बिअरचा खप कमी होण्याची कारणं आणि त्यावर करता येण्याजोग्या उपाययोजना.

बिअरचा खप कमी होण्याची कारणं आणि त्यावर करता येण्याजोग्या उपाययोजना. 




१) मुतखडा पडला रे पडला लोक बिअर सोडून व्हिस्की, रम,व्होडका पितात.

२) महाराष्ट्रात सरसकटपणे गार पाण्याच्या बाटल्या आणि बर्फावर बंदी घातल्यास बिअरचा खप वाढेल. 

३) बिअर बारमध्ये गलास देताना बऱ्याचवेळा पेला देतात. त्यामुळे बिअर पिण्याचा ग्राहकांचा मूड जातो.

४) बिअर टीन हे एकदा फोडलं कि फेकून देणे हाच मार्ग राहतो. त्याऐवजी फिरकीच्या बूचाची बाटली काढावी. त्यात नंतरून तेल तुप वगैरे साठवता येईल तसेच यामुळे पुरूष लोकांचा बिअर पिण्याचा अपराधभाव कमी होईल. 
महिला म्हणतील पिऊन आला पण येताना डबा घेऊन आला. त्यामुळे पॅकेजिंग कडे ध्यान द्यावे. 

५) बिअर साठी शीतपेटी ची भाडेतत्वावर तजवीज करून द्यावी.

६) गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण जास्त होते त्यामुळे साहजिकच बिअरचा खप कमी झाला असावा पण यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे खप वाढेल त्यामुळे शासनाने चिंता करू नये. 

७) बिअरची बाटली मोठ्ठी असते त्यामुळे काही लोकांना वाहतूकीसाठी अडथळा येतो. त्याच जागी जर व्हिस्की किंवा रम असेल तर खिशातून नेता येते, तेही कुणाला न दिसता, त्यामुळे अशा ग्राहकांसाठी टेट्रा पॅक मधून बिअर उपलब्ध करून द्यायचा विचार केला जावा. 

८) रविवारी, तसेच सुट्टीच्या दिवशी बिअरच्या किंमतीवर चार ते पाच टक्के डिस्काउंट ठेवावे. मात्र एका व्यक्तीला एकच बाटली तेही आधारकार्ड घेऊन द्यावे. 

९) वर्षातून एकदा रेशनकार्डावर 'आनंदाचा शिधा ' धर्तीवर 'आनंदाचा चखणा' ही वाटावा. मात्र त्याआधी सदर केशरी पिवळ्या रंगाच्या रेशनकार्ड धारकांनी किमान दोन बिअर खरेदी केल्याची पावती सादर करणे बंधनकारक करण्यात यावे. 

१०) बिअर पिणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला दारूड्या/पिंडक्या/तळीराम म्हणने हा दखलपात्र गुन्हा ठरवण्यात यावा, यासाठी सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा देणेत यावी. 

या माझ्या सूचना आहेत राज्य सरकारला आणि त्यांनी नेमलेल्या समितीला, माझ्या सूचनांचा गांभीर्यपूर्वक विचार करावा ही विनंती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं