मातृभाषा दिन



महाराष्ट्राची मातृभाषा मराठी मात्र ती दर जिल्हावार बदलत असते. पुणेरी, कोल्हापूरी, कोकणी, मराठवाडी, वऱ्हाडी अशा अनेक बोलीभाषा त्यात समाविष्ट असतात. 

ज्या त्या व्यक्तीला आपली मातृभाषा प्रिय असते. तिच्यावर त्याचं प्रेम असतं. जर शाकाहारी धर्मातला माणूस जसा मटण खातो म्हणून इतर धर्मियांना हौस वाटते, तसंच इतर प्रांतातल्या लोकांना तो आपली भाषा बोलतो याचं कौतुक वाटतं. 

एकदा कर्नाटकात जात असताना कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी आमची गाडी अडवली. एक पोलिस चुकवला तोवर त्याने पुढच्या पोलिसाला फोनवरून कळवलं तर त्याने गाडी अडवली आणि ओरडू लागला. मला कन्नड येत असल्यानं त्याच्याबरोबर कन्नडमध्ये बोललो. आमची अडचण मऊ भाषेत सांगितली तर त्या पोलिसाने आम्हाला सोडलं. 

आता त्या पोलिसाने कशामुळे सोडलं आणि का सोडलं हा विषय जरी वेगळा असला तरी त्याला समोरचा माणूस दूसऱ्या प्रांतातला असूनही आपली भाषा बोलतो याचा त्याला आनंद झाला असणारच. या घटनेत भाषेचा रोलही महत्वाचा होता. 

कोणतीही भाषा संपत नाही तर ती इतर भाषेतल्या शब्दांना सामावून घेत पुढे नदीसारखी वाहत असते. त्यामूळं इंग्रजीने अतिक्रमण केलं बॉलिवूडने भाषेवर आक्रमण केलं अशी सोंगं करण्यात किंवा काळजी वाहण्यात काही अर्थ नसतो.

काना मात्रा उकार आकार रफार उच्चार चुकले तरी आपल्याला काय म्हणायचं आहे हे समोरच्याला कळणं अधिक महत्वाचं. 

महाराष्ट्रातील अनेक नेते आमदारकी लढवण्यास ईच्छूक असतात पण लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या बहुतांश उमेदवारांची मनोमन आपण हरावं हिच ईच्छा असते. कारण बऱ्याचजणांना हिंदी इंग्रजी बोलण्यात अडचण असते. त्यांना बाकी कशाची भिती नसते पण एखाद्या हिंदी इंग्रजी पत्रकारांना गाठलं तर आपली मजा होईल हिच भिती असते. 

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत नगर जिल्ह्यातले दोन उमेदवार संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे ह्या दोघांना जनतेला इंग्रजी बोलून दाखवायला लागलं होतं.

त्या बाबतीत रामदास आठवले हे व्यक्तीमत्व बिनघोर आहे. ते हिंदी मराठी दोनही भाषेत शीघ्रकविता करतात. कोणत्याही पत्रकाराला टाळत नाहीत. जे असेल ते बेधडकपणे मांडत असतात. 

सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील सर्वाधिक सक्रीय लोकसभा सदस्य असून त्यांची हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेवर जोरदार पकड आहे त्यामूळे त्या कधी दबावात येत नाहीत. बहुतांश खासदार मंडळी ही भाषेमूळेच मार खातात किंवा संसदेत बोलायचं धाडस दाखवत नसावेत. 

या साऱ्या गोष्टींचा अभ्यास नरेंद्र मोदींनी करून ज्या गावात जातील त्या गावची भाषा, जैसा देश वैसा वेश असं करत ते कपडे बदलत फिरत असतात. तसंच भाषणाची सूरवात ज्या राज्यात जातात त्या राज्याच्या भाषेने करतात. एकदा ते सांगलीत आलते त्यावेळी ते म्हणाले, 'सांगली आमची चांगली !' आणि खालून सांगलीकर दंगा करू लागले मोदीमोदीमोदी !

मातृभाषेच्या अस्मितेची चांगला वापर मोदीजींनी करून घेतला. बाकि अमित शहांची हिंदी म्हणजे भाग्यशाली = भाग साली अशी आहे. 

भाषा माणसाला जोडतात, तोडतात, घडवतात. प्रत्येकाने एकमेकांच्या भाषेचा आदर केल्यास बऱ्याच हाणामाऱ्या थांबतील. 

सर्वांना मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा !

टिप्पण्या

Sonali Jadhav म्हणाले…
अनुभव आणि निरीक्षण भारी आहे श्रेणीक सर����

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं