वोट ट्रान्स्फर आणि मोदीजींचे दौरे!
यावेळी महाराष्ट्रात भाजप ला कशाची धास्ती आहे तर ती महाविकास आघाडीच्या बाँडिंगची. महाविकास आघाडीचा कुणीही उमेदवार असो त्याला दोन्ही पक्षांची मतं मिळताना दिसत आहेत.
उदाहरणार्थ आमच्या भागात उमेदवार होता शिवसेनेचा (उबाठा), शिवसैनिक तर आघाडीवर होतेच पण त्याहून अधिक काँग्रेस राष्ट्रवादी ने हि निवडणूक अधिकची हातात घेतली होती.
असं सर्वत्र होताना दिसत आहे. (सांगलीचा अपवाद वगळता)
मात्र भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाची मतं मिळताना दिसत नाहीत. तसेच शिंदे शिवसेनेची मतं तर मुळातच आली नाहीत सोबत. म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात कुठं येणार अशी परिस्थिती आहे.
गुवाहाटी सुरत इथून येण्यासाठी महिनाभर गेला. तिथून निष्ठावंतांचे मोर्चे वगैरे झाले. लगेच ठाकरेंनी सभेचा धडाका लावला. तेवढ्यात राष्ट्रवादी रूपी विघीन आले. या सगळ्या भानगडीत त्यांना स्थिरस्थावर होता आले नाही. तेवढ्यात या निवडणुका आल्याही. उमेदवारी मिळवण्यासाठी बोंबाबोंब झाली. या सगळ्याचा धसका मोदींनी घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्र दौरे सूरू आहे वारंवार.
भाजपचे लोक व्हाट्सअप वर फॉरवर्ड रेटून करू शकतात. पण ग्राऊंडवर काम करणं त्यांचं काम नाही. महाराष्ट्रात भाजप म्हणजे विदर्भ वगळता इतर ठिकाणी शिवसेनेच्या जीवावर वाढलेलं बांडगूळ!
यापलिकडे फारसा प्रभाव भाजपचा नाही. त्यामुळे मोदी वाऱ्या करत आहेत. त्या सभेतही पहिलाचा मोदी मोदी गजर भरताना दिसत नाही.
जे भूजबळ भाजपच्या काळात जेल मध्ये वर्षभर होते, ज्या दादांवर भाजपने हजारो कोटींचे आरोप केले अशा लोकांना दादा किंवा भूजबळांचे कार्यकर्ते मतं देतील का?
भूजबळ दादा हे फक्त उदाहरण आहे. पण अख्खी आयात केलेली भाजपही त्यात आहे. मुश्रीफ साहेब आहेत. असेच शिंदे गटातील अनेक लोक आहेत. ज्यांच्या चौकशा लावल्या.
त्यांच्यावर कितीही दबाव टाकला तरी खालचे कार्यकर्ते ऐकणार आहेत का? हा खरा प्रश्न आहे.
त्यामुळे भाजपची मतं बाणाला घड्याळाला झक मारत जातील. मात्र घड्याळ आणि बाणाची मतं भाजपकडे जाताना दिसत नाहीत.
तसाच कट्टरपणा असता तर काल भर मतदान केंद्रावर आलेलं वळसेंचं वक्तव्य किंवा भुजबळांचं संध्याकाळी आलेलं वक्तव्य काय सांगतंय?
राहूल गांधी सारखा नेता बंटी पाटील वर भरोसा ठेवून कोल्हापूर ला येत नाही. पण इथे मोदी फडणवीसांवरही भरोसा ठेवत नाहीत. यामागचं खरं कारण हे मतदान फिरत नाही हेच आहे.
भाजपाला जोरदार झटका बसवणारा निकाल महाराष्ट्रातून आला तर आश्चर्य वाटू नये.
टिप्पण्या
कोणत्याही राजकीय पक्षाने (भाजप वगळता)
ईविएम मशीन विषयावर एक शब्द नाहीत जर निकाल मनासारखे
नाही लागले तर मग बोंबाबोंब हे करतील की ईव्हीएम मशीन हॅक केले आहेत
आणि हे नक्की होणार