हिरो झालेला म्हातारा



आम्ही कोविड सेंटरमध्ये एडमीट झालो त्याच्या दूसऱ्या तिसऱ्या दिवशी एक म्हातारं एडमीट झालं. मला म्हणटलं , आकडा लावतोस का ? मी म्हणटलं तसलं काय कधी केलं नही. आता हा म्हातारा गडी त्यात हा हातात पुस्तकं बिस्तक वाचत असायचा, कागद पेनानं सारखं कायतर नोट करायचा. मला वाटलं हे पुस्तकातली आवडलेली वाक्ये लिवत असेल. तर हा पठ्या गणित घालून आकडं काढायचा. अॉनलाईन आकडा काय आलाय ते बघू म्हणून पोरांना विचारायचा. 

मध्येच कायतर तत्वज्ञान झाडायचं. आता आमच्यात सगळ्यात बुजूर्ग गडी ह्योच. याला दुनियेचे सारे फोन नंबर पाठ असायचे. याच्या डायरीत पण सगळ्या मंत्र्या संत्र्यांचे नंबर आमदार, खासदार सगळे नोंदलेले होते. पण अडचण अशी कि आज्जाकडे फोन नव्हता. त्यामूळे आज्जा सगळ्यांकडे फोन मागायचा आणि पिडवून टाकायचा. 

अशाच एका संध्याकाळी आज्जा बोलला आज्जीला फोन लावून दे, झालं आज्जा आज्जी बरोबर बोलायला लागला, मग त्यांचं बोलणं झाल्यावर मी आज्जीबरोबर बोललो. आज्जीला म्हणटलं, आज्जा तुमची लै आठवण काढतो, सारखं आमची मालकीन अशी आमची मालकीन तशी असं कौतुक करत असतो. तर आज्जी हारकून टुम्म ! आज्जाबी हारकला. दूसऱ्या दिवशी आज्जीनं मलिदा आणि तुपाचा डबाच पाठवून दिला. 

म्हाताऱ्याकडे चांगले काही गुण होते , त्यापैकी एक म्हणजे पत्याने त्याला खेळता येत होतं, आम्ही सुटून खेळायला म्हाताऱ्यामुळे शिकलो. दोनच दिवसांत मी डब्बल करण्याएवढा पारंगत झालो. 

आता म्हाताऱ्याला आम्ही डोश्क्यावर चढवून ठेवलोतो. त्यामुळे त्याला सत्ता मिळाल्याचा आनंद झाला. म्हाताऱ्याला अचानक सत्ता मिळाल्याने त्याचं टोटल संतुलन बिघडलं. त्याला कायतरी पराक्रम गाजवून आपलं अढळ सत्तापद कायम ठेवू वाटलं. त्यातनं म्हाताऱ्याने पराक्रमच केला. 

आता ते कोविड सेंटर जे होतं ते जगातलं सर्वात सुंदर ठिकाण असंच मी म्हणेन आणि तिथल्या माझ्या बरोबरच्या लोकांची तशीच भावना. मोकळा ढाकळा परिसर, बसायला अनेक ठिकाणं, वेळेवर चहा नाष्ता जेवण, आणि जेवणही चविष्ट स्वादिष्ट . एवढं सारं चांगलं होतं. तर म्हाताऱ्याला ते बघवलं नही. 

म्हाताऱ्याने थेट तहसीलदारला फोन केला आणि जिथं आपण जातही नाही तिथं आलेल्या तणकाटाबद्दल तक्रार केली. झालं प्रोटोकॉलनुसार तहसीलदार मॅडमनी माणसं पाठवली. तर ती आली. म्हातारा हिरोगीरी करत काठी बडवत त्यांना झाडू लागला. मग त्यातल्या एकाला आम्ही सगळं बोलवून सांगितलो आमची काय तक्रार नही. म्हातारं यडझवं हाय विषय सोडून द्या. ते बोलले आमच्या वरिष्ठांना जरा तुम्ही बोला. 

तर हा पठ्या एका म्हातारीला तयार केलता. आणि तिला सांगाय लावला माझ्या पायातंनं घोरपड गेली, आणि याच्या पायातंनं साप गेला. ते शासकीय लोक गेले. मग मी म्हातारडीला गाठलो आणि विचारलं घोरपड कसल्या रंगाची हुती ? तर म्हातारी म्हणटली मामानं मला लबाड बोलाय लावलं. आत्तारं तुझ्यायचा म्हणटलं. 

मग वरिष्ठांशी आम्ही बोललो, म्हाताऱ्याचं काही ऐकू नका. मग वरिष्ठ मॅडम बोलल्या हे कायम तक्रारच करत असतंय. पण आम्हाला बघावं लागतंय. तु सांगतो तर हरकत नाही. 

त्यानंतर बरोबर दूसऱ्या दिवशी म्हाताऱ्याचा गाववाला तिथं आला. त्याने याचे गावातले पराक्रम सांगिटले. याला चांगलं काय दिसलं रे दिसलं हा त्यात आडवं पाय मारलेला हायच ! सगळीकडे निव्वळ लोकांना घोडा लावण्यात त्याने आपली जिंदगी बितवली असल्याचं गाववाला सांगालता. गाववाला जसा आला तसं म्हातारं शांत झालं. 

त्यालापण डिस्चार्ज मिळाला, काल फोन केला म्हाताऱ्याने श्रेणिक पानं खेळायला बसायला पायजे.मग आज्जी बोलली, आज्जीला म्हणटलं काय आज्जे गावचा ऊरूस हुता काय मलिदा पाठवलीतीस ? तर आज्जी म्हणटली पीर तिकडं गेलाय आणि ऊरूस कुठला ? 

तर आज्जाला फक्त मी फोनवर म्हातारीशी चांगलं बोलल्यानं भरगच्च चांगलं ट्रीट केलं जात होतं. आता आज्जीनं पंधरा दिवसानं तिकडं यायचं निमंत्रण दिलंय तर एकदा जाऊन म्हाताऱ्याची खोडच मोडून येतो. 

मला एक जाणवलं, तरणेताठे लोक संयमी आहेत पण म्हातारे अत्यंत पेटलेले आहेत. अशांना वेळोवेळी हाणायला हवं. 🔨

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?