डॉग डे - मित्र असावा कुत्र्यासारखा

माणसाळावलेला पहिला प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्रे लोक एवढे जीव लावतात त्याची सर दूसऱ्या कुणाला येत नाही. तिथं स्वार्थ अशी काही गोष्ट नसते. असताना मुका जीव. पण त्याचं व्यक्त होणं जीव लावला कि समजायला सुरू होतं. तुम्ही घरी आला कि शेपूट हलवत येऊन अंगावर उड्या मारणं हे प्रचंड प्रेमळ असतं. जरा काही त्याला रागावलं किंवा जोरात ओरडलं कि ते पण नाराज होतं. नाराजीत नाकतोंड फुगवून रूसवा धरतो. मग तुम्हाला झक मारत परत मनवावं वाटतंच असं काही ते नाराज होतात. मग जाऊन त्याची समजूत काढली कि तो परत अंगाला बिलगतो. तेव्हा आपल्याला आपण अगदीच भिकारचोट नाही आहोत तर चांगले आहोत ही जाणीव होते. 

मतलबी, हिशोबी दुनियेत प्रेम ही भावनेची काही किमंत मोजावी लागते. ती इथं मोजावी लागत नसते. यांचा लळा, जीव, प्रेम अखंडीत असतो. त्याला काही द्यावं, घ्यावं ही भानगड नसते. 

तुमचेही मूड ओळखून तो त्यात्या पद्धतीने व्यक्त होतो. 
तुम्ही खूशीत असला तर तो टणाटण उड्या मारत येऊन तुमच्या अंगाखांद्यावर उड्या टाकतो. पण तुमच्या मूडला सुतक आलं असेल तर तो येतो फुट दोन फुटावर लांबूनच मान खाली घालून बसून सुतकात भाऊबंद होतो. जेवढं आपल्याला आपले प्रियजन ओळखत नाहीत तेवढा हा ओळखतो. 

ईमानदार, पराक्रमी, शिकारी हे इनबिल्ट गुण असतातंच. पण त्याची प्रेम करायची, ती व्यक्त करायची पद्धत, त्याचं जीव लावणं हे सुखद असतं. सुखात सगळे साथी असतात पण दुःखात हा जवळचा असतो. त्याचं त्याकाळी अंगाला येऊन बिलगणं हे शहारं आणणारं असतं. 

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणतात तसंच पुढं मित्र असावा कुत्र्यासारखा म्हणटलं तर अतिशयोक्ती ठरणारं नाही. सर्व श्वानप्रेमींस जागतिक श्वान दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 
🐕🐾 <3 
#dogday #internationaldogday2021



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?