फडणवीसांनी आजच पराभव स्विकारला ?

नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठ्ठा विजय झाला आणि भाजपचा लाजीरवाणा पराभव झाला. 

देशभरातून राहूल गांधी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच वेळी भाजप विरोधी एक मोठ्ठी लाट उसळली आहे. 

कर्नाटकला लागूनच महाराष्ट्र येतो, त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रात सर्वाधिक दिसणे स्वाभाविक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मविआ आणि भाजप दोघांकडून राजकीय वातावरण निर्मिती करण्याला सुरवात झाली आहे. 




महाराष्ट्रातले मविआ सरकार पाडून शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. मात्र भाजप हा मोठा पक्ष असूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले. त्याचवेळी त्यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध अपमानास्पद रीतीने उपमुख्यमंत्री केलं गेलं. 

भाजपने शिंदेना मुख्यमंत्री करण्यामागे कारण होतं कि शिवसैनिकांचा रोष भाजप वर नको, पण भाजपची खेळी फसली भाजपला लागायचा तसा दोष लागलाच. शिवसैनिक शिंदेवर टीका जरी करत असले तरी त्यांचा मुख्य शत्रू भाजपच आहे. 

मविआ सरकार कोसळल्यावर राज्यभरात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण तयार झाले. त्याचा फायदा मविआला झाला.

 नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत फडणवीस आणि भाजपचे डझनभर मंत्री लोक भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात मुक्काम ठोकून होते तरी काँग्रेस च्या रविंद्र धंगेकर यांनी भाजपचा दारूण पराभव केला. 

भाजपची हि स्थिती जर बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यात होत असेल तर राज्यभर काही निराळी परिस्थिती नाही. हे त्यापूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही दिसले होते. शिक्षकांसारखे सुजाण लोकही भाजपला कंटाळले आहेत. 

फडणवीसांनी आजच भाजपचा महाराष्ट्रातील पराभव स्विकारला ?

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पुण्यातील भाजप कार्यकारिणी बैठकीत उपस्थित होते. तिथं ते म्हणाले "कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, इथे फक्त मोदी पॅटर्न चालेल!"

चतुर राजकीय व्यक्ती पराभवाची जबाबदारी स्वतः कधी स्विकारत नसतात. 

फडणवीसांनी स्वतःला पराभवास कारणीभूत होण्यापासून वाचवलं आहे. जाणूनबुजून मोदींच्या गळ्यात माळ घातली आहे. 

याचे ताजे कारण म्हणजे कर्नाटकात झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे राजकारणच संपले अशी अवस्था आहे. 

फडणवीसांना मोठ्या पराभवाचा अंदाज आला असावा. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीची जबाबदारी मोदींवर ढकलून स्वतःची नंतरून होणारी बदनामी रोखण्याचा खटाटोप आतापासूनच सुरू केला आहे. 

फडणवीसांच्या आजच्या वक्तव्याचे विश्लेषण एवढेच होऊ शकेल कि, फडणवीसांनी पराभव आजच स्विकारला आहे आणि पराभवाचं खापर फोडण्यासाठी माणूसही तयारच ठेवलाय!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं