मोटेरा स्टेडियम

एक बऱ्यापैकी सगळ्यांनी ऐकलेला #पिंकूजोक सांगतो. 

एका गावात बऱ्याच अंधकारमय वर्षांनंतर वीजेचं कनेक्शन येणार असतंय. मग त्या गावातले सगळे लोक लै आनंदी होऊन, काहीजण दारू पितात, काहीजण गोडधोड जेवण मटण वगैरे बनवतात, गावात उत्सव असतो. संध्याकाळी सारं गाव हालगी ताशाच्या तालावर नाचून आनंद व्यक्त करत असतंय. माणसं तर लैच नाचत असतेत त्याहून अधिक कुत्रेलोक पण नाचत असतात. माणसांना प्रश्न पडतो. आत्तारंह्यच्यायला , कुत्र्यांनो तुम्ही का डान्स करालाय  ?

तर एक दांडगं कुत्रं म्हणतंय गावात वीज येणार हाय, म्हणून आम्ही आनंदी हाय.  

मग माणूस म्हणतंय तुमचं काय त्यात आनंद ?

मग कुत्रं म्हणटलं, आवो तुम्हाला मेंदवं असून कळत कसं नही. लाईट काय अशीच येणार हाय का तवा ? लाईट यायच्या आदोगर लायटीचं डांब येत्यात. 😎

मग सारी कुत्री वॉवॉवॉ करून हासाय लागतात. माणूस लोकंही हासतात आणि परत हलगी तापवून परत माणसे कुत्रे नाचाय लागतात. 

मला एक आयड्या सुचल्या, त्या मोटेरा ष्टेडियममध्ये लायटीच्या डांबास्नी पण कायतर नावं ठेवली पायजे. 😜

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?