शिव्या देणे

शिव्या देणं आणि अतिशय घाण बोलणं यायलाच हवं. काही काम त्याशिवाय होत नाहीत. अहिंसा, सत्य, गोडगोड बोलण्याने लोक गैरफायदा घेत असतात. अशा प्रसंगी तोंड सुटलेलं असणं कधीही चांगलं. 

एकानं मागचा फ्लावर प्लॉट चालू होता, तेव्हा फ्लॉवर नेलता. पैशे मागायला पंधरा दिवस फोन केला नाही. पंधरा दिवसांनी फोन केला तर परत आठवड्याने देतो बोलला. आठवड्याने बोलला दोन दिवसांनी, दोन दिवसानी सांगितला परत आठवडा, असं करत चांगलं पठ्याने दोनअडीच महिने पैशे ताणले. डोस्कं दुखलं गड्या. आता मूळातच पुढच्या माणसानं लाज सोडली असेल तर आपण सरळं वागून चालत नाही. 

काल फोन करून घाण शिव्या घातल्या. उद्धार केला. आज पैशे मिळाले. गप्प छानछान बोलत बसलो असतो तर आणि ताणवलं असतं. त्यामूळे शिव्या, त्यांची व्यवस्थित डॉयलाग डिलीव्हरी केल्यास यश मिळते. 

हे सांगायचं कारण म्हणजे उद्या कंत्राटी शेती सुरू झाली. बिलं जर कंपनीने थकवली. तर तुम्ही काय करणार ? आज कडकनाथ कोंबड्यात पैशे गुंतवल्यांना काय शाट तरी मिळालं का ? उद्या तुमच्या माझ्या दुर्दैवाने जर हे कायदे झाले तर सर्वाधिक वाईट घोडा लागणार. प्रकरण कोर्टात गेलं तरी तुमचे केस पांढरे होतात पण तुमाला पैशे मिळत नसतात. पंजाब हरियाणातले लोक मरणाच्या थंडीत मार खाऊन तिथं राहायला ती लोकं काय खुळी नाहीत. त्यांचे अनुभव आहेत. उद्याचे धोके त्यांनी आज ओळखलेत. काय हाणामारी व्हायची ती होवो पण हे काळे कायदे यायला नकोत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?