डास - फॅमिली मॅन

जगातील सुंदर टाईमपास म्हणजे डासांच्या हालचालीचं निरीक्षण करणे. डास सुरवातीला एखादा नजरेत येतोय. मग तो त्यांची मम्मी, पप्पा, दीदी, दादा, छोट्या सगळ्यांना बोलवून आणतो. तिथं एक माणूस आलाय लवकर या या या. 
मग हे सगळे हलकट लोक झिग झ्याग झिग झ्याग नाचत येतात.त्यांची प्लॅनींग ठरते.




 त्यांचा पप्पा म्हणतो,
तुम्ही सगळी पायाकडं जायचं. 
ए दीदे गुणगुणू नको ऐक जरा सुद्दीनं, मी वर त्याच्या कानाला जातो तुम्ही पिंडरीला जाऊन चावायचं. घोटा फुटाय ऊशीर लागतो. 
कानाजवळनं मी आलो नही आलो तरी तुमचं तुमी घरला जायचं. माझं काय बरं वाईट झालं तरी झालं. रिस्क है तो ईश्क है ! पायावरल्या केसात गुतायच नही. 
अशा सुचना बाप असणारा डास देतो.

मग  हा बाप असणारा डास वर कानाजवळ गुणगुणतो. तोवर त्याची अख्खी फॅमिली पिंडऱ्या धरते. कचाकच चावते. एखाद्यावेळेला वरचा गडी धारातीर्थी पडतो. पण हे सक्सेफुल होतात. 

तुम्हाला म्हणून सांगतो, हे डास एवढी पद्धतशीर प्लानिंग करतात ते ओळखायला माझ्यासारखं संशोधन लागतं. इथंन पुढं एक लक्षात ठेवा. जर एखादा डास कानाभवती गुणगुणताना दिसला रे दिसला पहिला दोनही पाय बघायचं. खाली अख्खी फॅमिली हजर असते.

त्यामुळे सदैव सावधान रहा. चिकुणगुणीया, मटणगुणीया आजारांपासून बचाव करा. धन्यवाद !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं