्टार सुविधा देत होते.
इथल्या सर्वसामान्य माणसाचा एकमेव गुन्हा आहे. त्याच्याकडे पैसा नसणे हाच गुन्हा आहे. तुझ्याकडे पैसा असेल तर तुला ते सोडवणारच!
वेदांत अगरवाल सोडून त्याच्या समवयस्क सर्वसामान्य मुलाला निबंध लिहायला लावला तर तो लिहेल की माझ्या पित्याला वेदांतच्या बापाएवढा पैसा मिळवता आला नाही, पण भविष्यात मी मिळवेन आणि एक दोन माणसं उडवेन आणि एका दिवसात जामीन मिळवेन.
पोलिस हो तुमचा पगार आमच्या टॅक्स मधून होतो, अगरवाल जास्त टॅक्स देतो म्हणून त्याला पिझ्झा बर्गर दिलात की काय?
प्रामाणिक पोलिस जगात कुठेतरी असतील ही आशा आहे. जे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत आहेत त्यांचा अभिमान आहेच.
तुमचा दंडूका गरीबावर चालवता तो जरा मद्यधुंद श्रीमंतावर चालण्याचं बळ तुम्हाला येवो.
टिप्पण्या