हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!


हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत आहे.

(१) धैर्यशील माने - (शिंदे शिवसेना)

(२) राजू शेट्टी- (स्वाभिमानी)

(३) सत्यजित आबा सरूडकर (शिवसेना उद्धव ठाकरे)

(४) डी.सी.पाटील (वंचित)



हे प्रमुख उमेदवार म्हणून निवडणूकीला सामोरे गेले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा जुना ईचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. इथल्या मागील चार निवडणूकांचा अभ्यास केल्यावर काही निरीक्षणं समोर येतात. 

२००९-२०१४-२०१९ या तीन निवडणूकांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट (काँग्रेस, राष्ट्रवादी,कारखानदार, साखरसम्राट, सहकारसम्राट ई.) यांच्या विरोधी मतं पडलेली आहेत.

२००९ राजू शेट्टी
२०१४ राजू शेट्टी

यावेळी राजू शेट्टी हे शरद पवार गट यांचेविरोधात लढत होते. 

२००९ मध्ये ९५,००० इतकं लीड निवेदिता माने यांचे विरूद्ध शेट्टींना मिळालं होतं. 
(* यावेळी काही काँग्रेसजनांचा छुपा पाठिंबा होता.)

तर २०१४ मध्ये राजू शेट्टी हे परत शरद पवार गट विरोधात भाजप -शिवसेनेच्या पाठिंब्यावर लढले. 

त्यावेळी त्यांचे मताधिक्य कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे विरूद्ध १,७७,००० इतकं अफाट होतं.

२०१९ च्या निवडणूकी पुर्वीच शेट्टींनी मोदींची, महायुती ची साथ सोडली. 

आणि यावेळी शरद पवार गटासोबत ते आले. विरोधात शिवसेनेने राष्ट्रवादीतून धैर्यशील माने यांना आणलं. मोजून २० दिवसांत चांगला प्रचार केला. त्यात पुलवामा,सर्जिकल स्ट्राईक यामुळे भाजप लाट उसळली होती. त्यातंच धैर्यशील माने यांचे वक्तृत्व प्रभावी होते. सदाभाऊ खोत यांच्या सारखी तोफ होती. ईचलकरंजीकरांची राजु शेट्टी यांचेवरची नाराजी. आणि सर्वात महत्वाचे वंचित आघाडीचे सय्यद यांना मिळालेली १,२५०००मतं ह्या सर्व गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडल्या आणि ९६,००० ईतकं लीड घेऊन धैर्यशील माने निवडून आले. 


हा झाला गेल्या तीन निवडणुकीचा ईतिहास. तीनही वेळेस शरद पवार गटात विरोधात मतदान झाले होते. २०१४ चा अपवाद वगळता, इथे शरद पवार विरोधी ५०-६० मतं अधिकची आहेत असे दिसते. 

आता या निवडणुकीत नेमकं काय झालं? शरद पवार यांची असेल, राहूल गांधी यांची असेल या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा सुधारल्या आहेत. विशेषतः २०१९ निवडणुकीनंतर शरद पवार यांची क्रेझ आहे म्हणटलं तर वावगं ठरणार नाही. भारत जोडो यात्रेनंतर राहूल गांधी यांची प्रतिमा नुसती सुधारली नाही तर झळाळून निघाली आहे. 

त्यामुळे शरद पवार गटावरचा रोष बऱ्यापैकी कमी झाला आहे, पण संपला नाही. 

शरद पवार गट यांचे विरोधक दोन प्रकारचे विरोधक आहेत. 

(१) शेतकरी - कारखानदार लुबाडतात वगैरे. 
(२) शहरी -निमशहरी - सामाजिक/धार्मिक भूमिका पटत नसणारे, शेतकऱ्यांचे लांगूलचालन करणारे म्हणून. 

आता हे विरोधक कमी झाले असले तरी, त्यांचे विभाजन झाले आहे. शेतकरी वर्गातील विरोधक शेट्टींकडे तर शहरी निमशहरी भागातील माने यांच्याकडे. 

ही विभागणी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे, शिवाय या मतांमध्ये शिवसेना वाढली. त्यामुळे इथे या गणिताप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. 

आता प्रत्येक उमेदवाराचे प्लस आणि मायनस पॉईंट बघू. 

(१) धैर्यशील माने
+ मोदींची सभा
+योगींची सभा
+ गडकरी यांची सभा
+गोविंदाची रॅली \ डान्स
+स्वतः एकनाथ शिंदे यांनी तळ ठोकून जोडण्या लावणे.
+हिंदुत्ववादी मतदार
+प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील यड्रावकर, विनय कोरे यांचा पाठिंबा 
+विकास कामे
+ प्रभावशाली वक्तृत्व

आता मायनस
-उद्धव ठाकरे यांची साथ सोडणे.
-जनसंपर्क कमी
-उमेदवारी जाहीर व्हायला वेळ.
-उमेदवारी जाहीर करून मागे घेण्याच्या चर्चा 
-भाजपा कार्यकर्ते नेते लोकांबरोबर पॅच अप नाही.
-विकासकामे करून जाहिरात झाली नाही.
-प्रकाश आवाडे यांनी केलेले निवडून न येणारे उमेदवार असे वक्तव्य, तसेच स्वतः च्या उमेदवारी ची केलेली घोषणा.
-ईचलकरंजी पाणी प्रश्न. 
-शेतकरी वर्गाचा भाजपवर असलेला रोष.
-महागाई

(२) राजू शेट्टी
+बच्चू कडू यांची सभा
+स्वतंत्र लढणे
+वैयक्तिक ओळखी संपर्क
+शेतकरी आक्रोश मोर्चा
+मणिपूर भगिनींसाठी केलेले उपोषण
+दिवसा वीज मिळणे बाबत केलेले आंदोलन. 

आता मायनस पॉइंट बघू.
-सुरवातीला एकला चलो ची घोषणा
-नंतरून मविआ मधील फक्तच उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मागणे.
-भूमिकेत अस्पष्टता.
-शहरी मतदार किंवा नोकरदार, छोटे उद्योजक आदींसाठी घोषणा नाही.
-ईचलकरंजी पाणी प्रश्न
-महागाई

(३)सत्यजित पाटील
+उद्धव ठाकरे -शरद पवार यांच्या सभा.
+आदित्य ठाकरेंच्या सभा
+सुषमा अंधारे यांच्या सभा
+नितीन बानगुडे पाटील यांच्या सभा
+सतेज पाटील आणि जयंत पाटील यांच्या सभा आणि प्रत्यक्षात यंत्रणा.
+उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, स्वतः शिवसेनेचे माजी आमदार
+गणपतराव दादा, राहूल खंजिरे, राजूबाबा आवळे इ. काँग्रेस पक्ष सोबत
+जयंत पाटील, मानसिंगराव नाईक हे दोन विद्यमान राष्ट्रवादी आमदार आणि माजी आमदार जांभळे, राजीव आवळे सोबत. 
+ईचलकरंजी शहरातील मँचेस्टर आघाडी, काँग्रेस सोबत. 
+नवा चेहरा, प्रभावी वक्तृत्व
+शाहुवाडी भागात अनेक वर्षांनंतर उमेदवारी.

मायनस पॉइंट
-उशिरा जाहीर झालेली उमेदवारी
-मतदारसंघात नवीन
-दोनही इतर उमेदवारांच्या तुलनेत वैयक्तिक ओळखी कमी. 

हे तीनही प्रमुख उमेदवारांची मापं काढून झाली. 

आता मूळ निकालाबाबत अंदाज. 
या निवडणुकीत भाजप विरोधी रोष आहे. ईचलकरंजी, जयसिंगपूर असा भाग वगळता बाहेरचे लोक महागाईने त्रस्त झाले आहेत. ते भाजपविरोधी मत घालणार आहेत. 

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती लोकांत आहे. त्याचा लाभ सरूडकरांना होईल. 

शरद पवार विरोधी फॅक्टर फार कमी आहे. पण त्यातही दोन डिव्हायडेशन आहेत. 

ईचलकरंजी मध्ये गेल्यावर्षी ७० हजारांचं घसघशीत लीड मानेंना मिळालं होतं ते मिळताना दिसत नाही. 
ईचलकरंजी चा पाणी प्रश्न सुटला नाही.
ईचलकरंजीत जनसंपर्क नाही मानेंचा.
यंत्रमागधारक लोकांचे प्रश्न सुटले नाहीत. 
जीएसटी कर आकारणी बद्दल रोष आहे. 
अशा अनेक प्रश्नांमुळे मानेंना अपेक्षित लीड मिळताना दिसत नाही. 
हातकणंगले मध्ये ही तीनही उमेदवार समसमान जाताना दिसत असले तरी धैर्यशील माने यांचे ते होम ग्राऊंड आहे हे विसरून चालणार नाही. 

बाकी शाहुवाडी, शिराळा आणि वाळवा इथे मविआ आघाडी घेताना दिसत आहे. सत्यजित पाटील यांना आमदारकीला १लाखाच्या आसपास मतं होती त्यात २० हजारांची वाढ होईल असा अंदाज आहे. 
शिराळ्यात त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे तिथेही ते वाढताना दिसत आहेत.
इस्लामपूर हे जयंत पाटील यांचे होम ग्राऊंड आहे. तिथंही लीड निघत आहे. 

शिरोळ हे राजू शेट्टी यांचे होम ग्राऊंड आहे. तिथे शेट्टी पुढे जाताना दिसत आहेत. 

ओव्हर ऑल सांगायचं तर झाडून लीड मिळणारे मतदारसंघ दिसेनात. किंवा कदाचित निकालादिवशी दिसतील.

आर्थिक गणिताबद्दल लोकांत चर्चा अशी आहे की काही भागात पैसा पोचलाय काही भागात वरचेवर दाबला गेलाय. असं असलं तरी पैसा पोचवला असला तरी त्या मतदारांवर दबाव टाकून मतदान करून घेण्यात आलं नाही. अशी चर्चा आहे. 

वंचित आघाडीचा जोर असला तरीही २०१९ एवढा नाही. तिथंही मतदान घसरेल असे दिसते. तिथले मतदान कमी होणार आहे ते महाविकास आघाडीच्या पारड्यात पडताना दिसत आहे.

पुर्ण लढतीत महाविकास आघाडीची मशाल जोरदार पेटताना दिसत आहे. हा अंदाज माझा आहे. 

(मी महाविकास आघाडी समर्थक असल्याने कदाचित माझं विशफुल थिंकींग सुद्धा असू शकतं. मात्र मी मांडलेल्या गोष्टी काही चुकीच्या किंवा फार बायस्ड आहेत असे मला तरी वाटत नाही. निकालाला अवधी आहे अजून. तत्पूर्वी हे निरीक्षण आणि अंदाज. )

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
मस्त रे श्रेणीक ..!!
अगदी कसलेल्या पत्रकाराहूनही खास विश्लेषण आहे.
अनामित म्हणाले…
5170000/- आबा मतदान पडणार विजय होणार
रहीम म्हणाले…
येणार तर आवाज
अनामित म्हणाले…
आता कस श्रेणीक म्हणल तस
Mayur S म्हणाले…
चांगल्या पद्धतीने विश्लेषण केले आहे
अनामित म्हणाले…
पत्रकारीता कुणाच्याही दावणीला बांधलेली किंवा ठराविक बाजूने विचार करणारी नसावी. हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून होणारे मतदान आहे. याऊलट महाविकास आघाडीचा गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत एकदाही खासदार झाला नाही. जयंत पाटलांचा प्रभाव असता तर यापुर्वी जवळपास 15 वर्षापासून त्यांचे उमेदवार पडत का आले आहेत? शरद पवार यांना विरोध केकेल्यानंतर सलग दोन वेळा राजू शेट्टी खासदार झाले, तर एकदा धैर्यशील मानेंनी शरद पवारांना विरोध केला आणि ते खासदार झाले. त्यामुळे या मतदार संघात ज्या शरद पवार, जयंत पाटील यांनी पराभवाची हँट्रीक साधली आहे. त्या मतदारसंघात शरद पवारांच्या चेहऱ्यावर मतदान होईल हे म्हणने तितपत योग्य आहे?
पत्रकारीता कुणाच्याही दावणीला बांधली गेलेली नसावी तर ती स्पष्ट पणे मते मांडणारी आसावी.
ज्योतिषी म्हणाले…
धैर्यशील माने हे 40 ते 50 हजार च्या मताधिक्याने निवडून येणार आहेत
अनामित म्हणाले…
एकदम अचूक विश्लेषण. लोक म्हणतील की नेहमी या मतदार संघाने शरद पवार गटाला विरोध दर्शवला. पण गेल्या ३ निवडणूका आणि यावेळची निवडणूक यात बरीच समीकरणे बदलली आहेत.
त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागात असलेलं भाजप विरोधी वातावरण, आणि त्याला कारण म्हणजे त्यांचं महाराष्ट्रातील गेल्या १-२ वर्षातलं फोडफोडीच राजकारण.
राजू शेट्टी यांची धरसोड वृत्ती. बऱ्याच वर्षानंतर होणारी तिरंगी लढत.
निर्णायक ठरतील असे काही मुद्दे-
१. जयंत पाटलांनी प्रतीक पाटलांना ग्राउंड वरती उतरवल होत त्याचा किती परिणाम होईल हे बघण्यासारखं असेल.
२. राजू शेट्टीना जूने आणि निष्ठावंत संघटनेचे कार्यकर्ते किती साथ देतील?
३. विद्यमान ३ आमदारांनी खरच भाजप साठी राण उठवलंय का?
४. सगळ्यात महत्वाचं लोकांचा पक्षफोडी वेळेचा राग खरच टिकून राहिलाय का?
अनामित म्हणाले…
चांगलं विश्लेषण केलं आहे...

मी माझा अंदाज सांगतो...

शिराळा आणि वाळवा या दोन्ही तालुक्यातून अंदाजे 35 हजार मतांच लीड मशाल ला भेटेल.
शाहूवाडी अबांचा होम मतदारसंघ आहे त्यामुळे तिकडे त्यांना लीड नक्कीच भेटणार...
राहील इचलकरंजी आणि शिरोळ.. तिकडे माने आणि शेट्टी ना लीड असेल पण ते निर्णायक ठरणार नाही..
हातकंनगले बरोबरीत राहील ...

जास्त नाही पण थोड्या फरकाने मशाल बाणाचा पराभव करेल... (लीड <40 हजार)
अनामित म्हणाले…
बाकी सर्व विश्लेषण उत्तम आहे पण गोविंदाची सभा/डान्स ही मानेंसाठी जमेची बाजू ठरली हे वाचून मजा वाटली!
शेतकरी पुत्र म्हणाले…
मतदानातील वाढीव टक्केवारी ही ग्रामीण भागातील शेतकर्यांचे आहे. शिरोळ हातकणंले मतदानच कल बगता तेथील असणारी शेतकऱ्याची साथ शेट्टीना भेटेल असे दिसते. आणी वाळवा इस्लामपूर शिराळा यामधे undercurrent मतदान जे जयंत पाटील विरोधक व bjp नाराज गट हे शेट्टी ना छुपे पाटीब्याने एकतर लीड वर असतील अथवा खूप फरक नसणार . शाहूवाडी मधे चांगल्या प्रकारे मतदान होईल. इचलकरंजी मध्ये समसमान मध्ये असतील. शेतकऱ्यांचा पाठिंबा हेच राजू शेट्टी यांना पत्त्यावर पडेल आणि यातूनच ते निवडून येतील

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?

विखे -लंके आणि राहूल गांधी