महापूर आणि मगर

पूराचं पाणी बघाय गेलतो. अनेकजन आमच्यासारखे लोक पाणी बघाय आलते. आता बसूनबसून कंटाळा आला असल्याने म्हणटलं, चला खेळ करू. 

येतायेता माझा दोस्त आणि मी गर्दीचा घोळका बघून म्हणायचो. 

मगर हिकडं कसं काय आली कुणाष्ठौक ? 

आज पहिल्यांदा मगर बघिटली. 

मगरी पण रस्त्यावरनं चालत येत असतील काय ?

मगरीचं कातडं निब्बार. 

वगैरे सहज डॉयलाग गाडीवरंनं मारायचो आणि मिररात बघायचो. लोकं आमच्याकडं बघून चालायचा स्पिड वाढवायची. 

आज बरीच गिऱ्हाईकं झाली. तर आमचा दोस्त राहूल गाठ पडला. त्याला म्हणटलो मगर हिकडं कसं काय आल्या ? त्यो म्हणटला , मीच काल सोडलोय. 

चहा प्यायला थांबलं तर चहावाल्याचं गिऱ्हाईक करायचं डोक्यात हुतं पण त्याला न सांगता त्याच्या गड्याला सांगिटलं. पुढं गड्यानं होलसेल धंदा केला मगरीचा आणि मग मालकाला जाताना सांगिटला पण ते मला वळकतं ते म्हणटलं , मगरीवरंच ह्यो थांबला बरं झालं नहीतर एनाकोंडा आलाय म्हणून सांगिटला असता. 

काही लोक आपल्याला ओळखतंच नहीत तर चांगलंच ओळखत असतात. पण आज मगरीचा धंदा बरा झाला. समाधान वाटालतं. पण

आपल्या प्रधानमंत्र्यांनी मगरीचा व्यवहार बालवयातंच केलता हे आठवल्यानंतर समाधानावर दरड कोसळली. 😏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं