नवाब मलिक !

नवाब मलिक !

नवाब मलिक हे नाव आज अख्या भारत देशाला माहीत झालंय. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते गेली अनेक वर्षे आहेत. विरोधी पक्षात असतानाही त्यांच्या पत्रकार परिषदा होत पण त्याकडे विशेष कोणी लक्ष देत नव्हतं, माध्यमं त्यांना दाखवत नव्हती. 



मलिकसाहेब या चालु प्रकरणात आले तो दिवस ४ किंवा ५ अॉक्टोबर असावा. त्याआधी २ अॉक्टोबरला शाहरूख खानच्या मुलाला अटक झाली होती. एक धिप्पाड टकला माणूस त्याला NCB कार्यालयात फरफटत आणतानाचे व्हिडिओ दिसत होते. नंतरून आलेला त्याच टकल्या माणसाचा फोटो. (जो आपल्याला आता कळतो आहे त्याप्रमाणे १८ कोटी रूपये त्याची किमंत होती.)

पण मलिकसाहेब पत्रकार परिषद घ्यायच्या आधी तो माणूस डिटेक्टिव्ह आहे, तो प्रायव्हेट investigationकरतो वगैरे चालू होतं. 

पहिल्या दिवशी जी पत्रकार परिषद झाली त्यात तो डिटेक्टिव्ह वगैरे कुणी नसून, एक गून्हेगार आहे ही माहिती समोर आली. तर दूसरा माणूस भाजपचा कार्यकर्ता आहे हे नवाब मलिकांमूळेच कळालं. 

के.पी. गोसावी.
मनिष भानूशाली. 

तिथून जास्मिन उर्फ यास्मिन वानखेडे यांच्या इंस्टा प्रोफाईलवरील फ्लेचर पटेल आला. त्यानं वानखेडेंच्या बहीणीचं नाव लेडी डॉन असं ठेवलं होतं. 
त्यानंतर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची गोष्ट आली. जास्मिन वानखेडेंचा जन्मदाखला आला. 

समीर वानखेडेंचा निकाहनामा आला. दाऊद/ज्ञानेश्वर आला. त्यांचा निकाह लावणारा काझी आला. 

समीर वानखेडेंची महागडी लाईफस्टाईल आली. तेवढ्यात त्यांच्यातील फुटलेला पंच प्रभाकर साईल आला. त्यानंतर सॅनवील डिसूझा आला. मनिष भंगाळे आला. सुनिल पाटील आला. 

आणि शेवटी १८ कोटीची खंडणी निघाली होती. आणि हा ठरवून रचलेला डाव होता हे दिसू लागलं. 

पारदर्शी मुख्यमंत्र्यांनी कारण नसताना ऊडी घेतली आणि स्वतःच्या हाताने बेअब्रू झाले. फडणवीस त्यांच्या सौभाग्यवती व मुनगंटीवार असलेलं एका गाण्याचा फायनान्सर हा ड्रग पेडलर होता. हे नवाब मलिकांनी डिजिटली दाखवलं. लगेचच तासाभरात त्याचं नाव हटवलं गेलं. 

मग दिवाळीनंतर फटाके वगैरे फोडू अशी घोषणा करणाऱ्या फडणवीसांना साधी उदबत्तीही लावता आली नाही. नवाब मलिकांनी आज केलेल्या आरोपानंतर फटाके फोडणारे फडणवीस एक quote card ट्विट करून पळून गेले. 

नवाब मलिकांनी खुलं आव्हान दिलंय काय चौकशी कुठल्या यंत्रणा कडून करायची ती करा. मी घाबरत नाही. 

आजवर फक्त भाजपवाले आरोप करायचे आणि बाकिचे पळून खेळायचे ,तो खेळ आता उलट्या दिशेने सुरू झालाय. 

योग्य वेळेत या प्रकरणात नवाब मलिकांची एंट्री झाली म्हणून काय चालतंय त्या भयानक गोष्टी तर समोर आल्या. नाहीतर के.पी गोसावी आणि मनिष भानुशाली पुढच्या वर्षी दिल्लीत सन्मानित होताना दिसले असते. 

नवाब मलिकांनी ज्या पद्धतीने प्रतिज्ञा केलीय या प्रकरणाचा logical end करेन ते केल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीतच.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?