हेळवी आणि आपले वांड पुर्वज

हेळवी हा खतरणाक प्रकार महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. 
आमचा हेळवी ष्टोरी सांगायचा कर्नाटकातलं कुठलं तरी आडगावाचं नाव सांगायचा, त्या गावच्या पाटलाचा आमच्या पुर्वजांनी खून केला

 आणि मग पळून महाराष्ट्रात आले, मग नरंदे गावात आल्यावर आमचे नाव नरदे झाले,

 त्यानंतर आमचे पुर्वज आगरात आले. त्यानंतर आताच्या गावी. 

तर हे हेळव्या एवढ्या काँन्फिडंसने सांगायचा कन्नडात कि आत्ताच्या भाषेतले goosebumps आणि तवाचे अंगावर शहारे काटे, यायचे ईतिहास ऐकताना. नंतरून हेळव्याकडे फक्त नरद्यांचे काँन्ट्र्याक्ट नव्हते, तर षटगोंड पाटील, झिप्रे पाटील, चौगुले वगैरेंचा ट्री डायग्राम यांच्याकडेच होता. 

मी माझ्या जिज्ञासू स्वभावाला धरून हेळव्याचा पाठलाग करून दोनतीन घरात घूसलोतो.

 तर हे बेंबटे सेम ष्टोऱ्या सांगायचे. 

एकाच्या घरात तो खुनाचा वीररसपुर्ण प्रसंग सांगतांना तिथं उपस्थित असणारा त्या खानदानाचा वंशवृक्ष आणि वंशवेल नजरेत जरब आणून माझ्याकडे बघत होते. मला हसू फुटालतं. यांच्या पुर्वजाच्या आधी आमच्याबी पुर्वजाने खून पाडलाता हे त्याला नव्हतं माहीत. 
मग हेळव्या गेल्यावर त्या वंशवृक्ष आणि वेलीला सांगिटलं आरे बेंबट्या तुझ्या आधी आमच्या पुर्वजांनी त्याला हाणलाता, तुझे पुर्वज मेल्याचं कन्फर्म करून अनेकदा हाणून आले असतील. मग त्याला फोलपणा लक्षात आला. 

मग हेळव्याला मी म्हणटलं, पितळची भांडी घेता, पाच्चशे हजार दरवर्षी घेता ष्टोऱ्या तर वेगवेगळ्या करा. मग ते म्हणटलं तुच सांग. मग मी वीररसाने परिपुर्ण अशा कथा सांगिटल्या. आमक्यातमक्याचे पुर्वज गावावर पिसाळलेल्या हत्तींची टोळी चालून आलती कर्नाटकात तेव्हा अख्या गावाला यांनी हत्तींना मारून वाचवलं होतं, पण तिथल्या देवर्षांनी सांगितलं कि एवढं बळी घेणाऱ्यांनी पाप कर्माच्या ठिकाणी राहू नये. म्हणून त्यांनी गाव सोडलं. अशा लॉजिकयुक्त गोष्टी हेळव्याला सांगिटल्या. 

काय खऱ्याचं नसतंय या भानगडीत, हिथं भाऊबंदं बांध कोरतेत, भाऊभाऊ वाटणीला भांडतेत आणि आपण जाती धर्म शोधतो. बरेचजण आपापल्या जातीधर्मासाठी पदरचे पैसे घालून, प्रसंगी घरातलं काही विकून जातधर्म मोठ्ठं करण्यात आयुष्य खर्ची घातलेत. त्यांच्या पदरात समाजाने नेहमी धोंडा टाकलाय. हे काही एका दूसऱ्याचं नाही आपल्या देशाचीच रीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?