L लावलोय

दोनचार दिवसामागं कोल्हापूरला जात असताना रूकडिच्या अलिकडं एक ऊंटवाला स्पिडब्रेकर केलाय, मला ते माहीत होतं. पण मागणं एक स्विफ्ट ज्याच्यावर लाल L लावलाता ते गडी नवीन असावं. आमची आपली साधी पॅशन गाडी साठसत्तरला पळलं तरी डचमळतंय, मी उगच पन्नासनं मुंब धरून लागतो. तर मी बी साठसत्तरला आणि तेबी मागणं तेवढ्यानंच यायलतं. स्पिडब्रेकर हाय ते मला माहीती असल्यानं मी जरा हळू घेटली तर हा L वाला तसंच तर्राट येऊन माझा कार्यक्रम करत होता तेवढ्यात मी शनिमात दाखवतेत तसं गच्चाकन कडेला वढली गाडी. ते जरा बेंबटं संवेदनशील असावं, त्याला निब्बार गचका बसला तरी माझी विचारपूस केली. मला म्हणटला मी बी नवीनच शिकलोय वो बघा गाडीवर ते L लावलोय. 
व्हय बाबा लावलायस L म्हणटलं आणि गेलो पुढं. लै काय बोलणार ? ☹️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?